टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Sanju Samson : संजू सॅमसनचा दिलदारपणा, सेल्फी घेणाऱ्याच्या चाहत्याच्या फोनच्या डिस्प्लेवर रेषा पाहिल्या, नवा कोरा मोबाईल गिफ्ट दिला

Sanju Samson

Sanju Samson : संजू सॅमसन यानं केरळमध्ये एका चाहत्याला नवा मोबाईल भेट देत दिलदारपणा दाखवून दिला आहे. संजूच्या या कृतीचं कौतुक होत आहे.

चेन्नई : टीम इंडियाला टी 20 वर्ल्ड कप विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका पार पाडणारा संजू सॅमसन स्टार क्रिकेटपटू बनला आहे. संजू सॅमसनला मोठ्या प्रमाणावर प्रसिद्धी मिळून देखील त्याचे पाय अजूनही जमिनीवर आहेत हे दाखवून देणारी एक घटना समोर आली आहे. या घटनेतून संजू सॅमसनकडे असणारी विनम्रता आपल्याला पाहायला मिळते. संजू सॅमसन यंदाच्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतोय. आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यांमध्ये संजूला अपेक्षेप्रमाणं खेळी करता आली नसली तरी तो एका वेगळ्याच कारणामुळं सोशल मीडियावर चर्चेत आहे.

संजू सॅमसन यानं काय केलं?

संजू सॅमसन यानं एका चाहत्याला मोबाईल भेट देत एक अविस्मरणीय क्षण त्याच्या आयुष्यात निर्माण केला. केरळमधील एका चाहत्याला संजू सॅमसन यानं मोबाईल भेट दिला, याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ही घटना पलक्कड जिल्ह्यातील मुंदूर-थुट्टा येथील पंछप्पदम मधील शाळेजवळ हा प्रसंग घडला. या प्रसंगातून संजूच्या साधेपणाचं आणि दयाळूपणाचं दर्शन झालं.

काही रिपोर्टनुसार संजू सॅमसन कोझिकोडे ते कोईम्बतूरला निघाला होता, त्यावेळी तो  सायंकाळी 5.15 वाजता एका फोन कॉलवर बोलत असल्यामुळं थांबला होता. त्याचवेळी शाब्रीश जो केबल तंत्रज्ञ म्हणून कटमपझिप्पुरम येथील होता. त्याच्यासोबत त्याचा मित्र मणिकंडन जवळच्या मंगलकुन्नू येथील मैदानात क्रिकेट खेळण्यासाठी निघाला होता. यावेळी  कारमध्ये संजू सॅमसन असल्याचं त्यांच्या लक्षात आलं.

व्हिडिओ कॉलवर असलेल्या संजू सॅमसनच्या ते दोघे थांबल्याचं लक्षात आलं. संजू सॅमसन यानं कारच्या बाहेर येत त्यांच्याशी चर्चा केली आणि फोटो काढले. शाब्रीश यानं त्याच्या स्वत:च्या फोनवरुन सेल्फी काढली, त्याच्या फोनचा डिस्प्ले खराब झालेला होता. हे पाहताच संजू सॅमसन यानं कारमध्ये मागील बाजूला असलेला 30 हजार रुपयांचा स्मार्टफोन शाब्रीशला दिला. संजू सॅमसनच्या या कृतीमुळं शाब्रीश आणि त्याचे मित्र अवाक झाले. यानंतर चर्चा करुन संजू सॅमसन  मार्गस्थ झाला.

संजू सॅमसन यानं मोबाईल भेट दिल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकऱ्यांकडून संजू सॅमसन याचं कौतुक केलं जात आहे. भारताला टी 20 वर्ल्ड कप विजय मिळवून देण्यात संजू सॅमसन यांची महत्त्वाची भूमिका होती. संज सॅमसन आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळतोय. पहिल्या तीन सामन्यात मिळून संजू सॅमसन 22 धावा करु शकला आहे. त्याच्या दमदार फलंदाजीची चेन्नई सुपर किंग्जला गरज आहे.

 

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now