टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Odisha Government Hospital Fire: ओडिशात दवाखान्यात लागलेल्या 10 रुग्ण जिवंत जळाले, 11 कर्मचारी सुद्धा होरपळले

Follow Us:

Odisha Government Hospital Fire: हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात (ICU) लागलेल्या या आगीत किमान 10 रुग्णांचा मृत्यू झाला. 5 रुग्णांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. यामध्ये 11 कर्मचारी सुद्धा होरपळले.

 

पहाटेच्या सुमारास घडली दुर्घटना

मिळालेल्या माहितीनुसार, आज पहाटेच्या सुमारास जेव्हा रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक गाढ झोपेत होते, तेव्हा अचानक आयसीयू विभागातून धूर निघू लागला. काही वेळातच आगीने रौद्र रूप धारण केले. आयसीयूमध्ये गंभीर रुग्ण असल्याने आणि व्हेंटिलेटरसारखी उपकरणे कार्यान्वित असल्याने गोंधळ अधिक वाढला. धुराचे लोट आणि आगीच्या ज्वाळांमुळे रुग्णांना बाहेर काढणे कठीण झाले होते.

 

मुख्यमंत्री मोहन माझी यांच्याकडून पाहणी

घटनेची माहिती मिळताच ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन माझी यांनी तातडीने रुग्णालय गाठले. त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळाची पाहणी केली आणि जखमी रुग्णांची विचारपूस केली. मुख्यमंत्री माझी यांनी या घटनेवर तीव्र दुःख व्यक्त करत उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

बचावकार्य आणि स्थलांतर

हॉस्पिटलमधील कर्मचारी आणि अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून काही रुग्णांना सुखरूप बाहेर काढले. या रुग्णांना तातडीने त्याच आवारातील ‘न्यू मेडिसिन बिल्डिंग’ मध्ये स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, अग्निशमन दलाच्या गाड्यांनी काही तासांच्या प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Fight over Kittens : तुमच्या बोक्यामुळे आमची माऊ गरोदर, सांभाळा आता चार पिल्लं; मालकिणीने मांजरं भिरकावली, शेजाऱ्यांमध्ये वाद पेटला

Supriya Sule son in Law: सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक

Petrol Diesel Price hike: विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

भारतात हाहाकार! अरुणाचल प्रदेशबद्दल चीनचा झोप उडवणारा दावा, थेट म्हटले, ती जागा…

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली

थेट भर समुद्रात भारताने फिरवला गेम, चीन आणि पाकिस्तानच्या तोंडचे पळाले पाणी, थेट भारतात..