15 तास महामार्ग ठप्प, आता रेल्वे रोकण्याचा इशारा; बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या, सरकारकडून हालचाली!

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Bacchu Kadu Farmer Protest: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाने सामान्य जनतेची प्रचंड कोंडी केल्याचे चित्र आहे.

Bacchu Kadu Farmer Protest: कर्जमुक्ती, शेतमालाला हमीभाव, दिव्यांगांना सहा हजार रुपयांचे मानधन, तसेच मेंढपाळ आणि मच्छीमारांच्या न्याय्य हक्कांसाठी प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu Farmer Protest) यांनी आंदोलन पुकारले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह विविध मागण्यांना घेऊन बच्चू कडू (Bacchu Kadu) हे चांगलेच आक्रमक झाले आहे. बच्चू कडूंच्या नेतृत्वात राज्यभरातील शेतकरी आणि प्रहार कार्यकर्त्यांनी नागपुरात चक्काजाम आंदोलन (Bacchu Kadu Farmer Protest) सुरू केलं आहे. दरम्यान या आंदोलनकर्त्यांनी नागपूर-वर्धा आणि जबलपूर-हैदराबाद महामार्गासह इतर चार महामार्ग रोखून धरले आहे. परिणामी  गेल्या 15 तासांहून अधिक काळ अनेक वाहने महामार्गावर अडकून पडले आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सुरू केलेल्या बच्चू कडूंच्या आंदोलनाने सामान्य जनतेची प्रचंड कोंडी केल्याचे चित्र आहे.

बच्चू कडूंच्या (Bacchu Kadu Protest) आंदोलनानंतर राज्य सरकारकडूनही हालचाली सुरु झाल्या आहेत. “शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू” अशी घोषणा देऊन सत्तेत आलेल्या सरकारने अद्याप शेतकऱ्यांना दिलासा दिला नाही, सरकारने शेतकऱ्यांना कर्जमुक्ती करावी, अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे. तसेच अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असताना दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची घोषणा राज्य सरकारने केली होती. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही, त्यामुळे जाहीर केलेली मदत शेतकऱ्यांना तात्काळ मिळावी, अशी मागणी बच्चू कडू यांच्याकडून करण्यात आली आहे.

बच्चू कडूंच्या मागण्या काय काय?

शेतकऱ्यांचे संपूर्ण कर्ज कोणत्याही अटी शर्ती शिवाय त्वरित माफ करावे.नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकऱ्यांचा सात बारा कोरा करावा. पिक कर्जा बरोबरच, मध्यम मुदत, पॉली हाउस, शेड नेट, जमीन सुधारणा, सिंचन सुविधांसह सर्व कर्जाचा कर्जमाफीत समावेश करा.

उसाला सन 2025-26 या वर्षासाठी 9 टक्के रिकव्हरी साठी प्रति टन 4300/- रुपये व वर प्रति एक टक्का रिकव्हरीसाठी 430/- रुपये एफ.आर.पी. द्या. आजवरची थकीत एफ.आर.पी. रक्कम शेतकऱ्यांना द्या.

कांद्याला किमान प्रति किलो 40/- रुपये भाव द्या. कांद्यावरील निर्यातबंदी, किमान निर्यात मूल्य व निर्यात कर कायमस्वरूपी बंद करा. भाव पाडण्यासाठी होत असलेला नापेड व एन.सी.सी.एफ.चा वापर बंद करून या संस्थांचा उपयोग शेतकऱ्यांना कांद्याला रास्त दाम मिळावे यासाठी करा.

दुधाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त भाव द्या. गायीच्या दुधाला किमान 50/- रुपये बेस रेट व म्हशीच्या दुधाला 65/- रुपये भाव द्या. दुध क्षेत्राला एफ. आर. पी. व रेव्होन्यू शेअरिंगचे धोरण लागू करा. दुध भेसळ रोखण्यासाठी ठोस धोरण घ्या.

बच्चू कडू यांच्या 8 मोठ्या मागण्या:

1) शेतकऱ्यांची सरसकट कर्ज माफी जाहीर करावी.
2) कृषी मालाला हमी भावावर (MSP) 20% अनुदान देण्यात यावे.
3) शहराप्रमाणे ग्रामीण भागातील घरकुलाला समान निकष लाऊन 5 लाख रु. अनुदान द्यावे.
4) पेरणी ते कापणीचा सर्व खर्च MREGS मधुन करावा.
5) नागपुर – गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यात यावा.
6) दिव्यांग, निराधार, विधवा भगिनी व अनाथांना मासिक 6 हजार रुपये मानधन मिळावे-
7) मेंढपाळ व मच्छीमार यांच्यासाठी स्वतंत्र धोरण तयार करून त्यांचे प्रश्न मार्गी लावावे
8) ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न कायमस्वरुपी मार्गी लावावा.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon