टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

टी-20 वर्ल्ड कपमधील सुपर8 मधील 5 संघ फिक्स, 3 साठी तगडी स्पर्धा, जाणून घ्या सविस्तर

Follow Us:

ICC T20 World Cup 2026 Super 8 Team : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सुपर८ फेरीमध्ये जाण्यासाठी पाच संघ फिक्स झाले आहेत. तीन जागा बाकी आहेत, पाच संघ कोणते आणि तीन जागांसाठी कोणत्या संघांमध्ये स्पर्धा आहे जाणून घ्या.

मुंबई : आयसीसी टी-२० वर्ल्ड कप २०२६ मधील सुपर८ फेरीचे संघ आता फायनल झाले असून फक्त तीन जागा बाकी असून कोण एन्ट्री मारतं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. पाच कोणते संघ सुपर८ फेरीमध्ये दाखल झाले आहेत आणि तीन जागांसाठी कोणत्या संघांमध्ये स्पर्धा आहे जाणून घ्या.

सुपर८ मध्ये कोणते संघ जाणार?

वर्ल्ड कपमध्ये ग्रुप ए मध्ये भारतीय संघाने सलग तीन सामने जिंकत चांगल्या रनरेटसह सहा गुण मिळवले आहेत. या ग्रुपमधून भारताने सुपर८ फेरीमध्ये आपले स्थान निश्चित केले आहे. तर दुसऱ्या स्थानासाठी चुरस असणार आहे. पाकिस्तान संघाने नामिबियाचा पराभव केला तर ते जातील पण जर काही उलटाच निकाला पाहायला मिळाला तर अमेरिकेला तिकीट मिळू शकते.

ग्रुप बी मध्ये श्रीलंका संघाने सलग तीन सामने जिंकले असून त्यांचा प्रवेश झाला आहे. या ग्रुपमध्ये ऑस्ट्रेलिया असून झिम्बाब्वेने जर आजच्या सामन्यात आयर्लंडचा पराभव केला तर झिम्बाब्वे दुसरा संघ ठरणार आहे. त्यानंतरचा सामना श्रीलंकेसोबत असणार आहे. जर दोन्ही सामन्यात पराभव झाला तर ऑस्ट्रेलियाला संधी आहे. कारण त्यांचा ओमानविरूद्ध सामना असून तो कांगारूंना फक्त जिंकावाच नाहीतर मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे.

ग्रुप सी मधील सुपर८ फेरीमध्ये दाखल झालेले संघ वेस्ट इंडिज आणि इंग्लंड आहेत. दोन्ही संघांनी तीन सामने जिंकले आहेत. पण यामधील वेस्ट इंडिज संघाने एकही सामना गमावलेला नाही. त्यांचा एक सामना खेळणं बाकी आहे. तर इंग्लंड संघाचे चार सामने खेळून झाले आहेत. ग्रुप डी मध्ये दक्षिण आफ्रिका संघाने तिन्ही सामने जिंकत सुपर८ फेरी गाठली आहे. तर या ग्रुपमध्ये दुसरा संघ अद्याप ठरलेला नाही, न्यूझीलंड संघाचा आज कॅनडासोबत सामना असणार आहे. या सामन्यात जरा किवींनी विजय मिळवला तर त्यांचा प्रवेश निश्चित होईल.

दरम्यान, एकंदरित जे सुपर८ मध्ये जे पाच संघ आहेत, ज्यांनी सुपर८ मध्ये आपला प्रवेश निश्चित केला आहे ते, भारत, श्रीलंका, वेस्ट इंडिज, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिक आहेत. तर उर्वरित तीन जागांसाठी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान, झिम्ब्वाब्वे आणि न्यूझीलंडचा समावेश आहे. यामधील काही संघाना स्वत: जिंकायचं आहे तर काहींचं इतर संघाच्या सामन्याच्या निकालावर अवलंबून असणार आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा