Bcci Announce Prize Money For Team India : दोन दिवसांपूर्वी टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप 2026 ला गवसणी घातली. आता बीसीसीआयकडून टीम इंडियासाठी इनामी रक्कमेची घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयने जे इनाम जाहीर केलय, त्याने तुमचे डोळे चमकतील .

ICC मेन्स टी20 वर्ल्ड कप 2026 जिंकणाऱ्या भारतीय टीमवर पैशांचा पाऊस सुरु झाला आहे. भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड बीसीसीआयने टीम इंडियासाठी बक्षिसाच्या रक्कमेची घोषणा केली आहे. टीम इंडियाने रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर न्यूझीलंडवर 96 धावांनी विजय मिळवला. टीम इंडियाने सलग दुसऱ्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला. टीम इंडियाने आतापर्यंत तीनवेळा टी20 वर्ल्ड कप जिंकला आहे. अशी कामगिरी करणारी टीम इंडिया क्रिकेट विश्वातील एकमेव टीम आहे. टीम इंडियाच्या या दमदार प्रदर्शनानंतर बीसीसीआयकडून त्यांच्यासाठी काय घोषणा होते? त्यांना किती कोटींच पारितोषिक मिळणार? याची उत्सुक्ता होती. अखेर बीसीसीआयने आज त्या इनामी रक्कमेची घोषणा केली आहे.
बीसीसीआयकडून टी20 वर्ल्ड कप विजेत्या टीम इंडियाला 131 कोटी रुपये रोख रक्कमेच इनाम जाहीर करण्यात आलं आहे. बीसीसीआयकडून आज मंगळवारी ही घोषणा करण्यात आली.
(बातमी अपडेट होत आहे)






