टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Abbas Araghchi: ‘उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही’; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा

Abbas Araghchi: प्रत्येक पूल आणि इमारत पुन्हा अधिक भक्कमपणे उभारली जाईल. मात्र, ज्याची कधीही भरपाई होणार नाही, ती गोष्ट म्हणजे, अमेरिकेच्या प्रतिष्ठेला पोहोचलेली हानी, असेही अराघची यांनी म्हटलं आहे.

Abbas Araghchi: इस्त्रायल आणि अमेरिकेकडून इराणमधील नेतृत्व संपवल्यानंतर, लष्करी ठिकाणे टार्गेट करून झाल्यानंतर आता दवाखाने, वैद्यकीय रिसर्च संस्था, विद्यापीठे, पायाभूत सुविधा टार्गेट थेटपणे टार्गेट केल्या आहेत. इराणने हा युद्ध गुन्हे असल्याचे सांगत अवघ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. अमेरिका आणि इस्रायलने इराणच्या करज शहरातील बी1 पुलावर एकदा नव्हे, तर दोनदा हल्ला केला. या हल्ल्यांमध्ये दोन जण ठार झाले आणि निर्माणधीन पूल मध्येच पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. यावर्षी उद्घाटन झालेल्या या पुलाला मध्य पूर्वेतील सर्वात उंच पूल मानले जात होते. सुमारे 1050 मीटर लांब आणि 136 मीटर उंच असलेल्या या पुलाच्या बांधकामासाठी अंदाजे 400 दशलक्ष डॉलर्स (अंदाजे 3800 कोटी रुपये) खर्च आला आहे.

उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण..

पूल टार्गेट करण्यात आल्यानंतर इराणचे परराष्ट्र मंत्री अब्बास अराघची (Abbas Araghchi) यांनी दिलेल्या प्रतिक्रियेनं अवघ्या जगाचं लक्ष वेधलं आहे. त्यांनी म्हटलं आहे की, उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची परत संधी मिळणार नाही. अराघची ट्विट करत म्हणतात, अपूर्ण पुलांसह इतर नागरी वास्तूंवर हल्ले केल्याने, इराणी जनता शरणागती पत्करण्यास भाग पडणार नाही. या कृतीतून केवळ, विस्कळीत झालेल्या शत्रूचा पराभव आणि नैतिक अधःपतनच दिसून येते. प्रत्येक पूल आणि इमारत पुन्हा अधिक भक्कमपणे उभारली जाईल. मात्र, ज्याची कधीही भरपाई होणार नाही, ती गोष्ट म्हणजे, अमेरिकेच्या प्रतिष्ठेला पोहोचलेली हानी.

 

अमेरिकेला थेट आणि रोखठोक प्रत्युत्तर

परराष्ट्र मंत्री अराघची इराणची बाजू आंतरराष्ट्रीय स्तरावर खंबीरपणे मांडत आहेत. यापूर्वी गाझा आणि लेबनॉनमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, अराघची यांनी केवळ राजनैतिक पातळीवरच नाही, तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनही इस्रायल आणि अमेरिकेला थेट आणि रोखठोक प्रत्युत्तर दिले आहे. त्यांनी अनेकदा स्पष्ट केले आहे की, इराण युद्धाची सुरुवात करणार नाही, परंतु जर त्यांच्यावर हल्ला झाला, तर त्याचे प्रत्युत्तर अत्यंत भीषण असेल. इस्रायलकडून होणाऱ्या सायबर हल्ल्यांना किंवा लष्करी कारवाईला अराघची यांनी लाल रेषा ओलांडणे म्हटले आहे.

विशेषतः अमेरिकेच्या भूमिकेवर त्यांनी सातत्याने टीका केली आहे. “अमेरिका इस्रायलला शस्त्रास्त्रे आणि राजकीय पाठिंबा देऊन या प्रदेशात अशांतता पसरवत आहे,” असा आरोप त्यांनी अनेकदा केला आहे. अराघची यांची ही भूमिका, विशेषतः युरोपीय देशांशी संवाद साधताना, इराणच्या ‘प्रतिकाराच्या’ (Resistance Axis) भूमिकेला बळ देणारी ठरली आहे. गाझा युद्धाच्या सुरुवातीच्या काळात, त्यांनी अत्यंत स्पष्टपणे सांगितले होते की, जोपर्यंत गाझामध्ये शस्त्रसंधी होत नाही, तोपर्यंत प्रदेशात शांतता प्रस्थापित होणे अशक्य आहे. त्यांच्या या विधानाला अनेक अरब आणि इस्लामी देशांचा पाठिंबा मिळाला.

इस्रायलला ‘शिस्त’ लावण्याचे आवाहन

अराघची यांनी पाश्चात्य देशांना उद्देशून अनेकदा म्हटले आहे की, जर त्यांना खरंच प्रादेशिक युद्ध टाळायचे असेल, तर त्यांनी इस्रायलला ‘शिस्त’ लावली पाहिजे आणि त्यांच्या गुन्ह्यांकडे डोळेझाक करणे थांबवले पाहिजे. अराघची यांच्या आणखी एका ट्विटची  चर्चा झाली होती. ज्यामध्ये त्यांनी म्हटले होते की, इराणच्या संयमाची परीक्षा पाहू नका. आमची प्रत्युत्तर देण्याची क्षमता आणि दृढनिश्चय याबद्दल कोणतीही शंका नसावी, हे ट्विट थेट अमेरिकेला दिलेला इशारा मानले गेले.

कोण आहेत अब्बास अराघची?

अब्बास अराघची हे इराणच्या राजनैतिक वर्तुळातील अत्यंत अनुभवी आणि अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. ते इराणच्या इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्सचे निकटवर्तीय आहेत. ज्यामुळे त्यांना लष्करी आणि धोरणात्मक बाबींची चांगली समज आहे. त्यांनी यापूर्वी इराणच्या अणू कराराच्या (JCPOA) चर्चेत अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली होती.

मध्य पूर्वेत शस्त्रसंधीसाठी होणाऱ्या कोणत्याही आंतरराष्ट्रीय प्रयत्नांमध्ये अराघची यांची भूमिका अत्यंत कळीची ठरणार आहे. त्याचे कारण म्हणजे, ते केवळ इराणचे परराष्ट्र मंत्री नाहीत, तर हमास आणि हिजबुल्लाहसारख्या गटांशी इराणचे संबंध सांभाळणारे मुख्य दुवा आहेत. सद्यस्थितीत इराण नेतृत्वाची हत्या झाली असल्याने त्यांच्या संमतीशिवाय किंवा त्यांच्या मध्यस्थीशिवाय कोणताही दीर्घकालीन शस्त्रसंधी करार प्रत्यक्षात येणे कठीण आहे. भविष्यात इराण आणि अमेरिका किंवा इराण आणि इस्रायल यांच्यात द्विपक्षीय चर्चा सुरू झाली, तर अराघची हे इराणचे सर्वात विश्वासार्ह आणि सक्षम वार्ताकार असतील. त्यांच्याकडे राष्ट्रीय हितसंबंधांचे रक्षण करण्याची क्षमता आहे, आणि त्याच वेळी ते राजनैतिक चौकटीत राहून तडजोड करण्याचे कौशल्य सुद्धा आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्‍यांना काय होणार फायदा?

Tata Tiago 2026 : मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी

सांगोल्याचा पुढील आमदार शहाजीबापू पाटीलच होणार; स्थानिक निवडणुकांच्या बेरजेनुसार शिवसेनेचे पारडे जड: उदय सामंत

US Attack Iran : ज्याची भिती होती, तेच घडलं, तीन दिवसात अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला

Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर