टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन

On: April 13, 2026 2:11 PM
Follow Us:

हार्दिक पंड्या आणि कृणाल पंड्या या दोन्ही भावांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चा गेल्या काही काळापासून येत आहेत. कालच्या मुंबई वि. आरसीबी मॅचमध्येही हे साफ दिसून आलं. ते पाहून चाहत्यांना मात्र मोठा धक्का बसला आहे.

Hardik Pandya vs Krunal Pandya : पंड्या ब्रदर्समधली फूट चव्हाट्यावर ? ना हँडशेक, आऊट झाल्यावर आक्रमक सेलिब्रेशन, हार्दिक-कृणालचं काय बिनसलं ?

इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2026 च्या हा.स्कोअरिंग सामन्यात काल मुंबई इंडियन्सचा (MI) सामना रॉयल चैलेंजर्स बंगळुरु (RCB) शी काल झाला. 12 एप्रिलाल मुंबईतील वानखेडेवर झालेल्या सामन्यात आरसीबीचा संघ 18 धावांनी जिंकला. टॉस हरल्यावर आरसीबीने प्रथम फलंदाजी करत 4 विकेट गमावून 240 धावा केल्या, मात्र प्रत्युत्तरात मुंबई इंडियन्सला 5 विकेट्स गमावून फक्त 222 धावा करता आल्या, ते 18 धावांनी सामना हरले.

मात्र या सामन्यात जे दृश्य दिसलं तो पाहून सर्वच क्रिकेटप्रेमी हैराण झाले. या सामन्यात हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या एकमेकांसमोर उभे ठाकले तेव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्यावर खिळल्या होत्या. या दोन भावांमधील स्पर्धा केवळ क्रिकेटपुरती मर्यादित नव्हती, पण त्यांच्या वागण्यामुळे त्यांच्यातील तणाव स्पष्टपणे दिसून येत होता. या दोघांमध्ये वाद झाल्याचं बोललं जात होतं, पण काल मॅचमधील त्यांच्या वागण्यानतंर या चर्चांना आणखी उधाण आलं. कारण बॉलिंग करताना कृणालने त्याच्या लहान भावाला, हार्दिकला बाउन्सर टाकत त्याचं स्वागत केलं. त्यावर हार्दिकने एकही शब्द न बोलता केवळ थंड नजरेने प्रतिसाद दिला. जे दोन भाऊ सहसा मैदानावर मजा-मस्ती आणि विनोद करताना दिसतात, ते काल खूप गंभीर दिसत होते.

विकेटनंतरची आक्रमक शैली

आणि सामन्यातील सर्वात महत्वाचा, लक्ष वेधून घेणार क्षण म्हणजे,  जेव्हा आरसीबीच्या जेकब डफीने हार्दिक पांड्याची विकेट घेतली. हार्दिक बाद झाल्यावर, कृणाल पांड्याने मोठ्याने आणि अतिशय आक्रमकपणे जल्लोष केला, ज्यामुळे चाहते नक्कीच हैराण झाले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने व्हायरल झाला असून, अनेकांनी या घटनेचा दोन्ही भावांच्या नात्याशी संबंध जोडायला सुरुवात केली. दोघांमध्ये काही आलबेल नाही, असं बोललं जात आहे.

 

हँडशेकही नाही

पण हे प्रकरण एवढ्यावरंच थांबलं नाही. मॅच संपल्यानंतर हार्दिक पांड्या आणि कृणाल पांड्या एकमेकांना भेटलेही नाहीत, ना एकमेकांशी हँडशेक केलं. त्यांच्या या वागण्यामुळे त्यांच्यात काही बिनसल्याची चर्चा अधिकच सुरू झाली, कारण याआधी मैदानावर त्या दोघांमधील घनिष्ठ संबंध अनेकदा दिसून आले होते. मात्र काल त्यांचं एकमेकांशी थंड वागणं, विकेटनंतरची आक्रमक शैली, ही वेगळीच कहाणी सांगत होती.

 

खरंतर पंड्या भावंडांमधीस कुरबूरीची चर्चा आधीच सुरू धाली होती. नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमधील हार्दिक पांड्याच्या प्रभावी कामगिरीनंतर एकीकडे सर्वजण त्याचे कौतुक करत होते, पण कृणाल पांड्याकडून कोणतीही ठोस प्रतिक्रिया आली नाही. टीम इंडियाने टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धा जिंकली. या स्पर्धेत हार्दिक पांड्याची कामगिरीही जबरदस्त होती, पण कृणाला पांड्याने ना त्याचं अभिनंदन केलं ना हा सामना पाहण्यासाठी मैदानात गेला. एवढंच नव्हे तर सोशल मीडियावरही दोघांमध्ये दुरावा असल्याचे संकेत मिळत होते. एकमेकांना वाढदिवसाच्या शुभेच्छा न देणे आणि वैयक्तिक कार्यक्रमांमध्ये वेगवेगळे दिसणं, यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या.

मात्र यावर अद्याप हार्दिक किंवा कृणाल कोणीची काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. पण चाहत्यांमध्ये हा मुद्दा चर्चेचा ठरला आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now