टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

दिल्लीहून निघालेल्या विमानाची आपत्कालीन लँडिंग, विमानातील धक्कादायक व्हिडीओ पुढे, थेट आगीच्या ठिगण्याच…

Follow Us:

अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असताना रांचीहून दिल्लीला निघालेल्या विमानाचा भीषण अपघात झाला. आता यानंतर दिल्लीहून धक्कादायक बातमी येत आहे. नुकताच एका विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्यात आलंय.

अजित पवार यांच्या विमान अपघाताची घटना ताजी असतानाच आता रांचीहून दिल्लीकडे जाणाऱ्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला. आता या घटनेला काही तास उलटत नाहीत तोवरच अजून एक धक्कादायक घटना पुढे आली. दिल्लीहून लेहला निघालेल्या विमानाची आपत्कालीन लँडिंग करण्यात आले. विमानात काहीतरी मोठी घडल्याचे सांगितले जात आहे. पायलटने सावधानता बाळगत विमानाचे आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. उड्डाणानंतर काही वेळातच पुन्हा हे उड्डाण दिल्लीमध्ये परतले. काही मिनिटात विमान परत लँडिंग करत असल्याने खळबळ उडाली. स्पाइसजेट कंपनीच्या विमानाने सकाळीच दिल्ली विमानतळाहून लेह करिता उड्डाण घेतले. मात्र, उड्डाणानंतर लेहला जाण्याऐवजी विमान पुन्हा दिल्ली विमानतळावर परतले.

मिळालेल्या माहितीनुसार, स्पाइसजेटचे विमान सकाळी आपल्या नियोजित वेळेनुसार, दिल्ली विमानतळाहून लेहकडे निघाले. मात्र, उड्डाणाच्या काही वेळातच पायलटच्या लक्षात आले की, विमानात आगीसारखे काही सुरू आहे, आगीच्या ठिगण्या विमानात पडत होत्या. ही गोष्टी पायलटच्या लक्षात येताच त्यांनी आपत्कालीन लँडिंग करण्याचा निर्णय घेतला.

ज्यावेळी आगीच्या ठिगण्या विमानातून निघत होत्या, त्यावेळी प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण बघायला मिळाले, प्रवासी घाबरले होते. हेच नाही तर विमानातील एका प्रवाशाने या घटनेचा व्हिडीओ देखील आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात सूट केला. या व्हिडीओमध्ये स्पष्टपणे आगीच्या ठिंगण्या दिसत आहेत. विमानात स्पष्टपणे आगीसारखी गोष्टी दिसली.

या घटनेनंतर सर्व प्रवाशांना विमान कर्मचाऱ्यांकडून शांत करण्यात आले आणि लेहऐवजी परत दिल्ली विमानतळाकडे हे विमान नेण्यात आले. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये सुरक्षित लँडिंग करण्यात आली. त्यानंतर एक एक करून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. सध्या विमानातील सर्व प्रवासी सुरक्षित असून दिल्ली विमानतळावर आहेत. SG 121 हे विमान आहे, सध्या ते दिल्ली विमानतळावरच असल्याचीही माहिती मिळत आहे. मागण्या काही दिवसांपासूनचे विमान अपघात बघता खबरदारीचे उपाय म्हणून हे विमान दिल्ली विमानतळावर उतरवण्यात आल्याची माहिती आहे.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now