टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

NCP मध्ये घमासान ! पटेल-तटकरे यांच्या अडचणीत वाढ? सुनेत्रा पवार दिल्लीत, मोठा निर्णय घेणार?

सुनेत्रा पवार

Sunetra Pawar on Sunil Tatkare-Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेतील बदलाने सध्या काहूर उठले आहे. कार्याध्यक्षाकडे अध्यक्षासारखे अधिकार देण्याचा बदल वादाचा मुद्दा ठरल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान याप्रकरणी पटेल आणि तटकरे यांच्या अडचणी वाढणार का की या केवळ चर्चा आहेत, याविषयीचे खुलासे लवकरच समोर येतील. पण दिल्लीत मोठ्या घडामोडी घडत आहेत.

NCP मध्ये घमासान! पटेल-तटकरे यांच्या अडचणीत वाढ? सुनेत्रा पवार दिल्लीत, मोठा निर्णय घेणार?

Sunetra Pawar on Sunil Tatkare-Praful Patel: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेत बदलावरून वातावरण तापले आहे. कार्याध्यक्षाला अध्यक्षासारखे अधिकार बहाल करण्याचा मुद्दा कळीचा ठरला आहे. यावरून पक्षातील वरिष्ठांमध्ये नाराजी असल्याची माहिती समोर येत आहे. पक्षचं हायजॅक करण्याचा काहींचा प्रयत्न असल्याचा आरोप सातत्याने करण्यात येत असताना नवीन अपडेटमुळे पक्षात घमासान सुरू असल्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल यांच्या अडचणी वाढण्याच्या चर्चांना हवा मिळाली आहे. अर्थात या केवळ चर्चा आहेत की खरंच पक्षात मोठी नाराजी आहे हे खुलासा आल्यावरच समोर येईल. पण सध्या दिल्लीत मोठ्या घडामोडी सुरू असल्याचे समोर येत आहे.

सुनेत्रा पवार त्या उत्तरावर असमाधानी?

राष्ट्रवादी पक्षाच्या घटनाबदलाबाबत पटेल आणि तटकरे यांनी सुनेत्रा पवार यांच्याकडे स्पष्टीकरण दिले आहे. तर या दोन्ही नेत्यांच्या स्पष्टीकरणावरती सुनेत्रा पवार या असमाधानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. पक्षाच्या घटनेत बदल करून अध्यक्षांसोबत कार्याध्यक्षांकडे अधिकार द्यावेत असे पत्र पटेल आणि तटकरे यांनी निवडणूक आयोगाला दिले होते. 16 फेब्रुवारी 2026 रोजी असा पत्र व्यवहार झाला होता. अजितदादांचा विमान अपघात 28 जानेवारी रोजी झाला होता. त्यानंतर हा पत्रव्यवहार करण्यात आला. या पत्रानंतर सुनेत्रा पवार यांनी निवडणूक आयोगाला हे सर्व पत्र व्यवहार अमान्य समजावेत आणि त्याकडे दुर्लक्ष करावेअ असं पत्र पाठवले होते. 10 मार्च रोजी सुनेत्रा पवार यांनी पक्षाची भूमिका निवडणूक आयोगाला कळवली.

या पत्रव्यवहारानंतर बरेच वादंग झाले. सोमवारी वांद्रयात सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ आणि छगन भुजबळ यांच्यात बैठक झाली. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत केलेल्या बदलाबाबत सुनेत्रा पवार यांना स्पष्टीकरण द्यावं असे ठरवण्यात आले. त्याप्रमाणे मंगळवारी सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, धनंजय मुंडे आणि मुश्रीफ यांनी सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना याविषयीचे स्पष्टीकरण दिले. पण या स्पष्टीकरणावर सुनेत्रा पवार असमाधानी असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

सुनेत्रा पवार दिल्लीत

दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या दिल्ली दौर्‍यावर आहेत. त्या आज बड्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीतील अंतर्गत घडामोडी घडत असताना सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. या दौऱ्यात त्या काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. तर दुसरीकडे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी तटकरे आणि पटेल यांच्याविरोधात आता मोर्चा उघडल्याचे दिसून येत आहे. ते या दोन्ही नेत्यांवर सातत्याने आरोप करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

महाडीबीटीच्या अनुदानाबद्दल सरकारचा अत्यंत मोठा निर्णय, नवीन नियम लागू, थेट..

रणजीतसिंह निंबाळकर, केशव उपाध्ये, माधवी नाईक…; विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, कोणाला लागणार लॉटरी?

लाडकी बहीण योजनेतून तब्बल 71 लाख महिलांना डच्चू, एका चुकीने घातला घोळ, आता कारवाई होणार

भाजपची सर्वात मोठी खेळी… या नेत्याला दिलं विधानसभा पोटनिवडणुकीचं तिकीट; विरोधकांचं टेन्शन वाढलं

Vijay Shivtare : मृत्यूशी झुंजणाऱ्या विजय शिवतारेंना नवजीवन, डॉक्टर लेकीकडून किडनीदान, मुंबईत प्रत्यारोपण शस्त्रक्रिया

Sanjay Raut: आदित्य ठाकरेंची मोहित कंबोजांच्या लेकीच्या वाढदिनाला हजेरी, मग आता एकनाथ शिंदेंच्या सुद्धा कार्यक्रमाला जाणार का? संजय राऊत काय काय म्हणाले??