टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

DCM Sunetra Pawar: अजित पवारांच्या पावलावर पाऊल; सुनेत्रा पवारांचा बारामतीत ‘जनता दरबार’; लाडक्या बहिणींसह, वकिल, नागरिकांच्या समस्यांचे तात्काळ निराकरण, नागरिकांची गर्दी

Follow Us:

DCM Sunetra Pawar: सकाळी पावणे नऊ वाजल्यापासूनच सहयोग सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.

बारामती: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून, आज सकाळी त्यांनी ‘सहयोग’ या निवासस्थानी ‘जनता दरबार’ आयोजित केला होता. या माध्यमातून त्यांनी नागरिकांच्या समस्या थेट जाणून घेतल्या. विशेषतः ‘लाडक्या बहिणीं’च्या अडचणी सोडवण्यावर त्यांनी भर दिला असून, प्रशासकीय अधिकाऱ्यांना तात्काळ कार्यवाहीच्या सूचना दिल्या आहेत.(DCM Sunetra Pawar)

प्रश्नांचा निपटारा आणि नागरिकांची गर्दी

सकाळी पावणे नऊ वाजल्यापासूनच सहयोग सोसायटीतील त्यांच्या निवासस्थानी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बारामती तालुक्यातील विविध गावांतील लोक आपले प्रश्न मांडण्यासाठी आले होते. यामध्ये प्रामुख्याने महिलांची संख्या लक्षणीय होती. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील अडचणी, स्थानिक नागरी समस्या आणि इतर वैयक्तिक तक्रारी महिलांनी वहिनींसमोर मांडल्या. प्रत्येक तक्रारदाराचे म्हणणे संयमाने ऐकून घेत, सुनेत्रावहिनींनी उपस्थित अधिकाऱ्यांना हे प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याचे आदेश दिले.(DCM Sunetra Pawar)

यावेळी बारामती वकील संघटनेच्या सदस्यांनीही सुनेत्रावहिनींची भेट घेऊन व्यावसायिक प्रश्नांवर चर्चा केली. सामान्य नागरिकांच्या समस्या थेट ऐकून घेऊन त्या तातडीने सोडवल्या जात असल्याने उपस्थित नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.(DCM Sunetra Pawar)

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या ‘मानाची गदा’ पूजली

जनता दरबाराच्या दरम्यान, पुण्यातील वाघोली येथे आयोजित होणाऱ्या आगामी ‘महाराष्ट्र केसरी’ कुस्ती स्पर्धेच्या आयोजकांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली. स्पर्धेचे रीतसर निमंत्रण देण्यासाठी आयोजक बारामतीत आले होते.

यावेळी सुनेत्रावहिनींच्या हस्ते महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेतील मानाची गदा पूजण्यात आली. “कुस्ती ही महाराष्ट्राची समृद्ध परंपरा आहे. अशा प्रतिष्ठित स्पर्धांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील मल्लांना मोठे व्यासपीठ मिळते,” अशा भावना व्यक्त करत त्यांनी या स्पर्धेला शुभेच्छा दिल्या. महाराष्ट्राच्या कुस्ती परंपरेला सदैव प्रोत्साहन दिले जाईल, असे आश्वासनही त्यांनी यावेळी आयोजकांना दिले.(DCM Sunetra Pawar)

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा