टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Gold Price Today : सोने स्वस्त उच्चांकापेक्षा, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..

On: April 5, 2026 1:06 PM
Follow Us:

Gold Price Today : सतत सोने आणि चांदीच्या भावामध्ये चढउतार बघायला मिळत आहे. मागील काही दिवसांच्या तुलनेत सोने आणि चांदीच्या किमती घसरताना दिसत आहेत. जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे भाव.

Gold Price Today : सोने स्वस्त उच्चांकापेक्षा, जाणून घ्या आजचे सोने आणि चांदीचे नवीन दर..

इराण आणि अमेरिका युद्ध सुरू झाल्यापासून सोने आणि चांदीच्या भावात सतत चढउतार बघायला मिळत आहेत. सोने त्याच्या उच्चांकापेक्षा खूप स्वस्त झाले. जागतिक बाजारात सोन्याच्या किमती अस्थिर झाल्या. सतत सोन्याच्या किमतीमध्ये बदल होत आहेत. युद्ध सुरू होण्यापूर्वी सोन्याच्या किमती गगणाला पोहोचल्या होत्या. आता किमती उतरल्या आहेत. गेल्या चार ते पाच दिवसांचा विचार करता आज सोन्याचे भाव वधारल्याचे बघायला मिळाले. गुडरिटर्न्सच्या आकडेवारीनुसार, कालच्या तुलनेत आज देशात सोन्याच्या दरात काही विशेष बदल झाला नाही. सतत सोन्याच्या भावात चढउतार बघायला मिळत असताना आता कुठे सोन्याचे भाव स्थिर दिसत आहेत. आज, 1 ग्रॅम 24 -कॅरेट सोन्याची किंमत 15,093 आहे. 8 ग्रॅमची किंमत 1,20,744, तर 10 ग्रॅमची किंमत 1,50,930 आहे.  पण सोन्याच्या उच्चांकाच्या तुलनेत आजही सोने स्वस्त असल्याचे बघायला मिळतंय.

भारतात चांदीचे दर प्रति ग्रॅम 250 रुपये आणि प्रति किलोग्रॅम 2,50,000 रुपये कायम आहेत. मुंबई, पुणे , कोलकाता, दिल्ली बंगळूर, अहमदाबाद यांसारख्या शहरांमध्ये 10 ग्रॅम चांदीचा भाव 2,500 रुपये, 100 ग्रॅमचा 25,000 रुपये आणि एक किलोग्रॅमचा भाव 2,50,000 रुपये आहे. पुढील काही दिवसात सोने आणि चांदीच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे.

गेल्या आठवड्यातील सोने आणि चांदीचे भाव बघता, या आठवड्यात सोने आणि चांदीचे भाव वधारले आहेत. अमेरिकेने युद्ध अधिक घातक होणार असल्याची धमकी दिल्यानंतर सोने आणि चांदीचे भाव घसरताना दिसले. युद्ध पेटलेले आहे, पण सध्या भाव स्थिर दिसत आहेत. जर युद्ध अधिक भडकले तर कदाचित सोने आणि चांदीचे भाव कमी होण्याची शक्यता आहे.

जर युद्धबंदीची घोषणा झाली तर पुन्हा एकदा पूर्वीप्रमाणे सोने आणि चांदीचे भाव वाढण्याची शक्यता आहे. सध्याच्या घडीला सोने आणि चांदीचे भाव त्याच्या उच्चांकापेक्षा तसे कमी आहेत. सोने आणि चांदी खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असल्याचे सांगितले जाते. मे महिन्यात सोने आणि चांदीचे भाव वाढू शकतात. एक दोन आठवड्यात युद्धबंदीबद्दल मोठी घोषणा होण्याची शक्यता आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now