टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती, थेट मोठा संशय, दोन्ही पायलट आता…

Follow Us:

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने मोठी खळबळ उडाली. अजित पवार यांचा विमान अपघातात मृत्यू झाला. मात्र, अनेक संशय व्यक्त केली जात आहेत. त्यामध्येच आता थेट दोन्ही पायलटबद्दल मोठे विधान करण्यात आले.

अजित पवार यांच्या विमान अपघाताबद्दल धक्कादायक माहिती, थेट मोठा संशय, दोन्ही पायलट आता...

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले असता बारामती विमानतळाच्या धावपट्टीच्या जवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. या विमान अपघातात कोणीही जिवंत वाचू शकले नाही. अपघात स्थळावरील काही धक्कादायक व्हिडीओ देखील पुढे आली. अजित पवार गंभीर जखमी असल्याचे सांगितले गेले. पण काही वेळातच त्यांच्या निधनाची बातमी आहे. अजित पवार यांच्या निधनानंतर सर्वांनाच मोठा धक्का बसला. बारामतीकडे प्रचारसभांसाठी अजित पवार निघाले होते. अजित पवार यांच्या निधनानंतर संपूर्ण पवार कुटुंब एकत्र दिसले. सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन पक्षाची धुरा आपल्या हातात घेतली. यादरम्यानच दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र घेणार होता, असा दावाही करण्यात आला. मात्र, अजित पवार गटाच्या नेत्यांनी स्पष्ट सांगितले की, अशी कोणतीही चर्चा अजित पवार यांनी आमच्यासोबत केली नाही. जर असे असतेच तर दादांनी हा विषय आमच्या कानावर घातला असता.

दुसरीकडे अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर अनेक मोठी संशय व्यक्त केली जात आहेत. मंत्री, आमदार, खासदार सर्वांकडूनच अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत संशय व्यक्त केला जात आहे. तपास यंत्रणांकडून या विमान अपघाताचा तपास केला जात असून ब्लॅक बॉक्स ताब्यात घेतला आहे.  फ्लाइट रेकॉर्डरमधील डाटा डाऊनलोड करण्यात यश आल्याचे सांगितले जात आहे.

मात्र, सुरूवातीला सांगितले गेले की, फ्लाइट रेकॉर्डर बराचवेळ तीव्र उष्णतेत असल्याने नुकसान झाले. नवीन माहितीनुसार, डाटा डाऊनलोड झाला आहे, यातून मोठी माहिती पुढे येऊ शकते. आमदार अमोल मिटकरी अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर सातत्याने संशय व्यक्त करताना दिसत आहेत. त्यामध्येच त्यांनी आता नवीन प्रश्न उपस्थित केला. त्या विमानासाठी अगोदर नियुक्त असलेले पायलट आता कुठे आहेत? असा प्रश्न त्यांनी केला.

अमोल मिटकरी यांनी म्हटले की, अजितदादांच्या विमानासाठी नियुक्त पायलट यश आणि साहिल मदन आता कुठे आहेत? ही दोन्ही पायलट अगोदर अजित पवार यांच्या विमानावर नियुक्त होते. 28 जानेवारी 2026 रोजी तेच अजित पवार यांच्या विमानाचे पायलट होते पण अचानक पायलट बदलण्यात आली. आता ही पायलट नेमकी कुठे आहेत? याबाबतची माहिती द्यावी, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now