टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अमोल कोल्हे-मधुराणी प्रभुलकर यांनी ‘मी सावित्रीबाई ..’ मालिका सोडली? मुख्य भूमिकेत भलतेच चेहरे, सत्य नेमकं काय?

Follow Us:

सावित्रीबाईंच्या शिक्षणाची वाट खुली करून देण्यासाठी ज्योतिरावांनी दाखवलेली दूरदृष्टी, समाजाच्या चौकटी मोडून स्त्री शिक्षणाची सुरुवात, चौकटी मोडण्याचा धैर्य वाखाणण्याजोगं आहे .

Mi Savitribai Jyotirao Phule: स्टार प्रवाहवरील ‘ मी सावित्रीबाई ज्योतीराव फुले ‘ ही मालिका सध्या प्रचंड लोकप्रिय झाली आहे. या मालिकेविषयी एकच चर्चा सुरू आहे. सावित्रीबाई आणि ज्योतिराव फुले यांच्या आयुष्यावर आधारित या मालिकेत सध्या मोठे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. प्रमुख भूमिका साकारणारे अभिनेते अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर या दोघांच्या ऐवजी प्रमुख भूमिकेत अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री राजश्री भावे दिसत असल्याने अमोल कोल्हे आणि मधुराणी प्रभुलकर यांनी मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले मालिका सोडली की काय ? अशा चर्चा रंगल्या आहेत. सोशल मीडियावरही सावित्री -ज्योती ही भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची घोषणा करण्यात आली. त्यामुळे या चर्चांना आणखी बळ मिळाले. पण अमोल आणि मधुराणी या कलाकारांनी खरंच मालिका सोडली आहे का? याविषयी सत्य समोर आले आहे. (Amol Kolhe Madhurani Prabhulkar)

मालिकेच्या या टप्प्यात समाजातील रूढी परंपरांची आव्हान आणि सावित्रीबाईंनी शिकावं स्वावलंबी व्हावे यासाठी ज्योतिरावांनी केलेले प्रयत्न पाहायला मिळणार आहेत. सावित्रीबाईंच्या शिक्षणाची वाट खुली करून देण्यासाठी ज्योतिरावांनी दाखवलेली दूरदृष्टी, समाजाच्या चौकटी मोडून स्त्री शिक्षणाची सुरुवात, चौकटी मोडण्याचा धैर्य वाखाणण्याजोगं आहे . नव्या पिढीसाठी मालिकेतील हे पर्व नक्कीच प्रेरणादायी ठरेल अशी आशा व्यक्त होत आहे.

अमोल कोल्हे -मधुराणी प्रभुलकर यांनी मालिका सोडली का ?

स्टार प्रवाहवरील ‘मी सावित्री ज्योतीराव फुले ‘ या मालिकेत आता काही वर्षांचा लीप पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सावित्रीबाई आणि ज्योतिरावांची भूमिका मधुराणी आणि अमोल कोल्हे नाही तर दोन तरुण कलाकार ही भूमिका साकारणार आहेत. सोशल मीडियावर नुकतेच फोटो शेअर करत सावित्री ज्योती ही भूमिका साकारणाऱ्या कलाकारांची घोषणा करण्यात आली. ही भूमिका अभिनेता अभिषेक देशमुख आणि अभिनेत्री राजश्री भावे साकारणार आहेत. सावित्री आणि ज्योतीरावांच्या तरुणपणीच्या भूमिकेत अभिषेक आणि राजश्री यांची जोडी दिसणार आहे.

सध्या सोशल मीडियावर अभिषेक आणि राजश्रीचे फोटो व्हायरल होत असल्याने मधुराणी आणि अमोल यांनी मालिका सोडल्याच्या चर्चा प्रेक्षकांमध्ये सुरू झाल्या होत्या.मात्र यात काहीही तथ्य नाही. अभिषेक आणि राजश्री सावित्रीबाई आणि ज्योतीराव यांच्या तरुणपणीचे भूमिका साकारणार आहे. मधुराणी आणि अमोल त्यानंतरच्या टप्प्यात प्रेक्षकांना पुन्हा दिसणार आहेत.

मालिकेतील तरुण कलाकारांविषयी ..

आई कुठे काय करते या मालिकेनंतर बऱ्याच काळाने अभिनेता अभिषेक देशमुख ‘ मी सावित्री ज्योतीराव फुले ‘ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तर राजश्री भावे हिने फर्स्ट क्लास दाभाडे सिनेमातील तिच्या भूमिकेमुळे अनेकांचे लक्षात राहिली आहे. तिला नव्या भूमिकेत पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत.

महत्त्वाच्या बातम्या

Tea Health : रोज 4-5 कप चहा पिताय, वेळीच थांबा नाहीतर…वाचा शरीरावर काय होईल परिणाम!

इराण-इस्त्रायल युद्धामुळे भारतातील साखर ‘कडू’; गुढीपाडव्याला साखर गाठी महाग? काय स्वस्त आणि कोणत्या वस्तू महागल्या?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Fight over Kittens : तुमच्या बोक्यामुळे आमची माऊ गरोदर, सांभाळा आता चार पिल्लं; मालकिणीने मांजरं भिरकावली, शेजाऱ्यांमध्ये वाद पेटला

Supriya Sule son in Law: सुप्रिया सुळेंच्या होणाऱ्या जावयाच्या कंपनीसोबत राज्य सरकारचा आणखी एक करार, साडेपाच हजार कोटींची गुंतवणूक

Petrol Diesel Price hike: विधानसभा निवडणुकीनंतर पेट्रोल-डिझेलचा दर वाढणार?

भारतात हाहाकार! अरुणाचल प्रदेशबद्दल चीनचा झोप उडवणारा दावा, थेट म्हटले, ती जागा…

Rohit Pawar Baramti Election: सुनेत्रा काकींच्या प्रचारासाठी रोहित पवार मैदानात; घोंगडी सभा घेऊन बारामती पिंजून काढली

थेट भर समुद्रात भारताने फिरवला गेम, चीन आणि पाकिस्तानच्या तोंडचे पळाले पाणी, थेट भारतात..