Pune MPSC Success Story: पुण्यात एकाच खोलीत राहणारे सगळे मित्र झाले सरकारी अधिकारी

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Motivational Story In Marathi: सुरज यांच्यासोबत राहणारे त्यांचे मित्र आधीच विविध सरकारी विभागांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत झाले. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि सततचा पाठिंबा सुरजसाठी उभारी देणारा ठरला.

पुणे: जिद्द, मेहनत आणि योग्य मार्गदर्शन असेल, तर सामान्य घरातील मुलगाही प्रशासनात उच्च पदावर पोहोचू शकतो, याचं जिवंत उदाहरण म्हणजे कराडचा सुरज पडवळ. सुरुवातीला राज्य कर विभागात राज्य कर निरीक्षक (STI) म्हणून कार्यरत असलेल्या सुरज यांनी आता आणखी मोठी झेप घेत महाराष्ट्र राज्य सेवेतून (MPSC) थेट राज्यसेवा वर्ग-एक अधिकारी (SST) पदावर निवड मिळवली आहे.सुरजच्या या यशामागे केवळ त्यांची मेहनतच नव्हे, तर त्यांच्या रूममेट मित्रांची प्रेरणादेखील महत्त्वाची ठरली आहे. पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना, सुरज यांच्यासोबत राहणारे त्यांचे मित्र आधीच विविध सरकारी विभागांमध्ये अधिकारी म्हणून कार्यरत झाले. त्यांच्याकडून मिळालेली प्रेरणा आणि सततचा पाठिंबा सुरजसाठी उभारी देणारा ठरला.

MPSC चा निकाल लागल्यानंतर पुण्यातील या रूममेट ग्रुपची कहाणी सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाली आहे. अनिकेत आणि सूरज गाढवे या दोघा मित्रांकडून प्रेरणा घेऊन सुरज पडवळ यांनी अखेर यंदा MPSC राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत क्लास वन अधिकारीपद मिळवत यशाची नवी पायरी गाठली. सुरज पडवळ यांनी सांगितले, “मी एसटीआय पद मिळाल्यावर थांबलो नाही. मनात आणखी मोठं ध्येय ठेवलेलं होतं. सातत्याने अभ्यास, संयम आणि स्वतःवर विश्वास ठेवला. आज क्लास-वन पदावर निवड झाल्याचा आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही.”

Pune MPSC Success Story: संपूर्ण शिक्षण कराडमध्येच झालं

सुरज यांचं संपूर्ण शिक्षण कराडमध्येच पूर्ण झालं. दहावी ते बारावी आणि नंतर पदवीपर्यंतचे शैक्षणिक आयुष्य गावातच गेले. वडील निवृत्त शिक्षक आहेत, आई गृहिणी आहेत, तर बहीणही सध्या स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे. कुटुंबातून सातत्याने मानसिक आधार मिळाल्याचे सुरज यांनी सांगितले.

Pune MPSC Success Story: रूममेट मित्रांची प्रेरणा अन् पाठिंबा

या संपूर्ण यशामध्ये रूममेट मित्रांची प्रेरणा आणि सोबत अत्यंत महत्त्वाची ठरल्याचे सुरज यांनी सांगितले. “प्रसाद चौगुले, राकेश गीते, अनिकेत साखरे, सुरज गाढवे, निलेश खाडे, संकेत देसाई या सर्वांनी मला कायमच प्रोत्साहन दिले. ‘तू आणखी मोठं करू शकतोस’ या विश्वासाने मला पुन्हा तयारीसाठी वळवलं. त्यांच्या प्रेरणेमुळेच आज मी क्लास-वन पदावर पोहोचलो,” असे सुरज यांनी सांगितलं आहे. अभ्यासाच्या काळामध्ये त्यांनी काही क्लासेस देखील लावले. भगरे सर, प्रसाद चौगुले यांचे बंधू प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाचा लाभ झाल्याचेही त्यांनी सांगितले.

भविष्यातील आपले ध्येय सागतांना सुरज म्हणाले, “मला प्रशासनात काम करताना जनतेपर्यंत सेवा सहजपणे पोहोचावी, नागरिकांना सुलभतेने मदत मिळावी यासाठी मी प्रयत्नशील राहणार आहे.” सुरज पडवळ यांनी ‘आझाद मराठी’ या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत त्यांच्या या सर्व भावना व्यक्त केल्या आहेत.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon