Bacchu Kadu : मंत्रिपदी असताना मग काय…मारत होता काय? प्रकाश आंबेडकरांची बच्चू कडूंवर जहरी टीका

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

Prakash Ambedkar on Bacchu Kadu : बच्चू कडू यांनी कर्जमाफी आणि इतर मागण्यांसाठी नागपूरमध्ये एल्गार पुकारला आहे. त्यांनी सरकारला सांयकाळी 4 वाजेपर्यंत निर्णय घेण्याचा अल्टिमेटम दिला आहे. आता प्रकाश आंबेडकरांनी बच्चू कडूंवर जहरी टीका केली आहे.

Bacch Kadu Morcha in Nagpur : बच्चू कडू हे कर्जमाफी आणि सातबारा कोरा करण्यासाठी आक्रमक झाले आहेत. त्यांनी नागपूरमध्ये मोठा मोर्च्याची तयारी केली आहे. त्यापूर्वी सरकारला त्यांनी अल्टिमेटम दिला. आज मंगळवारी, सायंकाळी 4 वाजेपर्यंत निर्णय घेण्याचे आवाहन केले. नाहीतर रामगिरी बंगल्यावर मोर्चा धडकणार आहे. दरम्यान या सर्व पार्श्वभूमीवर प्रकाश आंबेडकर यांनी बच्चू कडू यांच्यावर जहरी टीका केली.

मराठा समाजाला ओबीसीमध्ये घेण्यास विरोध

मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही असे सांगत प्रकाश आंबेडकर यांनी त्याला विरोध केला आहे. ओबीसी आणि भटक्या विमुक्त महासंघाने 2 सप्टेंबर रोजीच्या जीआरविरोधात मोर्चा काढला आहे. त्यात प्रकाश आंबेडकर सहभागी होत आहेत. मराठा समाजाला ओबीसीमध्ये अंतर्भूत करता येत नाही, करण्याचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट ते मान्य करणार नाही. दोन वेळा मराठा समाजाला ओबीसी मध्ये अंतर्भूत करण्याचे महाराष्ट्र शासनाने केलेले प्रयत्न कोर्टाने मान्य केले नाहीत असे आंबेडकर म्हणाले.

मराठा समाजातला एक वर्ग निजामी मराठा आहे आणि एक रयतेतील मराठा आहे. हे जोपर्यंत मराठा समाज ऐकत नाही तोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही. निजामी मराठे निजामाबरोबर राहिले आहेत रयतेतील मराठी शिवाजी महाराजांसोबत राहिले आहेत.सोळाव्या शतकातील भांडण 22 व्या शतकात सुद्धा चालत आहे अशी परिस्थिती आहे.सत्तेमध्ये बसलेला हा पूर्णपणे निजामी मराठा आहे, निजामी मराठा हा रयतेतील मराठ्यांना आरक्षण देण्याच्या भूमिकेत नाही असे ते म्हणाले.

लग्नाच्या भाषेत बोलायचं झालं तर जोपर्यंत तो निजामी मराठ्या कडून फारकत घेत नाही तोपर्यंत रयतेतील मराठ्याला आरक्षण मिळणार नाही आणि न्यायही मिळणार नाही. शेतीला सपोर्ट प्राईजचा कायदा करावा ही मागणी सुद्धा निजामी मराठा स्वीकारत नाही. निजामी मराठ्यापासून हरकत घेतल्याशिवाय रयतेतील मराठ्याची सामाजिक आणि आर्थिक परिस्थिती सुधारणार नाही अशी परिस्थिती आहे.

विसाव्या, बाविसाव्या 25 व्या वर्षी रयतेतील मराठ्याच्या मुलाच्या मुलीचे लग्न होतं होत आज तशी ओलांडली तरी लग्न होत नाही अशी परिस्थिती आहे.वंचित बहुजन आघाडी ओबीसींच्या लढ्यामध्ये ओबीसींच्या बरोबर आहे. आम्हाला ओबीसी नाही न्याय द्यायचा आणि रयतेतील मराठ्यांनाही न्याय द्यायचाय, फसवा फसवी चा खेळ आम्हाला करायचा नाही असे आंबेडकरांनी स्पष्ट केले.

मनोज जरांगेंवर टीका

जरांगेचा आंदोलन चुकीचा आहे ते रयतेतील मराठ्यांच्या लोकसंख्येवर चालतं त्याचा असणारा सगळा जो निधी आहे हा निजामी मराठा पूरवत असल्यामुळे जरांगे पाटील हा सुद्धा रयतेतील मराठ्याचा प्रतिनिधी नाही, तो या निजामी मराठ्याचा प्रतिनिधी आहे. ओबीसी कडे एकही नेता असा नाही की जो ओबीसी लढू शकतो, निजामी मराठा याच्याकडे लीडरशिप आहे, परंतु रयतेतील मराठा जो आहे त्यांच्याकडे लीडरशिप नाही.

मंत्रिपदी असताना काय झ…मारली

शेतकरी आणि अपंगांसाठी छातीवर गोळ्या झेलायला तयार आहे असे बच्चू कडू म्हणाले. त्यावर प्रकाश आंबेडकरांनी प्रतिक्रिया दिली. लय वल्गना बघितल्या आहेत, त्यामुळे लोकांनी फसू नये, मंत्रीपद असताना काय झ… मारत होता का ? अशी जहरी टीका त्यांनी केली.

सगळ्या शेतकऱ्यांना माझा आवाहन आहे कलेक्टर तुम्हाला मदत करू शकतो का ? तर माझं म्हणणं नाही. पैसे रिलीज झाल्याशिवाय तो मदत करू शकत नाही, दुखणं कुठे आणि औषध तिसरीकडे ते दुखणं कसं बरं होईल. ज्याला तुम्ही सत्तेवर बसवले तुम्हाला मदत द्यायची का नाही द्यायची हे सत्तेवर बसलेल्यांनी ठरवल्याशिवाय अधिकारी कुठून मदत देणार. गाड्या फोडायच्या न सगळे आमदार, खासदार सत्ताधारी पक्ष कोण कोण आहे, शिवसेना एकनाथ शिंदे सत्ताधारी आहे, अजित पवारांचा पक्ष सत्ताधारी आहे, भाजप सत्ताधारी आहे या पक्षांच्या नेत्याच्या गाड्या फोडा, तुम्हाला न्याय मिळेल असे आंबेडकर म्हणाले.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon