टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

मोठी बातमी! अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी, थेट म्हटले, याला..

भोंदू अशोक खरात प्रकरणात धक्कादायक खुलासे होत आहेत. काही राजकीय लोकांसोबत खरातचे जवळचे संबंध असल्याने मोठी खळबळ उडाली. यादरम्यानच आता सुनील तटकरे यांनी खरातबद्दल अत्यंत मोठी मागणी केली.

मोठी बातमी! अशोक खरात प्रकरणात सुनील तटकरे यांची सर्वात मोठी मागणी, थेट म्हटले, याला..
भोंदू अशोक खरात प्रकरणामुळे राज्य हादरून गेले. धक्कादायक व्हिडीओ खरातची व्हायरल होत आहेत. हजारोंच्या घरात खरातने महिलांवर अत्याचार केला. महिला मानसिक धक्क्यात आहेत. काही मोबाईल फोन खरात वापरत, त्या फोनमध्ये महिलांचे नंबर इतर नावाने सेव्ह असत. अशोक खरात याला अजिबात सोडू नये, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी सातत्याने केली जात आहे. यादरम्यानच या प्रकरणावर बोलताना राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी मोठी मागणी केली. सुनील तटकरे यांनी म्हटले की, भोंदू अशोक खरातला फाशी दिली पाहिजे. खरात असो कोणीही असो विकृत मनोवृत्तीच्या लोकांना ठेचून फाशीची शिक्षा द्यावी, हे प्रकरण जलद गती न्यायालयात चालवावे.

पुढे बोलताना त्यांनी म्हटले की, सरकारने एसआयटीच्या माध्यमातून भोंदू अशोक खरात प्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि ज्यांचा ज्यांचा या प्रकरणाशी संबंध आला त्यांच्यावर कठोर कारवाई करावी असेही सुनील तटकरे यांनी म्हटले. बारामती विधानसभा पोटनिवडणुकीबद्दल बोलताना त्यांनी म्हटले की, बारामतीची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी म्हणून तुळजाभवानीला साकडे घातले.

जय पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल केलेल्या विधानावर बोलताना सुनिल तटकरे यांनी म्हटले की, अजित पवारांच्या अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत आम्ही समाधानी नाहीत. जय पवार अगोदरच पत्रकार परिषद घेणार होते. त्यांनी बारामतीलाच खुलासा केला आहे. राष्ट्रवादीच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही या प्रकरणाची एसआयटी चौकशी व्हावी अशी मागणी केली आहे.

अपघाताच्या प्राथमिक अहवालाबाबत आम्ही कोणीही समाधानी नाहीत, या प्रकरणात ज्या ज्या राजकीय प्रतिनिधींनी ज्या ज्या प्रकारे तपास करण्याची मागणी केली आहे त्या प्रकारे तपास समोर यावा अशी आमची मागणी आहे. बारामती विधानसभेची पोटनिवडणुक बिनविरोध व्हावी, याकरिता प्रयत्न केली जात आहेत. काल उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बिनविरोध निवडणूक व्हावी, याकरिता उद्धव ठाकरे यांना फोन केला होता. शिवसेना शिंदे गटानेही निवडणूक बिनविरोध घेण्याची भूमिका घेतली.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Abbas Araghchi: ‘उड्डाणपूल पुन्हा बांधता येतील, पण अमेरिकेला धडा शिकवण्याची संधी पुन्हा मिळणार नाही’; इराणच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या वक्तव्याची जगभरात चर्चा

Bioluminescent Beaches : भारतातील हे 5 समुद्र किनारे रात्रीचे चमकतात, दिसतो विलोभनीय नजारा

Gold Price Today : सोने स्वस्त उच्चांकापेक्षा, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..

मोठी बातमी! सुनेत्रा पवारांना मोठा धक्का? 15-20 आमदार शरद पवारांच्या संपर्कात, मंत्र्यांनेही घेतली भेट; मोठा भूकंप होणार?

Satara Jilha Parishad: ‘गेटपास घेऊन आलो तरी मतदानाला जाऊ देईनात’ सातारच्या झेडपी सभापती निवडीतही वाद; शिंदेसेनेच्या टोकाच्या विरोधानंतरही भाजपनं आणखी सदस्य फोडला

Nashik Accident News : घराची ओढ असलेल्यांचा कारमध्येच गुदमरला श्वास, दिंडोरीत कार विहिरीत कोसळून 9 जणांचा मृत्यू