जिओ, एअरटेल की व्होडाफोन आयडिया या टेलिकॉम कंपन्यापैकी दररोज 2 जीबी डेटा असलेला स्वस्त प्लॅन कोणती कंपनी देत आहे. हे आजच्या लेखात आपण जाणून घेऊयात…
भारतातील टेलिकॉम कंपन्यांमध्ये ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी स्वस्त रिचार्ज प्लॅन लाँच करत आहे आणि ही कंपन्यांमधील स्पर्धा तीव्र झाली आहे. प्रीपेड प्लॅनसाठी, विशेषतः 2जीबी डेली डेटा असलेल्या प्लॅनसाठी स्पर्धा अधिकाधिक मजेदार होत चालेली आहे. जिओ, एअरटेल आणि व्हीआय या सर्वांनी रिचार्ज प्लॅन लाँच केले आहेत जे केवळ डेटाच देत नाहीत तर ओटीटी सबस्क्रिप्शनसारखे अतिरिक्त फायदे देखील देतात. अशातच तुम्ही संभ्रमात आहात की या टेलिकॉम कंपन्यापैकी कोणत्या कंपनीचे प्लॅन सर्वोत्तम आहे. तर आजच्या लेखात आपण याबद्दल जाणून घेऊयात.
जिओचा 2 जीबी डेली डेटा प्लॅन: दमदार डील आणि दीर्घकालीन फायदे
जिओचा 899 रुपयांचा प्रीपेड रिचार्ज प्लॅन 90 दिवसांच्या वैधतेसह येतो. यात दररोज 2 जीबी 4 जी डेटा, अमर्यादित कॉल आणि दररोज 100 एसएमएसचा समावेश आहे. तर जिओच्या या प्लॅनची खास गोष्ट म्हणजे वापरकर्त्यांना True 5G आणि जिओहॉटस्टारचे 3 महिन्यांचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळत आहे. याव्यतिरिक्त, गुगल जेमिनी प्रोचा 18 महिन्यांचा मोफत अॅक्सेस हा एक महत्त्वाचा फायदा आहे, जो इतर प्लॅनपेक्षा वेगळा आहे.
एअरटेल 2 जीबी डेटा प्लॅन: प्रीमियम सबस्क्रिप्शनसह
एअरटेलचा 979 रुपयांचा प्रीपेड प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. हा प्लॅन दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित 5 जी इंटरनेट आणि अमर्यादित कॉलिंग देतो. यात एअरटेल एक्सस्ट्रीम प्ले प्रीमियम आणि पर्प्लेक्सिटी प्रो चे एक वर्षाचे मोफत सबस्क्रिप्शन देखील मिळते. जर तुम्ही ओटीटी आणि एआय टूल्सचे वापरकर्ते असाल, तर एअरटेलचा हा प्लॅन खूप प्रॅक्टिकल ठरू शकतो.
Vi चा 2GB डेटा प्लॅन: OTT फायदे पण महाग
Vi चा 996 रुपयांचा प्लॅन 84 दिवसांच्या वैधतेसह येतो. दररोज 2 जीबी डेटा, अमर्यादित कॉलिंग आणि 100 एसएमएस चा लाभ घेता येतो. या प्लॅनचे वैशिष्ट्य म्हणजे Amazon Prime Lite चे एक वर्षाचे सबस्क्रिप्शन, ज्याची किंमत अंदाजे 799 रुपये आहे. मात्र किंमत आणि वैधतेच्या बाबतीत, जिओ आणि एअरटेलपेक्षा हा प्लॅन थोडे महाग वाटतो आणि काही वापरकर्त्यांसाठी नेटवर्क उपलब्धता देखील एक आव्हान असू शकते.
संबंधित बातम्या
कोणता प्लॅन सर्वोत्तम आहे?
प्राईज-टू-वॅल्यूच्या बाबतीत बोलायचे झाले तर जिओचा प्लॅन सर्वात परवडणारा असल्याचे दिसून येते. कमी किमतीत जास्त वैधता, 5G सपोर्ट आणि AI सबस्क्रिप्शनसह OTT अॅक्सेस यासारख्या ऑफरमुळे ते चांगले डील बनते. एअरटेल देखील एक चांगला पर्याय आहे, विशेषतः ज्यांना स्ट्रीमिंग कंटेंट आवडते त्यांच्यासाठी. दुसरीकडे, Vi चा प्लॅन OTT फायदे देतो परंतु नेटवर्क आणि किमतीच्या बाबतीत खूप महाग आहे.




