टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजित पवार विमान अपघाताबाबत धक्कादायक माहिती, ईमेल पाठवूनही..

Follow Us:

अजित पवार यांच्या निधनानंतर राज्यातील राजकारणात मोठा भूकंप आला. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता त्यांच्या विमानाची भीषण अपघात झाला. आता गंभीर आरोप या प्रकरणात केली जात आहेत.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने खळबळ उडाली. सतत गंभीर आरोप केली जात आहेत. अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता बारामती विमानतळाच्या अगदी शेजारी त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. अजित पवार सकाळी 8 वाजून 10 मिनिटाला मुंबई विमानतळाहून निघाले. 8 वाजून 45 मिनिटाला त्यांच्या विमानाचा अपघात झाला. या विमान अपघाताची काही व्हिडीओ देखील पुढे आली. हवेतच अजित पवार यांचे विमान एका बाजूला झुकताना स्पष्टपणे दिसले. अजित पवार यांचे विमान जमिनीवर कोसळल्यानंतर चार ते पाच स्फोट झाली. या विमान अपघातानंतर एका मागून एक धक्कादायक माहिती पुढे येत आहे. अजित पवार यांच्या विमानाची नियोजित पायलट अचानक बदलण्यात आली, यावरूनही संशय व्यक्त केला जात आहे. हे दोन पायलट नक्की कुठे आहेत असाही प्रश्न उपस्थित केला जात आहे.

अजित पवार मुंबईहून विमानतळाहून सकाळी निघाले असता त्यादरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजही मागण्यात आले. मात्र, ते देण्यास DGCA नकार दिला. आता अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल अत्यंत मोठी अपडेट पुढे येताना दिसत आहे. अजित पवार यांच्या विमान अपघाताची चाैकशी एसआयटीमार्फत करण्याचे आदेश देण्याची मागणी उच्च न्यायालयात जनहित याचिका करण्यात आली.

माहिती अधिकार कार्यकर्ते केतन तिरोडकर यांनी अजित पवार यांच्या विमान अपघाताची लवकरात लवकर चाैकशी व्हावी आणि अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू होण्यापूर्वी नक्की काय घडले याबाबतची प्रश्न करणारी याचिका दाखल केली. केतन तिरोडकर यांनी ही याचिका दाखल करण्यापूर्वी डीजीसीएला एक मेल करून याबाबतची विचारणा केली होती. मात्र, त्यांना याबाबतची माहिती व्यवस्थित दिली गेली नसल्याची धक्कादायक माहिती पुढे आली. त्यानंतर आता त्यांनी थेट कोर्टात याचिका दाखल केली.

आता या याचिकेवर काय सुनावणी होते आणि एसआयटीची स्थापना केली जाणार का? हे पाहण्यासारखे ठरणार आहे. अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सातत्याने गंभीर आरोप केली जात आहेत. रोहित पवारही आक्रमक भूमिका घेत आहेत. VSR कंपनीवर रोहित पवार यांनी काही आरोप केली असून कारवाईची मागणी करत आहेत.

http://अजित पवार

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now