टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

US-Iran Update : महाविनाशाला काही तास उरले असताना जगासाठी आली एक चांगली बातमी, अंधारात एक आशेचा किरण

US-Iran Update : स्ट्रेट ऑफ हॉर्मुजचा जलमार्ग खुला करण्यासाठी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली 48 तासांची मुदत आज रात्री संपणार आहे. कदाचित त्यानंतर इराणला बेचिराख करणारे अजून भयानक हल्ले होतील. पण या दरम्यान दिलासा देणारी एक चांगली बातमी आली आहे.

आजचा दिवस सगळ्या जगासाठी महत्वाचा आहे. मध्य पूर्वेत इराण विरुद्ध सुरु असलेलं युद्ध एकतर समाप्तीच्या दिशेने जाईल किंवा इराणला बेचिराख करण्यासाठी अमेरिका सर्वात भयानक पाऊल उचलेलं. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला दिलेली 48 तासांची मुदत आज रात्री 8 वाजता संपणार आहे. इराणने स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जलवाहुतकीसाठी खुलं करावं अन्यथा विनाशासाठी तयार रहावं अशी धमकीच ट्रम्प यांनी दिली आहे. स्ट्रेट ऑफ हॉर्मुज जगातील तेल वाहतुकीचा एक महत्वाचा मार्ग आहे. इराणने या जलमार्गावरील वाहतूक जवळपास ठप्प करुन ठेवली आहे. त्यामुळे जगात तेल संकट निर्माण झालं आहे. म्हणून ट्रम्प यांनी इराणला अखेरचा निर्वाणीचा इशारा दिला आहे. विषय तेलाचा असल्याने आज रात्री काय घडणार? हे सगळ्या जगासाठी महत्वाचं आहे. दरम्यान आता एक चांगली बातमी आली आहे.

स्टीव विटकॉफ यांची इराणी नेत्यांसोबत चर्चा झाल्याची माहिती आहे. स्टीव विटकॉफ हे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे निकटवर्तीय आहेत. पडद्यामागे घडामोडी सुरु आहेत. सध्या अमेरिकी राष्ट्राध्यक्षांचे विशेष दूत स्टीव विटकॉफ आणि जेरेड कुशनर यांच्या नेतृत्वाखाली चर्चा सुरु आहेत. जेरेड कुशनर हे डोनाल्ड ट्रम्प यांचे जावई आहेत. युद्ध सुरु होण्याआधी सुद्धा इराणसोबतच्या चर्चेत हे दोन नेते अमेरिकेचं प्रतिनिधीत्व करत होते. इराण आणि अमेरिकेतील चर्चा एका नाजूक वळणावर आहे. यात थोडं कमी-जास्त झाल्यास सगळं काही फिस्कटून महाविनाश घडू शकतो. म्हणून अमेरिकेने उपराष्ट्रपती जेडी वेन्स यांना या संवेदनशील चर्चेत सहभागी होण्यासाठी स्टँडबायवर ठेवलं आहे.

आता प्रश्न काय आहेत?

बॅकचॅनल चर्चा थेट आमने-सामने भेट घेण्यापर्यंत पोहोचली तर अशा स्थितीत वेन्स कमान संभाळू शकतात. अमेरिका-इराण युद्ध एका भयानक वळणावर आहे. त्यात ही बातमी थोड्या आशा पल्लवित करणारी आहे. आजच सीजफायर होईल का? अशी देखील चर्चा सुरु झालीय. याआधी अमेरिकेने दिलेला शांती प्रस्ताव इराणने फेटाळून लावला होता. त्यामुळे आता इराणकडून काय अटी ठेवल्या जातात? त्या अमेरिका मान्य करणार का? त्याशिवाय स्ट्रेट ऑफ हॉर्मुज ओपन करण्याची अमेरिकेची मुख्य अट इराण लगेच स्वीकारणार का? असे अनेक प्रश्न आहेत.

इराणच्या हाती असलेला एकमेव तुरुपचा एक्का

हॉर्मुजच इराणच्या हाती असलेला एकमेव तुरुपचा एक्का आहे. त्यामुळेच ते अमेरिकेला चर्चेच्या टेबलापर्यंत आणू शकले आहेत. त्यामुळे लगेच अमेरिकेची मागणी इराण स्वीकारेल असं वाटत नाही. पण इराणने जुमानलं नाही, तर तिथे महाविनाश अटळ आहे. आज इराणमध्ये ऊर्जा प्रकल्प डे, ब्रिज डे होणार असं ट्रम्प यांनी आधीच जाहीर केलय.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now