Gold Price Rate Today 10 April 2026 Latest News Updates in Marathi : सोनं-चांदीच्या किमतींवर देशांतर्गत तसेच जागतिक घटकांचा प्रभाव पडतो. इराण-अमेरिका युद्धविरामानंतरही सोनं-चांदीच्या दरांवर मोठा परिणाम झाल्याचे दिसून आलं आहे. 10 एप्रिल रोजी सोन्याचे दर किती ?

पश्चिम आशियातील लढाया, होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा उघडेल की नाही याबाबत असलेली अनिश्चितता, तसेच टँकर वाहतुकीत येणारा व्यत्यय आणि कथित शस्त्रसंधी उल्लंघनाचे वृत्त यामुळे बाजारातील वातावरणावर दबाव आला. आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचा स्पॉट भाव प्रति औंस व 4,789.67 डॉल आहे. देशांतर्गत सोने आणि चांदीच्या किमतींवर देशांतर्गत आणि जागतिक अशा दोन्ही घटकांचा प्रभाव पडत असतो. त्यामुळे आज भारतात सोन्याचे भाव घसरलेले दिसले.
देशातील प्रमुख शहरातील सोन्याचे दर
राजधानी दिल्लीमध्ये दिल्लीमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,51,620 रुपये आहे, तर 22 कॅरेट सोन्याचा भाव प्रति 10 ग्रॅम 1,38,990 रुपये इतका आहे. तर देशाची आर्थिक राजधानी मुंबई आणि कलकत्ता मध्ये 24 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1लाख 51 हजार 470 रुपये आणि 22 कॅरेटचं 10 ग्रॅम सोनं खरेदी करण्यासाठी 1लाख 38हजार 840 रुपये मोजावे लागणार आहेत.
देशात सर्वात जास्त दर दिसत आहेत ते चेन्नईमध्ये कारण तिथे 24 कॅरेटच्या 10 ग्रॅम सोन्याचा भाव 1 लाख 52 हजार 720 रुपये आणि 22 कॅरेटचा दर हा 1 लाख 39 हजार 990 रुपये आहे. तर पुणे आणि बंगळूरु या दोन्ही शहरांमध्ये, 24 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,51,470 रुपये आणि 22 कॅरेट सोन्याची किंमत प्रति 10 ग्रॅम 1,38,840 रुपये इतकी आहे.
| शहर | 22 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (₹) | 24 कॅरेट सोन्याचे आजचे भाव (₹) |
| दिल्ली | 138990 | 151620 |
| मुंबई | 138840 | 151470 |
| अहमदाबाद | 138890 | 151520 |
| चेन्नई | 139990 | 152720 |
| कलकत्ता | 138840 | 151470 |
| हैदराबाद | 138840 | 151470 |
| जयपुर | 138990 | 151620 |
| भोपाळ | 138890 | 151520 |
| लखनऊ | 138990 | 151620 |
| चंदीगड | 138990 | 151620 |
चांदीचे दर किती ?
सोन्याप्रमाणेच चांदी या मौल्यवान धातूचे दरही आज खाली घसरल्याचे दिसून आले. 10 एप्रिलच्या सकाळी चांदीचे भाव खाली घरून 1 किलोसाठी किंमत 2 लाख 54 हजार 900 रुपये झाले होते. अवघ्या एक दिवसापूर्वी, दिल्लीच्या सराफा बाजारात चांदीचा भाव तब्बल 7800 रुपयांनी, म्हणजेच 3.10 टक्क्यांनी घसरून 2,43,200 रुपये प्रति किलोग्राम झाला होता, नंतर त्यात थोडीफार वाढ दिसून आली. आंतरराष्ट्रीय बाजारात चांदीचा स्पॉट भाव 76.24 डॉलर प्रति औंस आहे. या वर्षी जानेवारी महिन्यात भारतात चांदीचा दर 4 लाख रुपयांपार गेला होता








