Ladki Bahin Yojana : लाडक्या बहीणींसाठी मोठी बातमी, 18 नोव्हेंबरपूर्वी करा हे काम नाहीतर…

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Ladki Bahin Yojana ekyc : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात अपडेट समोर आली आहे. या योजनेसाठी ekyc प्रक्रिया पूर्ण करावी लागत असून त्याची अंतिम मुदत, तारीख समोर आली आहे. त्यापूर्वी ekyc पूर्ण केली नाही तर….

महायुती सरकारची महत्वाकांक्षी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल (Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana) रोज नवनवे अपडेट्स समोर येत असतात. जुलै 2024 मध्ये सुरू झालेल्या या योजनेअंतर्गत पात्र ठरणआऱ्या महिलांना दर महिन्याला 1500 रुपये दिले जातात. राज्यभरातील 2 कोटींपेक्षा अधिक महिला या योजनेचा लाभ घेतात. त्यामध्ये अनेक गैरप्रकार घडल्याचेही समोर आले होते. आता याच ला़की बहीण योजनेसंदर्भात आणखई एक महत्वाची अपडेट समोर आली आहे. लाडकी बहीण योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी महिलांना ई-केवायसी (Ladki Bahin Yojana E- KYC)अनिवार्य करण्यात आली होती. त्याच संदर्भातील हे नवे अपडेट आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र महिलांना E- KYC पूर्ण करावी लागणार असून त्यासंदर्भातील एक पोर्टलही विकसित करण्यात आले आहे. मात्र आता या E- KYCची अंतिम तारीख समोर आली असून त्या तारखेपूर्वीच सर्व लाभार्थी महिलाना E- KYC प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे. यासंदर्भात महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एक ट्विट करत नवी माहिती देत E- KYCची अंतिम तारीख कोणती तेही जाहीर केलं आहे. त्यामुळे त्या अंतिम तारखेच्या आधीच पात्र लाडक्या बहिणींना ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार आहे.

काय म्हणाल्या अदिती तटकरे ?

 

महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी X या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या अधिकृत अकाऊंटवरूीन ट्विट करत माहिती शेअर केली आहे. त्यानुसार, ” मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये पारदर्शकता येण्यासाठी व लाभार्थ्यांना नियमितपणे आर्थिक लाभ मिळण्यासाठी e-KYC सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या प्रक्रियेत अधिक सुसूत्रता आणण्याबाबत आज मंत्रालयात बैठक घेतली.

 

दिनांक 18 सप्टेंबर 2025 पासून https://ladakibahin.maharashtra.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर e-KYC सुविधा उपलब्ध आहे. यासाठी २ महिन्यांचा कालावधी देण्यात आला असून आतापर्यंत बहुतांश लाडक्या बहिणींनी ही प्रक्रिया पूर्ण केली आहे. उर्वरित लाभार्थी भगिनींनीही 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी असे मी सर्वांना आवाहन करते.” असे त्यांनी या ट्विटमध्ये नमूद केले. म्हणजेच 18 नोव्हेंबर 2025 ही e-KYC प्रक्रिया पूर्ण करण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे या तारखेआधीच पात्र लाभार्थी महिलांनी ही प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

कशी कराल e-KYC प्रक्रिया ?

लाभार्थी महिलांनी मोबाईल अथवा संगणकावर ladkibahin.maharashtra.gov.in या पोर्टलला भेट द्यावी.

लॉगिन केल्यावर ईकेवायसी प्रक्रिया पूर्ण करण्याविषयीचा पर्याय दिसेल. त्यावर क्लिक करावे.

तुमचा आधार क्रमांक (Aadhaar Number) नोंदवा.

आता कॅप्चा कोड (Captcha Code) तिथे नोंदवा.

आधार प्रमाणिकरणासाठी मंजूरी द्या. Send OTP या पर्यायावर क्लिक करावे.

आधारशी लिंक मोबाईल क्रमांकावर OTP नमूद आल्यावर तो Submit करावा.

त्यानंतर लाभार्थ्याला आपला जात प्रवर्ग निवडावा लागेल आणि खालील बाबी प्रमाणित (Declaration) कराव्या लागतील :

1. माझ्या कुटुंबातील सदस्य नियमित/कायम कर्मचारी म्हणून शासकीय विभाग/उपक्रम/मंडळ/भारत सरकार किंवा राज्य शासनाच्या स्थानिक संस्थेत कार्यरत नाहीत किंवा सेवानिवृत्तीनंतर निवृत्तीवेतन घेत नाहीत.

2. माझ्या कुटुंबातील केवळ १ विवाहित आणि १ अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेत आहे. वरील बाबींची नोंद करून चेक बॉक्सवर क्लिक करावे व Submit बटण दाबावे.

शेवटी, “Success – तुमची e-KYC पडताळणी यशस्वीरित्या पूर्ण झाली आहे” असा संदेश दिसेल

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon