टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

ऑस्ट्रेलिया शेवटच्या सामन्यासाठी सज्ज, ओमान विरुद्ध भिडणार, जिंकणार का?

Follow Us:

Australia vs Oman T20 World Cup 2026 Live Match Score : ओमानला टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत विजयाचं खातं उघडता आलेलं नाही. त्यामुळे ओमान जाता जाता कांगारुंना पराभूत करणार का? याकडे चाहत्यांचं बारीक लक्ष असणार आहे.

AUS vs OMAN Live Streaming : ऑस्ट्रेलिया शेवटच्या सामन्यासाठी सज्ज, ओमान विरुद्ध भिडणार, जिंकणार का?

आयसीसी टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेतील साखळी फेरीतील शेवटचा सामना हा शुक्रवारी 20 फेब्रुवारीला खेळवण्यात येणार आहे. साखळी फेरीतील शेवटच्या सामन्यात बी ग्रुपमधील ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा साखळी फेरीतील चौथा आणि शेवटचा सामना आहे. दोन्ही संघांचं साखळी फेरीतच पॅकअप झालंय. त्यामुळे ऑस्ट्रेलिया आणि ओमान मोहिमेचा शेवट विजयाने करण्यासाठी मैदानात उतरणार आहेत. ऑस्ट्रेलिया साखळी फेरीत झिंबाब्वेकडून उलटफेरची शिकार झालीय. तसेच त्यांचं आव्हानही संपुष्टात आलंय. तसेच ऑस्ट्रेलियाच्या प्रमुख खेळाडूंना दुखापतीमुळे या स्पर्धेत सहभागी होता आलं नाही. त्यामुळे ऑस्ट्रेलियाच्या विश्वास कमी झाला आहे. त्यामुळे ओमान जाता जाता कांगारुंचा कार्यक्रम करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या निमित्ताने उभयसंघातील हा सामना कधी आणि कुठे होणार? हे जाणून घेऊयात.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना केव्हा?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना शुक्रवारी 20 फेब्रुवारीला होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना कुठे?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना पल्लेकेले आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामन्याला भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता सुरुवात होणार आहे. तर 6 वाजून 30 मिनिटांनी टॉस होणार आहे.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना टीव्हीवर कुठे पाहायला मिळेल?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना टीव्हीवर स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवरील चॅनेल्सवर पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना मोबाईलवर लाईव्ह कुठे पाहता येणार?

ऑस्ट्रेलिया विरुद्ध ओमान सामना मोबाईलवर जियोहॉटस्टार एपद्वारे लाईव्ह पाहायला मिळेल.

ऑस्ट्रेलिया आणि ओमानची कामगिरी

ऑस्ट्रेलिया बी ग्रुपमधील पॉइंट्स टेबलमध्ये चौथ्या आणि ओमान पाचव्या स्थानी विराजमान आहे. ऑस्ट्रेलियाने आयर्लंडला पराभूत करत मोहिमेत विजयी सलामी दिली. त्यानंतर झिंबाब्वेने 13 फेब्रुवारीला उलटफेर करत कांगारुंवर 23 धावांनी विजय मिळवला. त्यामुळे ऑस्ट्रेलियासाठी 16 फेब्रुवारीचा श्रीलंकेविरुद्धचा सामना हा करो या मरो असा होता. मात्र श्रीलंकेने ऑस्ट्रेलियाला 8 विकेट्सने लोळवलं. त्यानंतर झिंबाब्वे विरुद्ध आयर्लंड यांच्यातील सामना पावसामुळे रद्द झाल्याने दोन्ही संघांना 1-1 गुण मिळाला. तर सामना रद्द झाल्याने ऑस्ट्रेलियाचं अधिकृतरित्या वर्ल्ड कप स्पर्धेतूनच पॅकअप झालं.

तर दुसऱ्या बाजूला ओमानने पराभवाची हॅट्रिक पूर्ण केलीय. ओमानला ऑस्ट्रेलियाचा अपवाद वगळता बी ग्रुपमधील उर्वरित तिन्ही संघांनी पराभूत केलंय. झिंबाब्वे, श्रीलंका आणि आयर्लंडने ओमानला पराभूत केलं होतं. आता ओमान टीम त्यांच्या मोहिमेतील शेवटच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कशी कामगिरी करते? हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

T20 WC 2026: सुपर 8 फेरीतील आठ संघ निश्चित, पाकिस्तानची लढत कोणाशी ते ठरलं

टीम इंडियाचा नेदरलँड्स विरुद्धचा सामना किती वाजता? जाणून घ्या वेळ

टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर8 मधील 5 संघ फिक्स, 3 साठी तगडी स्पर्धा, जाणून घ्या सविस्तर

टी-20 विश्वचषकातून 3 संघ OUT; टीम इंडियासह 2 संघांची सुपर-8 मध्ये दिमाखदार एन्ट्री, 6 जागेसाठी 15 टीम शर्यतीत

IND vs PAK T20 World Cup: भारत–पाकिस्तान महामुकाबला आज किती वाजता सुरु होणार? खेळपट्टी ते हवामानाच्या अपडेटपर्यंत, सामन्याची सर्व माहिती जाणून घ्या एका क्लिकवर

ZIM vs AUS T20 World Cup 2026 : टी-20 वर्ल्डकपमधील सर्वात मोठी उलथापालथ, झिम्बाब्वेने इतिहास-भूगोल बदलला, ऑस्ट्रेलिया स्पर्धेतून OUT…