सांगोला शहर व तालुक्यातील समस्त नागरिकांना कळविण्यात येते की, सांगोला-मिरज रोडवरील रेल्वे बोगदा (गेट क्र. ३२) हा भुयारी मार्ग दिनांक ०१ नोव्हेंबर २०२५ ते दिनांक ३१ डिसेंबर २०२५ या कालावधीसाठी रेल्वे विभागामार्फत दुरुस्तीची कामे करण्याकरीता बंद ठेवण्यात येणार आहे. त्याअनुषंगाने सदरच्या भुयारी पुढील दोन महिने कालावधीसाठी सर्व प्रकारची वाहतूक शहरातील इतर पर्यायी मार्गावरून वळविण्यात येत आहे.













