टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

रणजीतसिंह निंबाळकर, केशव उपाध्ये, माधवी नाईक…; विधान परिषदेसाठी भाजपमध्ये इच्छुकांची भाऊगर्दी, कोणाला लागणार लॉटरी?

Vidhan Parishad Election 2026: 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या रिक्त होणाऱ्या जागांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे.

Vidhan Parishad Election 2026: राज्यातील राजकारण आता आगामी विधान परिषद निवडणुकीच्या (Vidhan Parishad Election 2026) निमित्ताने पुन्हा एकदा तापू लागले आहे. 13 मे 2026 रोजी विधान परिषदेच्या 9 सदस्यांचा कार्यकाळ संपत असून, या रिक्त होणाऱ्या जागांसाठी राजकीय मोर्चेबांधणीला वेग आला आहे. एप्रिलच्या तिसऱ्या आठवड्यात या निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता असल्याने भाजपमध्ये उमेदवारी मिळवण्यासाठी मोठी चढाओढ सुरू झाली आहे.

विधानसभेतील सध्याचे संख्याबळ पाहता, भाजपचे 5 उमेदवार निवडून येऊ शकतात. मात्र, पक्षाकडे इच्छुकांची यादी खूप मोठी आहे. विशेषतः ज्या नेत्यांना नुकत्याच झालेल्या राज्यसभा निवडणुकीत संधी मिळाली नाही, त्यांनी आता विधान परिषदेसाठी ‘फिल्डिंग’ लावायला सुरुवात केली आहे.

BJP Vidhan Parishad Election 2026: चर्चेतील प्रमुख नावे 

केशव उपाध्ये, माधवी नाईक, रणजीत सिंह निंबाळकर, राम सातपुतेंसोबतच आणखी काही परिषदेसाठी इच्छुक असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तर भाजपचे चार आमदार सध्या निवृत्त होत आहेत. रणजीतसिंह मोहिते पाटील, संदीप जोशी, दादाराव केचे आणि संजय केणेकर या आमदारांचा यात समावेश आहे. यापैकी कोणाला पुन्हा संधी मिळते की पक्षाकडून नवीन चेहऱ्यांना वाव दिला जातो, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

दरम्यान, विधान परिषदेचा एक आमदार निवडून येण्यासाठी 28 मतांचा कोटा आवश्यक आहे. महायुतीत भाजप (131 आमदार), एकनाथ शिंदे यांची शिवसेना (57 आमदार) आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी (40 आमदार) असे बलाबल पाहता महायुतीचे 8 उमेदवार सहज निवडून येऊ शकतात. तर महाविकास आघाडीचे एकूण संख्याबळ 46 आहे. त्यामुळे त्यांचा केवळ एकच उमेदवार सहज निवडून येऊ शकतो. दुसऱ्या जागेसाठी त्यांना 10 मतांची जुळवाजुळव करावी लागेल, जे सध्याच्या स्थितीत कठीण दिसत आहे.

BJP Vidhan Parishad Election 2026: विधान परिषदेतून नऊ सदस्य होणार निवृत्त

भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केनकर, संदीप जोशी, दादाराव केचे, उद्धव ठाकरे (शिवसेना उबाठा), नीलम गोऱ्हे (शिवसेना), शशिकांत शिंदे (राष्ट्रवादी शप), अमोल मिटकरी (राष्ट्रवादी काँग्रेस), राजेश राठोड हे सदस्या विधान परिषदेतून निवृत्त होणार आहेत.

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या उमेदवारीवर सस्पेन्स

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही कार्यकाळ 13 मे रोजी संपत आहे. महाविकास आघाडीच्या वाट्याला केवळ एकच जागा येणार असल्याने, ती जागा उद्धव ठाकरेंसाठी सोडली जाणार का? ठाकरे गटाचे 20 आमदार असल्याने त्यांचा या जागेवर दावा आहे, मात्र काँग्रेस आणि शरद पवार यांची राष्ट्रवादी काय भूमिका घेते? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

BJP Vidhan Parishad Election 2026: एप्रिलमध्ये होणार निवडणुकीची घोषणा 

विधीमंडळाच्या शेवटच्या अधिवेशनात निवृत्त होणाऱ्या सदस्यांना निरोप देण्यात आला. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात रंगलेली जुगलबंदी निवडणुकीच्या संघर्षाची नांदी मानली जात आहे. एप्रिल महिन्यात निवडणूक जाहीर झाल्यानंतर खऱ्या अर्थाने गुप्त हालचालींना वेग येईल. भाजपमधील अंतर्गत स्पर्धा आणि महायुतीतील जागावाटप यामुळे ही निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Vidhan Parishad Election 2026 : पुण्यातील राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा संपला! ‘जिजाई’वर पार्थ पवारांची शिष्टाई यशस्वी, सुनील टिंगेरेंची विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार

Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

Rohit Pawar on Shiv Sena Merger: शिंदेंची शिवसेना अन् अजितदादांची राष्ट्रवादी म्हणजे दात नसलेले वाघ, ते फक्त गुरगुरतात; रोहित पवारांचा खोचक टोला

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

90 किमी वेगाने वादळ, 17 राज्य धोक्यात, पुढील 8 तास संकटाची, अतिमुसळधार पावसासह..

Ladki Bahin Yojana : लाडकी बहीण योजनेतून त्या महिला का झाल्या अपात्र? 7 महत्त्वाची कारणे आली समोर, पाचवं आणि सातवं कारण सर्वात महत्त्वाचं