Mantralaya Bribery Sting Operation: राजेंद्र ढेरंगे यांनी मेडीकलचा परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. यामधील ३५ हजार रुपये घेत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली होती.

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयामधील लाच प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशचा व्हिडीओ समोर आला आहे. एसीबीने झिरवाळ यांच्या कार्यालयावर धाड टाकली होती. या कारवाईत एसीबीने क्लर्कला ३५ हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडलं होतं. मंत्रालयातील लाच प्रकरणाचे स्टिंग ऑपरेशन (Mantralaya Bribery Sting Operation) केल्याचा व्हिडीओ समोर आल्यामुळे आता खळबळ उडाली आहे. या लाच प्रकरणामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली होती, तर झिरवळ यांच्या राजीनाम्याची मागणी मोठ्या प्रमाणावरती झाली होती.(Mantralaya Bribery Sting Operation)
मंत्री नरहरी झिरवाळ यांच्या मंत्रालयातील कार्यालयावर गुरूवारी १२ फेब्रुवारीला एसीबीने छापा टाकला होता. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून ही कारवाई केली. झिरवाळ यांच्या कार्यालयात काम करणारा क्लर्क राजेंद्र ढेरंगे याला ५० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले होते. राजेंद्र ढेरंगे यांनी मेडीकलचा परवाना निलंबन रद्द करण्यासाठी मदत करण्यासाठी ५० हजार रुपयांची मागणी केली होती. यामधील ३५ हजार रुपये घेत असताना त्याला रंगेहाथ अटक करण्यात आली होती.(Mantralaya Bribery Sting Operation)
मंत्री नरहरी झिरवळ यांच्या कार्यालयातील जो लाच मागतानाचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ जानेवारी ते फेब्रुवारी दरम्यानचा आहे. यात राजेंद्र ढेरंगे याने व्हिडिओ काढणाऱ्या व्यक्तीकडे ५० हजारांची लाच मागितली होती. लाच म्हणून त्या व्यक्तीकडून ५० हजार रुपये दिल्याचेही कळते. तर दुसरी एका प्रकरणात अशीच लाच दुसऱ्या एका तक्रारदाराकडे राजेंद्र ढेरंगे यानी मागितली. पैसे द्यायची त्यांची इच्छा नसल्याने त्यांनी एसीबीला याबाबत माहिती दिली. एसीबीने मग सापळा रचून पैसे घेताना राजेंद्र ढेरंगे याच्यावर कारवाई केली. अशाच प्रकारे राजेंद्र ढेरंगे यांने अनेकांकडून पैसे उकळल्याचा संशय एसीबीला आहे. एसीबीच्या कारवाईनंतर हे स्टिंग ऑपरेशन आता बाहेर आलं आहे. एसीबीने नरहरी झिरवळ यांच्या विभागात केलेल्या कारवाईचा व्हिडिओ समोर आला आहे. राजेंद्र ढेरंगे याचा लाच मागतानाचा व्हिडिओ सध्या चर्चेत आला आहे. लाच मागताना राजेंद्र ढेरंगे व्हिडिओत कैद झाला आहे.
काय आहे प्रकरण?
मेडिकल परवाना रद्द करण्याच्या प्रकरणी राजेंद्र ढेरंगे याने 12 फेब्रुवारी रोजी मंत्रालयात ३५ हजारांची लाच स्वीकारली होती. ढेरंगेला अटक केल्यानंतर न्यायालयात हजर केलं होतं. एसीबीची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) राजेंद्र ढेरंगेला ३५ हजारांची लाच घेतल्याच्या आरोपावरून अटक केली. लाच स्वीकारल्याचा आरोप सरकारी काम करून देण्यासाठी संबंधित रक्कम स्वीकारल्याचं आरोप असून गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ढेरंगे सध्या एसीबीच्या कोठडीत आहे.
स्टिंगमधील धक्कादायक संभाषण काय?
- रामदास गाडे (झिरवळांचे पीए): “बालाजी का…”
- रामदास गाडे: “सरांची पण माझं बोलणं झालं.”
- रामदास गाडे: “मॅडमचा पण फोन आला होता.”
- रामदास गाडे: “पण चुका तुम्ही केल्यावर त्यामुळे ते आता करुन घे.”
- रामदास गाडे: “तुझी कॅपिसिटी नाही. तुला हे पण पाहिजे. सगळ कसं फुकट होईल. प्लेनचं तिकीट तर काढावं लागेल ना.”
- तक्रारदार: “आता नाही आहे.”
- रामदास गाडे: “काय म्हणतो २५ म्हणतो, तलाठीपण घेत नाही.”
- राजू ढेरिंगे (झिरवळांच्या विभागतील क्लार्क): “तुमच्याकडे कमीत कमी ५० असतील ना… ५० टक्के डिस्काऊंट देतो. ५० घेऊन ये तुमचं काम करुन देतो.”
- तक्रारदार: “तेवढे नाही हो.”
- राजू ढेरिंगे: “साहेब निघून गेले तर पुढच्या हप्त्यावर जाईल.”
- राजू ढेरिंगे: “आता यापुढे काही बोलू नको.”
- तक्रारदार: “थांबा फोन लावू द्या.”









