स्टीलच्या भांड्यात चुकूनही हे 5 पदार्थ ठेवू नका, बनू शकतात विष

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

आजकाल स्टीलची भांडी सर्रास वापरली जातात, पण काही पदार्थ त्यात ठेवणे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.काही पदार्थ स्टीलसोबत रासायनिक प्रक्रिया करून त्यांची चव बिघडते एवढंच नाही तर आरोग्यालाही हानी पोहचू शकते. त्यामुळे, हे पदार्थ स्टीलच्या भांड्यात कधीही साठवू नये. ते कोणते पदार्थ आहेत जाणून घेऊयात.

आज जवळपास सर्वांच्या घरी स्टीलचीच भांडी जास्तप्रमाणात वापरली जातात. अगदी टिफीनही.कारण स्टीलचे कंटेनर टिकाऊ असते आणि त्यात अन्न गरम राहते. त्यामुळे वर्षानुवर्षे घरांमध्ये अन्न साठवणुकीसाठी वापरले जात आहेत. मात्र हे अनेकांना माहित नाही की स्टीलचे कंटेनर प्रत्येक गोष्टीसाठी योग्य नसतात. तसेच प्रत्येक पदार्थ स्टीलच्या कंटेनरमध्ये साठवणे योग्य मानले जात नाही. काही पदार्थ स्टीलच्या कंटेनरमध्ये साठवल्याने खराब होऊ शकतात. रासायनिक अभिक्रिया होऊ शकतात, ज्यामुळे चव बदलू शकते आणि आपल्या आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. ते कोणते पदार्थ आहेत जाणून घेऊयात.

हे अन्नपदार्थ स्टीलमध्ये साठवू नका 

दही: दह्यामध्ये आम्ल असते. जर ते जास्त काळ स्टीलच्या डब्यात ठेवले तर ते लवकर खराब होऊ शकते आणि त्याची चव बदलू शकते. दही काचेच्या, प्लास्टिकच्या किंवा मातीच्या डब्यात ठेवणे चांगले.

फळे: टरबूज, पपई, सफरचंद किंवा संत्री यांसारखी कापलेली फळे स्टीलमध्ये साठवल्यास त्यांचा रंग आणि चव बदलू शकतात. म्हणून, फळे नेहमी प्लास्टिक, काचेच्या किंवा मातीच्या भांड्यात साठवा.

टोमॅटोपासून बनवलेले पदार्थ : टोमॅटोमध्ये आम्ल जास्त असते. स्टीलच्या डब्यात टोमॅटो सॉस, सूप किंवा पास्ता सॉस साठवल्याने त्याची चव आंबट होऊ शकते आणि रंग बदलू शकतो. या पदार्थांसाठी काचेचे किंवा सिरेमिक कंटेनर हे अधिक सुरक्षित पर्याय आहेत.

लोणचे : लोणच्यामध्ये भरपूर मीठ आणि व्हिनेगर असते. ते स्टीलशी प्रतिक्रिया देऊ शकतात. यामुळे लोणच्याची चव बदलू शकते आणि कधीकधी त्याला थोडासा धातूचा स्वाद येतो. म्हणून, लोणचे नेहमी काचेच्या किंवा सिरेमिक कंटेनरमध्ये ठेवा.

लिंबू आणि आम्लयुक्त पदार्थ : लिंबू, डाळिंब आणि आवळा हे देखील खूप आम्लयुक्त असतात. ते जास्त काळ स्टीलच्या डब्यात ठेवल्याने हळूहळू स्टील खराब होऊ शकते आणि अन्नाची चव देखील खराब होऊ शकते.

स्टीलचे डबे फक्त कमी आम्ल आणि कमी मीठ असलेल्या पदार्थांसाठी असतात. लोणचे, दही, टोमॅटो, फळे आणि लिंबू स्टीलमध्ये साठवणे हानिकारक असू शकते. या वस्तू काचेच्या, सिरेमिक किंवा प्लास्टिकच्या डब्यात ठेवणे चांगले. यामुळे त्यांची चवही टीकून राहिल तसेच आरोग्य सुरक्षित राहील .

 

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com
WhatsApp Icon Telegram Icon