टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Chhatrapati Sambhajinagar news: पाय सोलपटले तरी वर्दीसाठी धावला, पोलीस भरतीसाठी आलेल्या तरुणाची डोळ्यात पाणी आणणारी कहाणी

Chhatrapati Sambhajinagar news Police Recruitment: सध्या राज्यात पोलीस भरती सुरु आहे. त्यासाठी रणरणत्या उन्हात मैदानी परीक्षा द्यावी लागत आहे. संभाजीनगरच्या एका तरुणाकडे धावायला बूटही नव्हते

Chhatrapati Sambhajinagar news Police Recruitment: छत्रपती संभाजीनगरमधील एसआरपीएफ पोलीस भरतीच्या मैदानावर काल एक वेगळीच कहाणी पाहायला मिळाली. या पोलीस भरतीसाठी (Police Recruitment) जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून तरुण याठिकाणी आले होते. यापैकी अनेक तरुणांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. त्यामुळे काही जणांकडून पोलीस भरतीच्या मैदानी परीक्षेसाठी (police recruitment running) धावताना बूट (Shoes) विकत घ्यायलाही पैसे नव्हते.  (Chhatrapati Sambhajinagar news)

परिस्थिती कितीही कठीण असली, तरी जिद्द असेल तर स्वप्न पूर्ण होऊ शकतं, याचं जिवंत उदाहरण इथे समोर आले. खाकी वर्दीचं स्वप्न डोळ्यांत घेऊन शेकडो तरुण भरतीसाठी मैदानावर उतरले होते. कुणाच्या पायात महागडे शूज, तर कुणाकडे उत्तम तयारी, पण याच गर्दीत एक असा तरुण होता, ज्याच्याकडे धावण्यासाठी साधे शूजही नव्हते.

भरती प्रक्रियेचा आढावा घेण्यासाठी आलेले SRPF चे एसपी विक्रम साळी यांची नजर या तरुणावर पडली. त्यांनी त्याला जवळ बोलावलं आणि विचारलं, “चप्पलवर का धावलास?” “साहेब, शूज घ्यायला पैसे नव्हते… पण पोलीस होण्याचं स्वप्न आहे… ते पूर्ण करणार. हे शब्द ऐकताच तिथे उपस्थित अनेकांच्या डोळ्यात पाणी आले. एका तरुणाची जिद्द, संघर्ष आणि स्वप्नासाठीची धडपड सगळ्यांना भावून गेली.

घरची परिस्थिती हलाखीची. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत, अशा परिस्थितीत सरावासाठी शूज घेणं तर दूरच, पण पोलीस होण्याची जिद्द मात्र प्रचंड आणि म्हणूनच हा तरुण थेट चप्पल घालून पाच किलोमीटरच्या रनिंगसाठी मैदानात उतरला. चप्पलवर धावणं म्हणजे पाय सोलवटणं, वेदना सहन करणं… पण त्याच्या डोळ्यांसमोर होती आई-वडिलांची संघर्षमय कहाणी आणि खाकी वर्दीचं स्वप्न… आणि त्याने जिद्दीच्या जोरावर पूर्ण पाच किलोमीटरचं अंतर धावून पूर्ण केले. यानंतर एसपी विक्रम साळी यांनी या तरुणाला बोलावून घेतले आणि बूट दिले. परिस्थिती माणसाला हरवू शकते, पण जिद्दीला नाही, छत्रपती संभाजीनगरच्या या तरुणाने आज हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले. खाकी वर्दीच्या दिशेने त्याची ही धाव अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

थरकाप उडवणारी घटना, कंपनीत वितळलेलं स्टील अंगावर पडून 8 कामगारांचा कोळसा, सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा | 08 जून 2026 | सोमवार

विधानपरिषदेवरुन पाटील-गोरेंमध्ये जुंपली, पालकंमत्री म्हणाले, मी पोस्टमन; धैर्यशील मोहिते पाटलांचा गोरेंवर पलटवार

राज्यातील 56 लाख शेतकऱ्यांना 36 हजार कोटींचे कर्ज माफ होणार; कृषी मंत्र्यांची मोठी घोषणा

Solar Storm Alert : सूर्यावरील प्रचंड स्फोटाचा आज पृथ्वीला तडाखा; भारतात ‘ऑरोरा’ दिसण्याची शक्यता, नासाकडून सतर्कतेच इशारा

विदर्भातील मुख्यमंत्री असतानाही दररोज 10 ते 15 शेतकऱ्यांकडून आयुष्याचा शेवट, बच्चू कडूंचा स्वत:च्याच महायुती सरकारवर प्रहार