वर्ल्ड चॅम्पियन टीम इंडियावर पैशांचा पाऊस, प्राइज मनीचा आकडा ऐकून डोळे विस्फारतील

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Womens World Cup Prize Money : महिला टीम इंडियाने वर्ल्ड कप 2025 जिंकून भारतीय क्रिकेटच्या इतिहासात कायमसाठी आपलं नाव कोरलं आहे. फक्त वर्ल्ड कपच नाही, तर क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक प्राइज मनीची रक्कम जिंकून भारतीय टीमने इतिहास रचला आहे.

2 तारीख पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटच्या इतिहासात अमर झाली. बरोबर 14 वर्षांपूर्वी मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली 2 एप्रिलला भारतीय टीमने दुसरा वनडे वर्ल्ड कप जिंकला होता. आता 2 नोव्हेंबरला नवी मुंबईच्या डीवाय पाटील स्टेडिअमवर हरमनप्रीत कौरच्या कॅप्टनशिपखाली भारतीय महिला टीमने पहिल्यांदा ICC वुमेन्स वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचला आहे. महिला टीम इंडिया फक्त वर्ल्ड चॅम्पियन बनली नाही, तर वर्ल्ड कपच्या इतिहासातील सर्वाधिक बक्षिसाची रक्कम सुद्धा त्यांनी आपल्या नावावर केली.

बरोबर 8 वर्षांपूर्वी महिला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये इंग्लंडने टीम इंडियाचा पराभव केला होता. पण यावेळी आपल्या भूमीवर, आपल्या लोकांसमोर टीम इंडियाकडे वर्ल्ड कप जिंकून इतिहास रचण्याची संधी होती. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने अजिबात निराश केलं नाही. रविवारी खेळल्या गेलेल्या या सामन्यात टीम इंडियाने दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवत पहिल्यांदा वर्ल्ड चॅम्पियन बनले.

विजेत्या संघाला किती प्राइज मनी मिळणार?

हा वर्ल्ड कप सुरु होण्याआधीच ICC चे अध्यक्ष जय शाह यांनी टुर्नामेंटच्या प्राइज मनी संदर्भात मोठी घोषणा केली होती. त्यांनी प्राइज मनीची रक्कम मोठ्या प्रमाणात वाढवली होती. एवढ्या मोठ्या प्राइज मनीची घोषणा केल्यानंतर विजेता बनण्याचा पहिला मान टीम इंडियाला मिळाला आहे. वर्ल्ड चॅम्पियन बनण्याच्या बदल्यात ICC कडून टीम इंडियाला 4.48 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 40 कोटी रुपयांच इनाम मिळालं. ही महिला आणि पुरुष क्रिकेटच्या इतिहासातील सर्वाधिक प्राइज मनी आहे. इतकचं नाही, प्रत्येक टीमप्रमाणे भारतीय टीमला आधीपासून निश्चित असलेली अडीच लाख डॉलर म्हणजे 2.22 कोटी रुपये सुद्धा मिळतील. त्याशिवाय लीग स्टेजमधील प्रत्येक सामना जिंकण्यासाठी टीम इंडियाला 34,314 डॉलर मिळणार आहेत. टीम इंडियाने लीग स्टेजमध्ये 3 सामने जिंकले आहेत. त्यामुळे त्यांना त्यासाठी 92 लाख रुपये मिळतील.

उपविजेत्या दक्षिण आफ्रिकेच्या टीमला किती प्राइज मनी मिळणार?

दक्षिण आफ्रिकेला उपविजेतेपदावर समाधान मानावं लागलं. पण त्यांना सुद्धा रनर-अप म्हणून प्राइज मनीची मोठी रक्कम मिळणार आहे. उपविजेत्याला मिळणारी ही आतापर्यंतची सर्वाधिक रक्कम आहे. दक्षिण आफ्रिकेची टीम दुसऱ्या नंबरवर आहे. त्यासाठी त्यांना 2.24 मिलियन डॉलर म्हणजे जवळपास 20 कोटी रुपये मिळाले. त्याशिवाय आधीपासून निश्चित असलेले 2.22 कोटी रुपये मिळतील. आफ्रिकेच्या टीमने लीग स्टेजमध्ये 5 सामने जिंकले होते. त्यांना 34,314 डॉलरच्या हिशोबाने 1.5 कोटीपेक्षा पण जास्त रक्कम मिळेल.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon