टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Kej Accident News: भरधाव कारवरचं नियत्रंण सुटलं; कार पलटी होऊन केजच्या तहसीलदार राकेश गिड्डेंचा जागीच मृत्यू; अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्ह्यात हळहळ

Kej Accident News: राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाली.

बीड: लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ आज (गुरूवारी, ता ९) सकाळी झालेल्या भीषण कार अपघातात केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा (Kej Accident News) जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे प्रशासकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. राकेश गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत होते. यावेळी त्यांची गाडी वेगात असताना अचानक नियंत्रण सुटल्याने वाहन पलटी झाली. अपघाताची (Kej Accident News) तीव्रता इतकी जबरदस्त होती की त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रेणापूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. अपघातग्रस्त वाहनातून मृतदेह बाहेर काढून तो उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर येथील ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आला आहे. या अपघाताबाबत अधिक तपास सुरू असून, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. गिड्डे यांच्या निधनामुळे महसूल विभागात हळहळ व्यक्त केली जात आहे.(Kej Accident News)

Kej Accident News:  नेमकं काय घडलं?

केज तालुक्याचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचे गुरुवारी पहाटे सुमारे ५ वाजता लातूर-अंबाजोगाई महामार्गावरील रेणापूर फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात दुर्दैवी निधन झाले. कर्तव्यदक्ष आणि तरुण महसूल अधिकाऱ्याचा अचानक झालेल्या या मृत्यूमुळे बीड जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. गिड्डे हे स्वतःच्या कारने प्रवास करत असताना वाहनावरील ताबा सुटल्याने हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती आहे.

Kej Accident News:  नियंत्रण सुटल्याने कार उलटली

रेणापूर पोलिसांच्या माहितीनुसार, अपघाताच्या वेळी गिड्डे कारमध्ये एकटेच होते. पहाटेच्या सुमारास वेगात असताना अचानक गाडीवरील नियंत्रण सुटले आणि कार रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. अपघाताची तीव्रता इतकी होती की, त्यात गिड्डे यांचा जागीच मृत्यू झाला. आवाज ऐकून स्थानिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत त्यांचा जीव गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला आणि मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रेणापूर ग्रामीण रुग्णालयात हलवला. अपघाताचे नेमके कारण शोधण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.

Kej Accident News:  तहसीलदारांच्या अपघाती निधनामुळे अश्विनी देशमुख साध्या पद्धतीने उमदेवारी अर्ज दाखल करणार 

धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की,  केज तहसीलदारांच्या अपघाती निधनामुळे आज आम्ही साध्या पद्धतीने आमचा उमदेवारी अर्ज दाखल करणार आहोत. संतोष देशमुख यांचे स्वप्न पूर्ण करायचे आहे, ज्याचा माणूस गेला त्यालाच ते दुःख कळते. आमच्या वहिनी अश्विनी देशमुख यांच्यासोबत संपूर्ण गावांनी रावा आणि गावाचा विकास करून घ्यावा असे आमचे आवाहन असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Mathura Boat Accident VIDEO : एका क्षणी ओठी भजनं, पुढच्याच क्षणी किंकाळ्या! मथुरा बोट दुर्घटनाग्रस्तांचा शेवटचा व्हिडिओ समोर

‘अहो, मौलना पवार जेव्हा तुम्ही जाळीदार टोपी..’ भाजप नेत्याचं शरद पवारांबद्दल धक्कादायक वक्तव्य VIDEO

Video: पीएम मोदी अन् राहुल गांधी निवडणुकीच्या धामधुमीत अचानक समोरासमोर येताच काय काय घडलं?

PM Kisan Yojana: पीएम किसानचा 23 वा हप्ता अडकणार? महाराष्ट्रासह 14 राज्यातील शेतकऱ्यांनो, झटपट करा हे काम

Solapur statue issue: मोठी बातमी: सोलापूरमध्ये विनापरवाना पुतळा उभारल्यास FIR दाखल होणार, चार तासांत पुतळा हटवणार, प्रशासनाचा महत्त्वाचा आदेश

Sharad Pawar : वारकरी संप्रदायात प्रतिगाम्यांची घुसखोरी; शरद पवार यांनी तुतारी फुंकली, आता थेट प्रहार? प्लॅनच सांगितला