टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

अजितदादांच्या विमान अपघातातील ब्लॅक बॉक्सबाबत धक्कादायक माहिती

Follow Us:

Ajit Pawar Plane Crash Black Box: अजित पवार यांच्या विमान अपघाताला जवळपास तीन आठवडे पूर्ण होत आले आहेत. या अपघाताच्या प्राथमिक अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.

Ajit Pawar Plane Crash Black Box: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत (Ajit Pawar Plane Crash) एक महत्वाची माहिती समोर आली आहे. अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच विमान अपघात तपास ब्युरोकडून अधिकृत स्पष्टीकरण दिलं आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डरवर उच्च तापमानाचा (आगीचा) दुष्परिणाम झाला आहे. विमानातील दोन्ही रेकॉर्डर जास्त वेळ आगीत राहिल्यामुळे त्यावर गंभीर परिणाम झाल्याचं विमान अपघात तपास ब्युरोकडून सांगण्यात आलं आहे.

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण, नेमकं काय काय म्हटलंय? (Ajit Pawar Plane Crash Update)

अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत पहिल्यांदाच अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आलं आहे. विमान अपघात तपास ब्युरोकडून निवेदन जारी करण्यात आलं आहे. अजित पवारांच्या विमानात दोन रेकॉर्डर होते. हे बराच वेळ आगीत जळाल्यामुळे रेकॉर्डरला नुकसान झालं आहे. त्यापैकी L3 संभाषणाचा डेटा मिळवण्यात ब्युरोला यश मिळालं आहे. कॉकपीट व्हॉईस रेकॉर्डरवर सखोल तांत्रिक तपास सुरू आहे. कॉकपिट व्हॉईस रेकॉर्डर हनीवेल कंपनीनिर्मित असून संबंधित देशातील अधिस्वीकृत प्रतिनिधींची मदत मागितलेली आहे. तर्क वितर्क लावण्याऐवजी तपास प्रक्रियेवर विश्वास ठेवण्याचे आवाहन विमान अपघात तपास ब्युरोकडून करण्यात आले आहे. ब्युरो इंटरनॅशनल स्टॅंडर्डनुसार पुरावेनिष्ठ तपास करत अशल्याचं सांगण्यात आलं आहे. (Ajit Pawar Plane Crash Black Box Update Marathi News)

ब्लॅक बॉक्स म्हणजे काय? (What is a black box?)

सर्वात पहिले विमानाचा ब्लॅक बॉक्स शोधला जातो. ज्याला फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR) आणि कॉपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) असेही म्हटले जाते. हे एक प्रकारचे रेकॉर्डिंग डिव्हाइस असते, ज्यामध्ये विमानाच्या उड्डाणादरम्यान कॉकपिटमधील संभाषण आणि उड्डाणाचे डेटा रेकॉर्ड केले जाते. ब्लॅक बॉक्सचा रंग नारंगी असतो. या ब्लॅक बॉक्सवर आग किंवा पाण्याचा कोणताही परिणाम होत नाही. ब्लॅक बॉक्सची बॅटरी 30 दिवस टिकते. त्याच्या डेटाचा वापर अनेक वर्षांनंतरही करता येतो.

ब्लॅक बॉक्स म्हणजे नेमकं काय? (Ajit Pawar Plane Crash Black Box)

प्रत्येक विमानाच्या ब्लॅक बॉक्समध्ये दोन अत्यंत महत्त्वाची उपकरणं असतात

1. फ्लाइट डेटा रेकॉर्डर (FDR)

– हे उपकरण विमानाच्या तांत्रिक हालचालींची नोंद ठेवतं, जसं की,

– विमानाची गती (Speed)

– उंची (Altitude)

– इंजिनची स्थिती

– पायलटने दिलेले कंट्रोल इनपुट्स

– ऑटो-पायलट चालू/बंद स्थिती

अपघाताच्या काही सेकंदांआधी विमानामध्ये नेमकं काय झालं याचा अचूक डेटा यात साठवलेला असतो.

2. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR)

– हा भाग पायलटांच्या कॉकपिटमधील आवाज रेकॉर्ड करतो, त्यामध्ये

– पायलट आणि सह-पायलट यांच्यातील संभाषण

– एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबतचा (ATC) संवाद

– अलार्म्स, चेतावणीचे आवाज

– अपघाताआधीची गडबड, तणाव किंवा गोंधळ

– ही माहिती अपघाताच्या मानवी चुकांची (Human Error) शक्यता तपासायला फार महत्त्वाची ठरते.

नागरी उड्डाण मंत्रालयाच्या पत्रकात म्हटलं आहे की, “अजित पवार यांच्या अपघातग्रस्त विमानात दोन स्वतंत्र फ्लाइट रेकॉर्डर होते. अपघातादरम्यान दोन्ही रेकॉर्डर बराच वेळ तीव्र आगीच्या संपर्कात असल्यामुळे त्यांचं नुकसान झालं आहे. मात्र L3-कम्युनिकेशन्सद्वारे निर्मित डिजिटल फ्लाइट डेटा रेकॉर्डर (DFDR) हा विमान अपघात तपास पथकाच्या (AAIB) फ्लाइट रेकॉर्डर प्रयोगशाळेत यशस्वीरित्या डाउनलोड करण्यात आला आहे. तर हनीवेलद्वारे निर्मित कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डर (CVR) ची सविस्तर तांत्रिक तपासणी सुरू असून त्यातील डेटा प्राप्त करण्यासाठीही प्रयत्न केला जात आहेत,” अशी माहिती नागरी उड्डाण मंत्रालयाने दिली आहे.

मंत्रालयाकडून महत्त्वाचं आवाहन

“सर्व नियमांचे पालन करत बारामती येथे 28 जानेवारी 2026 रोजी झालेल्या Learjet 45 या विमानाच्या अपघाताची सविस्तर चौकशी केली जात आहे. AAIB सर्व विहित तांत्रिक आणि प्रक्रियात्मक प्रोटोकॉलचे काटेकोरपणे पालन करत असून व्यापक, वस्तुनिष्ठ आणि पुराव्यावर आधारित तपास केला जात आहे. ही यंत्रणा पारदर्शकतेसाठी पूर्णपणे वचनबद्ध आहे आणि तपासाच्या योग्य टप्प्यावर पुढील माहिती सार्वजनिक केली जाईल. त्यामुळे याबाबत कोणताही संशय निर्माण करू नये,” असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now