टॉप न्यूज राजकीय सोलापूर सांगोला महाराष्ट्र भारत क्राईम मनोरंजन

Jayant Patil: ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता…विलिनीकरणावरून जयंत पाटलांनी सुनील तटकरेंना सुनावले, त्या बैठकीत घडलं काय?

Follow Us:

Jayant Patil On NCP Merger: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाचे गुऱ्हाळ कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांमध्येच रंगले आहेत. बडे नेते केवळ प्रतिक्रिया देऊन मोकळे होत आहे. शरद पवार राष्ट्रवादीने हा मुद्दा समोर आणला. पण त्यानंतर या विषयाला त्यांच्याकडून पूर्णविराम देण्यात आला आहे. त्यातच जयंत पाटलांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

Jayant Patil: ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता...विलिनीकरणावरून जयंत पाटलांनी सुनील तटकरेंना सुनावले, त्या बैठकीत घडलं काय?

Jayant Patil On Ajit Pawar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चाच झडत आहेत. पण त्याविषयीचे कोणतेही पाऊल अजून उलण्यात आलेले नाही. या सोमवारी आणि मंगळवारी काहीतरी ठोस असं बाहेर येण्याची शक्यता आहे. पण त्यापूर्वी अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्या लेखावर आक्षेप नोंदवला. तर विलिनीकरणावरही मोठे भाष्य केले. त्यानंतर आता जयंत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. त्यातून जयंत पाटील भावनिक झाल्याचे दिसले. त्याचवेळी त्यांनी नाव न घेता तटकरेंनाही उत्तर दिले आहे.

काय म्हणाले तटकरे?

दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणानंतर पक्षाचे नेतृत्व अजितदादांकडे देण्यात येणार होते. याबाबत शरद पवारांसह इतर नेत्यांमध्ये याविषयी एकमत झालं होतं. असा दावाही त्यांनी केला. राष्ट्रवादीच्या मासिकात त्यांनी याविषयीचा मुद्दा मांडला. त्याचवेळी काही अदृश्य शक्तींचा हात असल्याने राष्ट्रवादीत फुट पडली आणि अजितदादांनी वेगळी चूल मांडल्याचे त्यांनी या लेखातून मत मांडलं होतं. त्यावर अजितदादांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी आक्षेप घेतला. तटकरेंनी शिंदेंना फटकारलं. शिंदेंचा लेख हा गैरलागू असल्याचा दावा केला. तर योग्यवेळी त्यावर उत्तर देणार असल्याचे म्हटले.

तर विलिनीकरणाबाबतही तटकरेंनी भूमिका स्पष्ट केली. या संदर्भातील निर्णय जेव्हा प्रस्ताव मांडला जाईल, तेव्हा त्यावर चर्चा होईल. विलिनीकरणावर सुनेत्रा पवार आणि पक्षाचे नेते चर्चा करतील असे तटकरे यांनी सांगितले. अगोदर पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदाबाबत निर्णय होईल असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

जयंत पाटील यांनी सुनावले

तर या सर्व घडामोडींवर जयंत पाटील यांनी पुन्हा भाष्य केलं आहे. विलिनीकरणासाठी अजितदादा आग्रही होते. तसेच याविषयी बैठकाही झाल्या. अजितदादा 12 फेब्रुवारी रोजी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची घोषणा करणार होते असा दावा जयंत पाटील यांनी केला होता. त्यानंतर त्यांनी ताज्या घडामोडीं आधारे पुन्हा या मुद्दावर वक्तव्य केले.

ज्या माणसाशी आमची चर्चा झाली तोच आता नाही असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केले.अजितदादा हे विलिनीकरणासाठी आग्रही होते. निकटच्या सात-आठ महिन्यात माझ्या निवासस्थानी दादा आले होते. प्रसार माध्यमात वेगवेगळे नेते बोलत आहे. आमचा पक्ष व्यवस्थित सुरू आहे. तो काही बंद पडलेला नाही. विलिनीकरण कुणाला नकोय त्याचा निष्कर्ष जनतेने काढावा असे जयंत पाटील म्हणाले. इतरांच्या प्रश्नाला उत्तर देण्याची मला आवश्यकता वाटत नाही असे त्यांनी सुनील तटकरे यांचं नाव न घेता सुनावले.

WhatsApp Image 2026-04-12 at 12.02.53 PM
previous arrow
next arrow

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

पुढे वाचा

Vidhan Parishad Election 2026 : पुण्यातील राष्ट्रवादीचा हायव्होल्टेज ड्रामा संपला! ‘जिजाई’वर पार्थ पवारांची शिष्टाई यशस्वी, सुनील टिंगेरेंची विधान परिषदेच्या निवडणुकीतून माघार

Ramdas Athawale: देवेंद्र फडणवीसांनी शब्द पाळला नाही; विधान परिषदेवरून रामदास आठवलेंचा निर्वाणीचा इशारा

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतून तब्बल 80 लाख महिला अपात्र; देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

ऑल पिक्चर क्लिअर… कोण लढतंय कुणाविरोधात? यादी आली समोर; महायुती विरुद्ध महाविकास आघाडी थेट सामना

Mahayuti Candidate List : महायुतीचं टेन्शन वाढलं, तब्बल 8 जागांवर बंडखोरीचा धोका; कुठं कुठं कोणाचा अर्ज?

Shivsena Candidate List : एकनाथ शिंदेंची पुन्हा स्मार्ट खेळी, शिवसेनेच्या उमेदवारांची यादी जाहीर