टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

सोलापूर पुणे महामार्गावर कारचा भीषण अपघात, सांगोला तालुक्‍यातील तीन जणांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी

On: February 27, 2026 10:17 AM
Follow Us:

इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 2  इथं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे.

Indapur Accident News :  इंदापूर तालुक्यातील डाळज नं. 2  इथं भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. सोलापूर-पुणे महामार्गावर आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, एक जण गंभीर जखमी झाला आहे. या अपघातात इको गाडीतून प्रवास करणाऱ्या सहा प्रवाशांपैकी तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये आदिती हातेकर, सखुबाई गेजगे व जय  हातेकर, सर्व रा. सांगोला, जि. सोलापूर यांचा समावेश आहे.

नेमका कसा झाला अपघात?

अपघातात इको गाडीचे चालक कबीरदास गेजगे (वय 50 वर्षे, रा. पाटस) हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तसेच स्वाती गेजगे (वय 34 वर्षे) व समृद्धी गेजगे (वय 10 महिने), दोघीही रा. पाटस या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या बाबत मिळालेल्या माहितीनुसार, सोलापूर–पुणे लेनवरून जाणारा आयशर टेम्पो याचा टायर अचानक पंचर झाल्याने वाहन चालकाने तो टेम्पो महामार्गाच्या साईडला अर्धवट आणि धोकादायक स्थितीत उभा केला होता. दरम्यान, पाठीमागून येणाऱ्या मारुती सुझुकी कंपनीच्या इको या चारचाकी वाहनाच्या चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने उभ्या असलेल्या टेम्पोला जोरदार धडक दिली. घटनेची माहिती मिळताच भिगवण पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. जखमींना त्वरित उपचारासाठी जवळील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत. या प्रकरणी भिगवण पोलीस स्टेशन पुढील तपास सुरु आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now