MPSC State Services Pre Examination : राज्यातील 37 जिल्हा केंद्रावर राज्यसेवा पूर्व परीक्षा घेण्यात येणार असून त्याची सर्व तयारी प्रशासनाने पूर्ण केली आहे.
मुंबई : महाराष्ट्र शासनाच्या विविध विभागांतर्गत अनेक संवर्गातील एकूण 385 पदांच्या भरतीकरता महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत (MPSC) महाराष्ट्र नागरी सेवा (राजपत्रित) संयुक्त पूर्व परीक्षा ही रविवार, 9 नोव्हेंबर, 2025 रोजी घेण्यात येणार आहे. ही परीक्षा दोन सत्रात होणार आहे. महाराष्ट्रातील एकूण 37 जिल्हा केंद्रांवर पार पडणाऱ्या या परीक्षेसाठी एकूण 1,75,516 उमेदवारांनी नाव नोंदणी केली आहे.
रविवारी होणाऱ्या राज्यसेवेच्या पूर्व परीक्षेसाठी विद्यार्थ्यानी काही महत्त्वाच्या नियमांचे पालन करण्याचं राज्य लोकसेवा आयोगाने आवाहन केलं आहे. मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी ट्रॅफिकची समस्या लक्षात घेता विद्यार्थ्यांनी शक्यतो लवकर बाहेर पडावे असं आवाहन करण्यात आलं आहे.
State Services Pre Examination Rules : MPSC संयुक्त पूर्व परीक्षेचे सर्वसाधारण नियम
प्रवेशपत्र अनिवार्य
परीक्षेला प्रवेशपत्राची प्रिंट कॉपी दाखवणे अनिवार्य आहे. प्रवेशपत्रावरील फोटो व स्वाक्षरी स्पष्ट असावी. प्रवेशपत्रावर चुका असल्यास उमेदवाराने परीक्षा आधीच आयोगाशी संपर्क साधणे अपेक्षित आहे.
वैध ओळखपत्र
प्रवेशपत्रासोबत आधारकार्ड, PAN, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा मतदार ओळखपत्र यापैकी कोणतेही वैध ओळखपत्र बाळगणे आवश्यक.
वेळेचे काटेकोर पालन
उशिरा आलेल्या उमेदवाराला परीक्षा केंद्रात प्रवेश मिळत नाही.
प्रतिबंधित साहित्य
मोबाईल, स्मार्टवॉच, ब्लूटूथ उपकरणे, इअरफोन, कागदाचे तुकडे, कॅल्क्युलेटर, लॉजिक वॉच, कोणत्याही प्रकारचे इलेक्ट्रॉनिक गॅझेट पूर्णपणे बंदी आहे.
स्टेशनरी नियम
परीक्षा फक्त काळा बॉलपेन वापरून द्यावी. पेन्सिल, जेलपेन किंवा इतर कोणतेही लेखन साहित्य परवानगी नाही.
OMR शीट सूचना
OMR शीटवर नाव, रोल नंबर, बुकलेट कोड चुकीचा भरल्यास उत्तरपत्रिका अमान्य ठरू शकते. फक्त योग्य ठिकाणी मार्किंग करणे आवश्यक.
बुकलेट कोड जुळवणे
संबंधित बातम्या
प्रश्नपत्रिका व OMR शीटवरील बुकलेट कोड जुळलेला आहे हे स्वतः तपासणे आवश्यक.
अनुशासन व वर्तन नियम
परीक्षेदरम्यान कोणताही गैरप्रकार, बोलणे, इशारे करणे किंवा सीट सोडून फिरणे यावर प्रतिबंध आहे. गैरप्रकार सिद्ध झाल्यास उमेदवारी रद्द होते.
परीक्षा सुरू झाल्यानंतर सोडण्याची वेळ
साधारणपणे पहिल्या 30 मिनिटांपर्यंत उमेदवाराला परीक्षागृह सोडता येत नाही.
परीक्षा संपल्यावर शिस्त
घंटा झाल्यानंतर लिहिणे त्वरित थांबवणे आवश्यक. OMR शीट जबाबदारपणे सुपूर्द करावी.
ड्रेस कोड (सामान्य सूचना)
अनावश्यक जाड जॅकेट, हेडफोनसारखी कपड्यांमध्ये लपवता येतील अशी साधने टाळावी. महिलांसाठी दागिने, मोठ्या पिन, मेटलिक वस्तू टाळण्याची सूचना असते.
परीक्षा केंद्रातील सामग्री सुरक्षित ठेवणे
केंद्रावर कोणत्याही वस्तू ठेवण्याची सोय नसते. आयोग हरवलेल्या वस्तूंसाठी जबाबदार नाही. राज्य शासनाने वेळोवेळी जारी केलेल्या सूचनांचे पालन करावे.





