टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

BJP News : 28 वर्ष पक्ष कार्यालयात शिपायाचं काम केलं, त्या व्यक्तीला भाजपने दिलं निवडणुकीच तिकीट

BJP News : भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हटला जातो. कार्यकर्त्यांचा पक्षात कसा मान राखला जातो ते भाजपने सिद्ध करुन दाखवलं आहे. भाजपने एका शिपायाला निवडणूक तिकीट दिलं आहे.

BJP News : 28 वर्ष पक्ष कार्यालयात शिपायाचं काम केलं, त्या व्यक्तीला भाजपने दिलं निवडणुकीच तिकीट

भाजप हा कार्यकर्त्यांचा पक्ष म्हटला जातो. भाजपमध्ये कार्यकर्ता ते पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष असा प्रवास होतो. भाजपमध्ये कार्यकर्त्याचा कसा सन्मान होतो, त्याचं उत्तम उदहारण समोर आलय. गुजरातमध्ये सध्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. मेहसाणा महापालिका निवडणुकीत भाजपने रमेश भील यांना महापालिकेचं तिकिट दिलय. रमेश भील यांनी गेली तीन दशकं मेहसाणा जिल्हा भाजपं कार्यालयात शिपाई म्हणून काम केलय. रमेश भील यांनी शनिवारी अधिकृतपणे उमेदवारी अर्ज दाखल केला. भाजपने मेहसाणाच्या वॉर्ड नंबर 13 मधून रमेश भील यांना उमेदवारी दिली आहे. पक्ष कार्यकर्ता ते पक्ष उमेदवार असा त्यांचा प्रवास आहे.

रमेश भील हे 50 वर्षांचे असून त्यांचं 10 वी पर्यंत शिक्षण झालं आहे. मागच्या 28 वर्षांपासून ते मेहसाणा भाजप कार्यालयात शिपायाचं काम करत होते. कार्यालय संभाळणं, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना चहा-पाणी आणून देणं ही त्यांची मुख्य जबाबदारी होती. रमेश भील यांना उमेदवारी देण्यामागे संदेश देणं हा भाजपचा उद्देश आहे. कार्यकर्ता प्रथम या विचारधारेवर आम्ही चालतो हा संदेश यातून भाजपने दिलाय. रमेश भील यांची पक्षाशी असलेली एकनिष्ठता आणि तळागाळातील कार्यकर्त्यांसोबत असलेला त्यांचा जनसंर्पक यामुळे रमेश भील उमेदवारीसाठी पहिली पसंत ठरले.

रहिवाशांचं म्हणणं काय?

“मी पूर्णपणे समर्पण भावनेने पक्ष नेते आणि कार्यकर्त्यांची गेली 28 वर्ष सेवा करतोय असं रमेश भील उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर बोलले. आता पक्षाने मला माझ्या वॉर्डातील लोकांची सेवा करण्याची संधी दिली आहे. मी या नव्या जबाबदारीचं वहन करण्यासाठी पूर्णपणे सज्ज आहे” असं रमेश भील म्हणाले. रमेश भील यांच्या उमेदवारीने सर्वांचच लक्ष वेधून घेतलय. खासकरुन रहिवाशी त्यांच्या उमेदवारीवर समाधानी आहेत. आमच्या रोजच्या दैनंदिन समस्या चांगल्या पद्धतीने समजून घेणारा उमेदवार दिलाय असं रहिवाशांचं मत आहे.

अन्य पक्षांमध्ये जितकी घराणेशाही आहे, तितकी भाजपमध्ये नाही. भाजपमध्ये मोठ्या पदांवर बसलेल्या व्यक्तींचा प्रवास तुम्हाला कार्यकर्ता म्हणून सुरु झाल्याचं दिसेल.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Vidhan Parishad Election 2026 : पुण्यातील राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा संपला! ‘जिजाई’वर पार्थ पवारांची शिष्टाई यशस्वी, सुनील टिंगेरेंची विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार

Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

अमेरिकेत मोठी खळबळ! इराणसोबतच्या युद्धादरम्यान धक्कादायक घटना, थेट गोळीबार, तब्बल इतक्या लोकांचा..

Gold Price Today : अमेरिका-इराण तणावादरम्यान मोठी अपडेट, सराफा बाजारात मोठा उलटफेर, 10 ग्रॅम सोन्याची किंमत आता..

ऑल पिक्चर क्लिअर… कोण लढतंय कुणाविरोधात? यादी आली समोर; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना