iQOO 15 हा स्मार्टफोन भारतात 26 नोव्हेंबर रोजी लाँच होत आहे. तर या अँड्रॉइड स्मार्टफोनवर पहिल्यांदाच हे खास फीचर्स आतापर्यंत देण्यात आले आहे. तर हा फोन भारतातील सर्वात ब्राइट डिस्प्ले असलेला स्मार्टफोन असल्याचा दावा देखील केला जात आहे. चला तर मग आजच्या लेखात या खास फीचर्सबद्दल जाणून घेऊयात…
आपण अनेक अँड्रॉइड स्मार्टफोन पाहिले असतील ज्यांचे फिचर्स काहीप्रमाणात सारखेच आहेत. पण भारतीय बाजारात एक असा अँड्रॉइड स्मार्टफोन येत आहे ज्यात हे खास फिचर पहिल्यांदाच सादर केले जात आहे. जे फ्लॅगशिप स्मार्टफोन कॅटेगिरीला एका नवीन दिशेने घेऊन जाणार आहे. Vivo चा सब-ब्रँड iQOO त्यांचा नवीन फ्लॅगशिप, iQOO 15 26 नोव्हेंबरला लाँच करणार आहे.
हा फोन वापरकर्त्यांना प्रीमियम परफॉर्मन्स, प्रगत कॅमेरे, उत्कृष्ट सॉफ्टवेअर आणि पॉवरफुल AI फिचर्स प्रदान करेल असा दावा कंपनीने केला आहे. iQOO 15 च्या डिस्प्लेसह बॅटरी लाइफ आणि डिस्प्लेच्या बाबतीतही नाविन्य आणण्याची ब्रँडची योजना आहे. या फोनमध्ये Samsung 2K M14 LED OLED डिस्प्ले असेल. हा डिस्प्ले पहिल्यांदाच अँड्रॉइड फोनवर वापरला जात असल्याचा दावा केला जात आहे. चला तर मग आजच्या लेखात या खास फिचर्सबद्दल जाणून घेऊयात?
सॅमसंग 2K M14 LED OLED डिस्प्ले म्हणजे काय?
Samsung 2K M14 LEAD OLED डिस्प्ले हा Samsung ने बनवला आहे. रिपोर्ट्सनुसार, नावातील “LEAD” म्हणजे कमी पॉवर, इको-फ्रेंडली, ऑगमेंटेड ब्राइटनेस, स्लिम आणि लाइट असण्यासाठी डिझाइन केलेले आहे. मोबाईलचा हा डिस्प्ले अधिक ब्राइट दिसावा आणि कमी बॅटरी वापरण्यासाठी डिझाइन केलेलस आहे. हा डिस्प्ले 2K रिझोल्यूशन आणि 144 Hz पर्यंत रिफ्रेश रेट देतो. हा डिस्प्ले गेमिंगसाठी उत्कृष्ट मानला जात आहे. सॅमसंगच्या मते, हा डिस्प्ले बॅटरीचा वापर करताना जास्त ब्राइटनेस देतो.

iQOO 15 मध्ये कोणता डिस्प्ले असेल?
iQOO 15 मध्ये Samsung 2K M14 LEAD™ OLED डिस्प्ले देखील आहे. तो 2K रिझोल्यूशन आणि 144Hz रिफ्रेश रेट देतो. डिस्प्लेमध्ये 6,000 nits ची पीक ब्राइटनेस असेल, ज्यामुळे तो भारतातील सर्वात तेजस्वी स्मार्टफोन डिस्प्ले बनेल. याव्यतिरिक्त, फोनमध्ये डॉल्बी व्हिजन आणि ट्रिपल अँबियंट लाईट सेन्सर असेल, ज्यामुळे ब्राइटनेस समायोजित करणे सोपे होईल.
संबंधित बातम्या
iQOO 15 मधील इतर फीचर्स
iQOO 15 मध्ये आतापर्यंतचा सर्वात वेगवान प्रोसेसर, स्नॅपड्रॅगन 8 एलिट जेन 5 असेल. हा फोन OriginOS 6 वर आधारित Android 16 वर चालेल. या फोनमध्ये 50-मेगापिक्सेल ट्रिपल कॅमेरा सिस्टम मिळणार आहे. ज्यात मेन सेन्सर Sony IMX921 आहे. त्याच्यासोबत 50-मेगापिक्सेल Sony IMX882 पेरिस्कोप कॅमेरा देखील देण्यात येणार आहे. तिसरा कॅमेरा अल्ट्रा-वाइड कॅमेरा असेल. फोनमध्ये 32-मेगापिक्सेल सेल्फी कॅमेरा असेल. हा फोन 7,000 mAh बॅटरीसह लाँच केला जात आहे, जो 100-वॅट फास्ट चार्जिंग आणि 40-वॅट वायरलेस चार्जिंगला सपोर्ट करेल.



