नवले पूल परिसरात यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. या परिसरात सतत वाढणारी वाहतूक, ट्रकचा वेग आणि रस्त्यांची अरुंद रचना यामुळे हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो.
une Accident: पुण्यातील नवले पुलाजवळ (Navle Flyover) मंगळवारी पहाटे घडलेल्या एका भीषण अपघात घडलाय. फरश्या घेऊन जाणारा ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने त्याने एकामागोमाग तीन वाहनांना जोरदार धडक दिली. या अपघातात दोन वाहनचालक किरकोळ जखमी झाले असून तीनही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत ट्रकचालकाला ताब्यात घेतले आहे. या घटनेचा व्हिडिओही समोर आलाय. मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात मंगळवारी पहाटे सुमारे पाच वाजण्याच्या सुमारास घडला. (Pune Accident)
Pune Accident:नेमके घडले काय?
मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास कात्रज चौकाकडून फरश्या घेऊन नवले पुलाच्या दिशेने येणारा ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात पुढे गेला आणि रेडिमिक्स डंपर तसेच दोन कारला उडवत निघाला. धडक इतकी जोरदार होती की कार काही फूट पुढे ढकलल्या गेल्या आणि रस्त्याच्या मधोमध अडकल्या. अपघातानंतर परिसरात काही काळ वाहतूक कोंडी झाली होती. अपघातानंतर नागरिकांनी तत्काळ पोलिसांना कळवले. सिंहगड रस्ता पोलीस ठाण्याचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि क्रेनच्या साहाय्याने अपघातग्रस्त वाहने बाजूला केली. सुदैवाने कोणत्याही वाहनचालकाचा जीवितहानी झाली नाही. मात्र, काही वाहनांचे गंभीर नुकसान झाले आहे. पोलिसांनी मूळ उत्तर प्रदेशातील ट्रकचालक तौफिक इसरार अहमद (वय 32) याला घटनास्थळावरून ताब्यात घेतले आहे.
नवले पूल परिसरात यापूर्वीही अनेकदा अशा प्रकारचे अपघात घडले आहेत. या परिसरात सतत वाढणारी वाहतूक, ट्रकचा वेग आणि रस्त्यांची अरुंद रचना यामुळे हा परिसर ‘ब्लॅक स्पॉट’ म्हणून ओळखला जातो. नागरिकांनी अनेकदा येथे वाहतुकीवरील नियंत्रण वाढवावे अशी मागणी केली आहे.
दरम्यान, शहरात आणखी एका घटनेने खळबळ उडवली आहे. पुण्यातील मुंढवा परिसरातील बीटी कवडे रोडवर अतिक्रमणाविरोधात कारवाईदरम्यान महापालिकेच्या पथकाकडून स्थानिक व्यापाऱ्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. 26 सप्टेंबर रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
संबंधित बातम्या
पुण्यात अतिक्रमण पथकाकडून स्थानिक व्यापाऱ्याला मारहाण?
महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील अधिकारी, कर्मचारी आणि व्यावसायिक यांच्यात अनेक वेळा वाद होतात. याचाच प्रत्यय म्हणजे पुण्यातील बीटी कवडे रोड, मुंढवा परिसरामध्ये अतिक्रमणाविरोधात कारवाई सुरू होती कारवाई सुरू असताना अतिक्रमण पथकाकडून इथेच असणाऱ्या एका स्थानिक व्यापाऱ्याला बेदम मारहाण करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. एका व्यापाऱ्याने हा आरोप केला असून ही घटना 26 सप्टेंबर रोजी घडली होती. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.
व्यापाऱ्याच्या मते, कारवाई सुरू असताना अतिक्रमण पथकातील अधिकाऱ्यांनी त्याला कोणतीही नोटीस न देता दुकानासमोरची मांडणी काढण्यास सांगितले. विरोध करताच पथकातील कर्मचाऱ्यांनी त्याच्यावर हात उगारल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणानंतर व्यापाऱ्याने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून, या प्रकरणाचा तपास सुरू आहे.



