टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

PM Kisan Yojana: मोठी आनंदवार्ता! पीएम किसानचा 23 वा हप्ता या दिवशी जमा होणार; Status असं चेक करा

PM Kisan Yojana 23rd installment: पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता नुकताच जमा झाला. तर उन्हाळी कामे आणि अवकाळीचा तडाखा यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. त्यांचे आर्थिक गणित पार कोलमडले आहे. अशावेळी नुकसान भरपाईसह 23 वा हप्ता कधी मिळणार याविषयी शेतकऱ्यांमध्ये चर्चा सुरू आहे.

PM Kisan Yojana: मोठी आनंदवार्ता! पीएम किसानचा 23 वा हप्ता या दिवशी जमा होणार; Status असं चेक करा

PM Kisan Yojana 23rd installment: देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचा 22 वा हप्ता नुकताच मिळाला. तर ऐन उन्हाळ्यात पावसाळ्याने अधिक्रमण केले. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. गव्हासह अनेक पिकांचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे शेतकऱ्यांनी पंचनाम्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली आहे. त्यासोबतच शेतकऱ्यांना आता पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेच्या 23 व्या हप्त्याची सुद्धा प्रतिक्षा लागलेली आहे. सरकार या योजनेत दरवर्षी 6,000 रुपये खात्यात जमा करते. 2,000 रुपये तीन टप्प्यात जमा करण्यात येतात. पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेची रक्कम ही थेट डीबीटी (DBT) पद्धतीने शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येते. आता शेतकऱ्यांचे लक्ष हे 23 व्या हप्त्याकडे लागलेले आहे. त्यांना हा हप्ता कधी जमा होईल याची उत्सुकता लागलेली आहे.

कधी येणार 23 वा हप्ता ?

पीएम किसान योजनेचा हप्ता हा चार महिन्यांच्या अंतराने जमा होतो. योजनेचा 22 वा हप्ता मार्च महिन्यात जमा झाला होता. त्यामुळे चार महिन्यांच्या अंतराने हा 23 वा हप्ता जुलै 2026 मध्ये जमा होण्याची शक्यता आहे. सरकारने याविषयीची कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. योजनेत हप्ता अगोदर जाहीर करण्यात येतो आणि पंतप्रधान देशातील कानाकोपऱ्यात असले तरी एका क्लिकवर हा पैसा धडाधड देशातील कोट्यवधी शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होतो.

या शेतकऱ्यांना नाही होणार फायदा

अर्थात या योजनेत बोगस लाभार्थी घुसू नये यासाठी सरकार डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवते. त्यासाठी सातत्याने काही प्रक्रिया कराव्या लागतात. जे शेतकरी ई-केवायसी(e-KYC) आणि भू-सत्यापन (Land Verification) सारखी प्रक्रिया दरवेळी पूर्ण करत नाही. त्यांच्या खात्यात पीएम किसान योजनेची रक्कम जमा होत नाही. तर आधार कार्ड बँक खात्याशी लिंक नसेल, केवायसी अपूर्ण असेल तर जुलै महिन्यात जमा होणारा हप्ता परत जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांनी याबाबतीत कोणताही हलगर्जीपणा करू नये असे आवाहन करण्यात येते.

असे करा स्टेट्‍स चेक

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेचा 23 वा हप्ता पात्र शेतकऱ्यांना चार महिन्यांनी मिळेल. ज्या शेतकऱ्यांचे नाव लाभार्थ्यांच्या यादीत असेल, त्यांच्या खात्यात दोन हजार जमा होतील. या योजनेचा फायदा होईल की नाही हे तुम्हाला घर बसल्या तपासता येईल.

त्यासाठी अगोदर pmkisan.gov.in या वेबसाईटवर जा. शेतकरी कॉर्नर हा पर्याया निवडा. त्यानंतर लाभार्थ्यांच्या यादीवर जा. याठिकाणी तुमचा आधार क्रमांक, खाते क्रमांक टाका. आता “Get Data” वर क्लिक करा. लागलीच पेमेंट स्टेट्सवर क्लिक करून चेक करा.

ई-केवायसी पूर्ण झाली असेल तर लाभार्थ्याला रक्कम मिळण्यास अडचण येत नाही. खात्यासोबत आधार कार्ड लिंक करणे आवश्यक आहे. तर एग्रीस्टॅक या पोर्टलवर जाऊन नोंदणी करणे ही सरकारने अत्यावश्यक केले आहे. तरच खात्यात पैसा येईल.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेविषयी काही अडचण असल्यास शेतकर्‍यांनी हेल्पलाईन क्रमांक 1800-115-5525 वर संपर्क करावा. या ठिकाणी त्यांच्या प्रश्नांचे निरसन होण्यास मदत होईल.

हे सुद्धा वाचा

cucumber : काकडीला आरोग्याचे पावर हाऊस का म्हणतात?

Fitness Test : तुमच्या वयोगटानुसार सलग इतकी मिनिटं पळू शकता का ? तुम्हाला लगेच कळेल तुमची फिटनेस लेवल

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

मोठी बातमी! भाजपकडून विधान परिषदेसाठी पहिला उमेदवार ठरला, या नेत्याच्या नावाची घोषणा

पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट… फडणवीसांनी काय केली मोठी मागणी? शेतकर्‍यांना काय होणार फायदा?

Tata Tiago 2026 : मध्यमवर्गीयांसाठी टाटाची स्वस्त कार लॉन्च, सेफ्टीमध्ये बेस्ट, पेट्रोल-CNG-EV एकत्र, किंमत सुद्धा परवडणारी

सांगोल्याचा पुढील आमदार शहाजीबापू पाटीलच होणार; स्थानिक निवडणुकांच्या बेरजेनुसार शिवसेनेचे पारडे जड: उदय सामंत

US Attack Iran : ज्याची भिती होती, तेच घडलं, तीन दिवसात अमेरिकेचा इराणवर दुसरा मोठा हल्ला

Gold Price Today : सोन्याची गुड न्यूज, किंमत सुळ्ळकन खाली, सराफा बाजारात उलटफेर.. आज खरेदीसाठी दर