Ravindra Dhangekar On Pune Jain Boarding: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune Jain Boarding पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग ट्रस्ट (Pune Jain Boarding) बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला आहे. पुण्यातील जैन बोर्डिंगच्या (Jain Boarding House Pune) जमिनीच्या व्यवहारावरुन राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं चित्र पाहायला मिळाले. याप्रकरणी भाजप खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्यावर एकामागून एक आरोप करण्यात आले. शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) हे मुरलीधर मोहळ यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत असल्याचे दिसून आले. मात्र रविंद्र धंगेकरांचे सर्व आरोप मुरलीधर मोहोळ यांनी फेटाळून लावले. दरम्यान, सदर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि रविंद्र धंगेकर यांच्यात देखील चर्चा झाली होती. याबाबत स्वत: रविंद्र धंगेकरांनी एबीपी माझाशी बोलताना माहिती दिली.
दोन दिवसात जैन बोर्डिंगचा व्यवहार पूर्णपणे रद्द झाला तर मुरलीधर मोहोळ यांच्यासह सगळ्यांना जिलेबी भरवणार असं रविंद्र धंगेकर यांनी म्हटलंय. तर पुढील दोन दिवस मुरलीधर मोहोळ यांच्याबद्दल मी काहीही बोलणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी सांगितलं 2 दिवसात तोडगा निघेल, त्यामुळे आनंदी असल्याचं रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangekar) म्हणाले. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी मुरलीधर मोहोळ यांना जो शब्द दिला, तोच खरा ठरल्याचं दिसून येतंय. दोन दिवसांच्या आधीच जैन बोर्डिंग ट्रस्ट (Pune Jain Boarding) बरोबरचा जागेचा व्यवहार बिल्डर विशाल गोखले यांनी रद्द करण्याचा निर्णय घेतला.
जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या- विशाल गोखले (Pune Jain Boarding)
विशाल गोखले (Vishal Gokhale) यांनी जैन बोर्डिंग जागेचा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय ई-मेलवरुन जैन ट्रस्टला कळवला आहे. जैन बोर्डिंग हॉस्टेलच्या चेअरमन आणि ट्रस्टी यांना गोखलेंनी व्यवहार रद्द झाल्याचा ई-मेल केलाय. व्यवहारातील 230 कोटी रुपये परत देण्यात यावे अशी विनंतीही त्यांनी केलीय. धर्मदाय आयुक्तालय यांना सुद्धा पत्र पाठवून पूर्ण व्यवहार रद्द झाल्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याचे मेलमध्ये नमूद केलंय, तर नैतिकतेच्या मुद्द्यावर व्यवहारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्याचं गोखलेंनी म्हटलंय. जैन धर्मियांच्या भावना दुखवायच्या नव्हत्या असंही गोखले म्हणाले.
संबंधित बातम्या




