टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

धक्कादायक! कराडमध्ये सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा, सिग्नलमध्ये बिघाड करुन प्रवाशांचे मोबाईल, सोने लुटले, पोलिसांकडू तपास सुरु

Satara Sahyadri Express News : सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे

Satara Sahyadri Express News : सातारा जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. सह्याद्री एक्सप्रेसवर दरोडा पडला आहे. रेल्वेच्या सिग्नलमध्ये बिघाड करून प्रवाशांना लुटले आहे. मिरज लोहमार्ग पोलीसांकडून या घटनेचा तपास सुरु करण्यात आला आहे. कराड तालुक्यातील शेणोली स्टेशन परिसरातील घटनेने खळबळ उडाली आहे.

कोल्हापूरहून पुण्याला निघालेल्या सह्याद्री एक्सप्रेसवर कराड तालुक्यातील शेणोली स्टेशनजवळ दरोडा पडला आहे. सातारा व सांगली जिल्हा हद्दीपासून काही अंतरावर मध्यरात्री घटना घडली आहे. सिग्नलशी संशयितांनी छेडछाड करत हा सिग्नल  बंद पडला होता. सिग्नल बंद असल्याने रेल्वे थांबल्याचे पाहून संशयितांनी प्रवाशांचे सोने व मोबाईल लंपास केला आहे. घटनेनंतर माहिती समजताच मिरज लोहमार्ग रेल्वे पोलिसांकडून तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now