राष्ट्रवादीचे नेते रोहित पवार यांनी अजित पवारांच्या विमान अपघाती निधनाबाबत गंभीर आरोप केले आहेत. हा अपघात नसून ‘घातपात’ असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. विमानात अवाजवी इंधन भरणे आणि पायलटची संशयास्पद भूमिका यावर त्यांनी बोट ठेवले. स्फोटाचे कारण अधिकचे इंधन असल्याचे सांगत, रोहित पवारांनी या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणी केली आहे.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचं 28 जानेवारी रोजी बारामतीजवळ विमान अपघातात निधन झालं. मुंबईहून सभेसाठी जात असताना त्यांचं विमान बारामती विमानतळाजवळ आल्यावर एका बाजूला कललं आणि खाली कोसळलं. त्यानंतर मोठ्ठा स्फोट होऊन आग लागली आणि त्यानंतर आणखीही स्फोट झाले. यामध्ये अजित पवार यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्यासह अजित पवार यांचे सुरक्षारक्षक विदीप जाधव, विमानाचे पायलट सुमीत कपूर, शांभवी पाठक तसेच फ्लाईट अटेंडंट पिंकी माली या पाच जणांचा मृत्यू झाला. अजित दादांचं अकस्मात जाणं हा संपूर्ण राज्यासाठी मोठा धक्का होता.
मात्र त्यांच्या विमानाचा अपघात नसून त्यामध्ये घातपात असू शकतो अशा शंका गेल्या अनेक दिवसांपासून व्यक्त केल्या जात आहेत. अजित पवारांच्या पक्षातील काही नेते , तसेच अजित पवार यांचे पुतणे रोहत पवार यांनीही घातपाताची शंका व्यक्त केली असून गेल्या आठवड्यात त्यांनी मुंबई आणि दिल्लीत पत्राकर परिषद घेऊन अनेक मुद्दे मांडले. याच पार्श्वभूमीवर त्यांनी आजही मुंबईतील वाय बी चव्हाण सभागृहात आणखी एक पत्रकार परिषद घेत दादांच्य विमानाच घातपातच असावा असा दावा केला. पायलटच्या मदतीनेच अजितदादांचा घातपात झाला असा आरोपही रोहित पवार यांनी केला.

काय म्हणाले रोहित पवार ?
एखादा बॉल जर मातीत पडला तर तो कमी आदळतो, पण तो टणक रस्त्यावर पडला, जास्त आदळू टप्पे घेतो. आपण जर अपघात स्थळी पाहिलं तर अजित दादाचं जे विमान होते, कडक सरफेसवर पडलं, रनवेवर पडलं नव्हतं. तर एका साईडला पडलं होतं. त्यामुळे ते जोरात आदळलं. आता त्यांच्या विमानाचा स्फोट का झाला याबद्दल शंका घेतली जात, त्याचं मुख्य कारण, याबद्दल काही शंका व्यक्त करण्यात येत आहे. ती खरी ठरताना दिसत आहेत. अजित दादांच्या त्या विमानात जे फ्यूल टँक होते, ते अधिकचे होते. खरंतर विमानात टॉयलेटच्या बाजूला फ्यूल टँक असतात. त्याच्या बाजूला ब्लॅक बॉक्स असतो अशी माहिती रोहित पवार यांनी दिली.
आणि हे विमान जेव्हा मुंबईवरून बारामतीला गेलं तेव्हाच ते फ्यूल टँक भरले होते. पण मग फ्यूल टँक पूर्ण भरायची गरज नव्हती. बारामतीला दादांना सोडल्यावर विमान पुढे जाणार होतं, मग पुढे हैद्राबादला जाऊन विमानात इंध भरता आलं असतं ना. कोणी असं म्हणेल की महाराष्ट्रात इंधन स्वस्त असतं, म्हणून भरलं असेल तर मह इथल्यापेक्षा गुजरातमध्ये त्याहीपेक्षा स्वस्त होतं असा युक्तिवाद रोहित पवार यांनी केला. त्यामुळे विमानात एवढं फ्यूएल घेऊन बारामतीच्या दिशेने जाण्याचं कारण काय ? असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. मुद्दाम पायलटचा वापर करून घातपात झाला असावा असा मोठा दावा रोहित यंनी केला. विमानात फ्यूएल जास्त असलं, तर स्फोट मोठा होईल ही शंका खरी ठरत आहे असंही ते म्हणाले.

“पत्रकार परिषद झाल्यानंतर तपास यंत्रणा काम करत आहेत. त्यांच्यावर आक्षेप नाही. पण त्यांच्या स्पीडवर मात्र आक्षेप आहे. पण प्रेस कॉन्फरन्स झाल्यामुळे तपासाला गती आली आहे. दिल्लीची पीसी झाल्यानंतर डीजीसीएची माणसं खासगी विमानाने बारामतीला गेली होती. आता नेते सुद्धा पत्रकं द्यायला लागलेत ही चांगली गोष्ट आहे. लोकांच्या मनात अनेक शंका आहेत. त्याला लवकरात लवकर उत्तर मिळतील अशी अपेक्षा आहे” असं रोहित पवार म्हणाले. अजितदादांच्या विमान अपघात प्रकरणी रोहित पवार आज तिसऱ्यांदा प्रेझेंटेशन देऊन पत्रकार परिषद घेत आहेत.
“अपघात आहे की घातपात हा प्रश्न कायम त्यात राहतो. घातपाताच्या दिशने जाण्याचा प्रवास सुरु झालाय. 27 तारखेला कोणं भेटायला आलेलं. फोन कोणाचा आलेला हे मुद्दे होते. संध्याकाळी 6.50 ते 7.05 मिनिटापर्यंत फोनवर बोलणं झालं, एवढीच अपडेट देतो” असं रोहित पवार म्हणाले. “व्हीएसआर कंपनीच्या बाबतीत, मेन्टेन्सच्या बाबतीत दाखले दिले होते. बरेच तज्ञ त्या विषयात बोलताना दिसतात. आता जो व्हिडिओ आला त्यात पाहिलं की अधिकचे स्फोट झाले. ब्लॅक बॉक्सच्या संदर्भात अशी शक्यता व्यक्त केली जात होती की, व्हॉइस रेकॉर्डर नाही अशी कारणं पुढे येऊ शकतात. कालच त्या बाबत सरकारच्या एजन्सीकडून स्पष्टीकरण आलं आहे.







