टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Rohit Sharma ला मुंबई इंडियन्सकडून नवा रोल, प्लेइंग-11 मधून OUT…

Follow Us:

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2026 : भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा आयपीएल 2026 मध्ये धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे.

Rohit Sharma Mumbai Indians IPL 2026 : भारताचा स्टार क्रिकेटपटू रोहित शर्मा (Rohit Sharma) आयपीएल 2026 मध्ये (IPL 2026) धडाकेबाज कामगिरी करण्यासाठी सज्ज झाला आहे. 28 मार्चपासून सुरू होणाऱ्या आयपीएलमध्ये हिटमॅन मुंबई इंडियन्ससाठी (Mumbai Indians) धावांचा पाऊस पाडताना दिसणार आहे. मात्र, त्याआधीच एक मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी रोहित शर्मा आणि मुंबई इंडियन्सशी संबंधित आहे.

रोहितला प्लेइंग-11 मध्ये स्थान नाही ?

आयपीएल 2026 सुरू होण्यापूर्वी मुंबई इंडियन्सने रोहित शर्माबाबत एक वेगळाच प्लॅन तयार केल्याची माहिती समोर येत आहे. या प्लॅननुसार, रोहितला थेट प्लेइंग-11 मध्ये स्थान दिले जाणार नाही. म्हणजेच, तो नियमित 11 खेळाडूंमध्ये दिसणार नाही, ही बाब चाहत्यांसाठी मोठा धक्का ठरू शकते.

नवा रोल, नवी रणनीती! इम्पॅक्ट प्लेयर म्हणून एंन्ट्री (Rohit Sharma Mumbai Indians IPL 2026)

मुंबई इंडियन्स रोहितला एका नव्या आणि खास भूमिकेत मैदानात उतरवण्याच्या तयारीत आहे. भारताचा माजी कर्णधार असलेला हा स्फोटक फलंदाज आता वेगळ्या रणनीतीसह संघासाठी योगदान देताना दिसू शकतो. मिळालेल्या माहितीनुसार, रोहित शर्माला आयपीएल 2026 मध्ये ‘इम्पॅक्ट प्लेयर’ म्हणून वापरण्याचा विचार आहे. म्हणजेच तो 12वा खेळाडू म्हणून संघात असणार आहे. गरजेनुसार त्याला मैदानात उतरवले जाईल आणि तो आपल्या फलंदाजीने सामना फिरवू शकतो.

फक्त बॅटिंगवर फोकस  

रोहितचे वय आता 38 वर्षे झाले आहे. त्यामुळे वेगवान क्रिकेटमध्ये फील्डिंग करताना त्याच्यावर अतिरिक्त ताण येऊ नये, यासाठी त्याचा प्रामुख्याने फलंदाज म्हणून वापर केला जाईल. आयपीएल 2025 मध्येही काही सामन्यांमध्ये अशी रणनीती पाहायला मिळाली होती.

रोहितचा आयपीएल प्रवास (Rohit Sharma IPL 2026)

रोहित शर्माने आतापर्यंत आयपीएलमध्ये 272 सामने खेळले आहेत. त्याच्या नावावर 2 शतके आणि 47 अर्धशतके आहेत. त्याने 267 डावांमध्ये 29.7 च्या सरासरीने आणि 132.1 च्या स्ट्राईक रेटने 7046 धावा केल्या आहेत. यामध्ये 640 चौकार आणि 302 षटकारांचा समावेश आहे. रोहितने मुंबई इंडियन्सला तब्बल 5 वेळा विजेतेपद मिळवून दिले आहे, जे त्याच्या नेतृत्वगुणांचे मोठे उदाहरण आहे.

हे ही वाचा –

Solapur Rain : महाराष्ट्रावर ‘अवकाळी’ संकट, गारपीट अन् पावसाच्या तडाख्यानं उभी पिकं झाली आडवी; बळीराजाला रडू कोसळलं

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

वैभव सूर्यवंशी याच्यासोबत श्रीलंकेच्या खेळाडूने केले नीच कृत्य, धक्कादायक प्रकार, थेट घरी जा..

Rahmanullah Gurbaz: अफगाणिस्तानचा रहमानुल्ला गुरबाज धर्मशालात पावसानंतर टीम इंडियावर धो धो कोसळला! अवघ्या 48 चेंडूत शतक ठोकत केला भीम पराक्रम, भारताविरुद्ध शाहीद आफ्रिदीनंतर दुसरं वेगवान शतक

Vaibhav Sooryavanshi : श्रीलंकेविरुद्ध जे जमलं नाही ते वैभवने अफगाणिस्तान विरुद्ध करुन दाखवलं, मोठी इनिंग खेळू शकला नाही, पण..

IND vs AFG : केएल-शुबमनचं कडक शतक, टीम इंडियाच्या पहिल्या दिवशी अफगाणिस्तान विरुद्ध 368 धावा

Team India T20I Squads : BCCI कडून आयर्लंड अन् इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा; श्रेयस अय्यर कर्णधार, तर 15 वर्षीय वैभव सूर्यवंशीला संधी

Vaibhav Sooryavanshi : हात जोडतो, लांब राहा…; श्रीलंकेत पाऊल ठेवताच वैभव सूर्यवंशीचा पारा चढला; नेमकं काय घडलं? पाहा VIDEO