टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

बारामती निवडणुकीत शरद पवारांचा उमेदवार देणार का? शशिकांत शिंदेंनी मांडलं थेट गणितच, पवारांसोबत बैठकीनंतर काय निर्णय?

Baramati Byelection Sharad Pawar NCP: बारामतीच्या पोटनिवडणुकीवरून वातावरण तापले आहे. शरद पवार राष्ट्रवादी उमेदवार उतरवणार असेल तर काँग्रेसचा त्याला पाठिंबा असेल असे स्पष्ट भूमिका पक्षाने जाहीर केली आहे. त्यामुळे बारामतीच्या निवडणूक आखाड्यात पवारांचा उमेदवार उतरणार का? याची चर्चा रंगली आहे.

Baramati Byelection Sharad Pawar NCP: बारामती विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. उद्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. तर काँग्रेसने उमेदवार उभा करण्याचे जाहीर केले आहे. त्याचवेळी जर शरद पवारांची राष्ट्रवादी उमेदवार उभा करणार असेल तर पाठिंबा देण्याची तयारी दर्शवली आहे. ही निवडणूक बिनविरोध व्हावी अशी अपेक्षा सुनेत्रा पवार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अनेक नेत्यांनी व्यक्त केली आहे. त्यातच आज शरद पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्यात बैठक झाली. त्यांनी या बैठकीनंतर राष्ट्रवादीची भूमिका जाहीर केली.

बारामती निवडणूक लढवणार का?

अजितदादा पवार यांना श्रद्धांजली म्हणून आम्ही बारामती पोटनिवडणूक लढवणाीर नसल्याचे शरद पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी जाहीर केले. शरद पवार यांच्याशी बैठक झाल्यानंतर त्यांनी ही भूमिका प्रसार माध्यमांसमोर मांडली. तर राहुरी पोट निवडणुकीसंदर्भात आज बैठक झाली. चर्चा करुन त्याविषयीचा निर्णय घेतला जाईल असे शिंदे म्हणाले. राहुरी लढवण्यासासंदर्भात मविआ सोबत चर्चा सुरू असल्याचे ते म्हणाले.

पोटनिवडणुकीत उमेदवार देण्याचा काँग्रेसची भूमिका हा त्यांचा अधिकार आहे. आमची त्यांच्याशी चर्चा सुरू आहे. शरद पवार यांच्याशी बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या बाबतीत चर्चा केली आहे. अजित दादा यांचं निधन झालं तेव्हाच आम्ही ठरवलं की लढवणार नाही. प्राजक्त तनपुरे यांच्याशी चर्चा झाली ते आज शरद पवार आणि जयंत पाटील यांच्याशी आज बोलणं होईल असे ते म्हणाले.

खरातप्रकरणावरून अचूक निशाणा

खरातचं प्रकरण कुणाकडे लक्ष करण्यासाठी आहे. कुणी जाविवपूर्णक हे सीडिआर काढले का. हे सीडीआर कुणी देताय का? ह्याचा खुलासा करणे गरजेचे आहे, असे शशिकांत शिंदे म्हणाले. सातऱ्यात भाजपने आमच्या लोकांना फोडले आणि दुसऱ्या पक्षातील लोकांना संधी देता. कर्णे आणि त्यांच्या पत्निला ऑफर आहे. 10 कोटी आणि सभापती अशी ऑफर दिली जात आहे, असा खळबळजनक आरोप शिंदे यांनी केला. तर जय पवार यांच्या कालच्या विधानावर त्यांनी भाष्य करणे टाळले

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Maharashtra Live News : दिवसभरातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स पाहा एका क्लिकवर

Sunil Tatkare: जयंत पाटलांसोबत भेट झाली? सुनील तटकरे यांनी अखेर सगळं काही सांगितलं… घडलं काय?

एकनाथ शिंदे दिल्ली दाैऱ्यावर, ओमराजे निंबाळकर की संजय जाधव कोणाला मिळणार मंत्रिपद, घडामोडींना वेग..

Maharashtra Weather Updates Rain Marathi News: राज्यभरात विश्रांती घेतलेल्या पावसाला पुन्हा सुरुवात; कुठेकुठे मान्सून सक्रिय होणार, A टू Z माहिती

Dattatray Bharne: देवेंद्र फडणवीस केंद्रात गेले तर राज्याचे नेतृत्व कोण करणार? कृषिमंत्र्यांनी बोलून दाखवली मनातील इच्छा; म्हणाले…

BJP-Sharad Pawar NCP : भाजप आणि शरद पवारांची राष्ट्रवादी आले एकत्र, नगरपालिकेत फिरला गेम