टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

South Cinema Actor Harish Died: सिनेसृष्टी हादरली; टँकरला कारची जोरदार धडक, भीषण रस्ते अपघातात 40 वर्षांच्या सुप्रसिद्ध अभिनेत्यावर काळाचा घाला

Follow Us:

South Cinema Actor Harish Died: वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी अभिनेत्यावर काळानं घाला घातलाय. त्यामुळे सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होतेय.

South Cinema Actor Harish Died: ज्येष्ठ गायिका आशा भोसले (Veteran Singer Asha Bhosle) यांच्या निधनानंतर अख्खा देश शोकसागरात बुडाला आहे. दिग्गज गायिका आशाताईंवर (Asha Bhosle) आज अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. आशाताईंच्या निधनाच्या वृत्तानं सिनेसृष्टीला धक्का बसला आहे. अशातच आता प्रसिद्ध अभिनेत्याच्या मृत्यूच्या वृत्तानं सिनेसृष्टी हादरली आहे. वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी अभिनेत्यावर काळानं घाला घातलाय. त्यामुळे सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त होतेय.

कन्नड सिनेसृष्टीतील (Kannada Film Industry) सुप्रसिद्ध अभिनेते हरीश (Actor Harish) याचं एका रस्ते अपघातात निधन झालंय. आपल्या असाधारण अभिनय कौशल्याच्या जोरावर कन्नड चित्रपट (Kannada Movies) आणि टीव्ही मालिकांमध्ये (TV Serials) स्वतःचं वेगळे स्थान निर्माण करणारा अभिनेता हरीश याचं वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी निधन झालंय.  कोडगू जिल्ह्यातील कुशालनगर तालुक्यात घडलेल्या एका भीषण रस्ते अपघातात अभिनेत्यावर काळानं घाला घातला.

मीडिया रिपोर्टनुसार, 40 वर्षीय हरीश रात्री उशिरा आपली कामं आटोपून कुशालनगरहून होस्कोटे इथल्या आपल्या घराच्या दिशेनं कार चालवत निघाला होता. या प्रवासादरम्यान, राष्ट्रीय महामार्ग 275 वरील एका वनक्षेत्राजवळ, त्याच्या कारची रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका टँकरला जोरदार धडक बसली. ही धडक इतकी भीषण होती की, अभिनेत्याच्या कारचा पूर्णपणे चक्काचूर झालेला. या भीषण अपघातात हरीश गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला.

अभिनेत्याच्या अपघाताची माहिती मिळताच पोलिसांचं एक पथक घटनास्थळी दाखल झालं आणि प्राथमिक तपासानंतर गुन्हा दाखल केला. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या टँकरला कारची धडक कशी बसली? याचा तपास पोलीस करत आहेत. गेल्या काही वर्षांत अनेक चित्रपट कलाकार रस्ते अपघातांचे बळी ठरले आहेत. अभिनेत्याच्या मृत्यूनं पुन्हा एकदा रस्ते सुरक्षाबाबत गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

अभिनेत्याच्या मृत्यूच्या दुर्दैवी घटनेमुळे कन्नड सिनेमा आणि टेलिव्हिजन क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे. हरिश केवळ 40 वर्षांचा होता आणि आता कुठे तो इंडस्ट्रीत नावारुपाला आला होता. त्यानं आजवर अनेक लोकप्रिय मालिका आणि सिनेमांमध्ये काम केलंय. विशेषतः ‘खलनायकी’ भूमिका साकारण्याच्या त्यांच्या शैलीचं प्रेक्षकांनी भरभरून कौतुक केलेलं. अभिनेत्याच्या निधनाच्या वृत्तानं सर्वांना धक्का बसलाय. इतक्या कमी वयात आणि अशा दुर्दैवी पद्धतीने एका अत्यंत गुणी अभिनेत्याच्या जाण्यानं अनेकजण सु्न्न झालेत. अभिनेत्याच्या निधनानं कन्नड इंडस्ट्रीत मोठी पोकळी निर्माण झालीय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now