दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा : 23 ऑक्टोबर 2025 | रविवार

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स मिळतील.

 

  • शक्तीपीठाचा मार्ग बदलण्याची शक्यता? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची माहिती

  • निलेश घायवळ प्रकरणात मोठी अपडेट! पासपोर्ट रद्द करण्याचा निर्णयामुळे घायवळ यांच्या अडचणींमध्ये वाढ!

  • दिवाळीत पावसाची शक्यता, हवामान विभागाचा नवा अलर्ट; 23 ते 25 ऑक्टोबर दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये विजांसह पावसाची शक्यता

  • लोकपाल सदस्यांना 70 लाखांची BMW: अण्णा हजारे यांनी नोंदवली तीव्र हरकत; म्हणाले – आम्ही खूप झगडलो, पण ही फार दुर्दैवी गोष्ट

  • मनोज जरांगे पुन्हा मैदानात: भाऊबीजेला मोठी घोषणा; मराठा आरक्षणानंतर शेतकऱ्यांच्या न्यायासाठी आंदोलन उभारणार

  • “वारस फक्त माझी पंकू ताई, दुसरं कोणी नाही”: प्रकाश महाजन म्हणाले- नवऱ्याची अब्रू वेशीवर टांगणारी गोपीनाथ मुंडेंचा वारस ठरवते?

  • राज आणि उद्धव ठाकरेंची एकत्र भाऊबीज: जयजयवंतींनी ठाकरे बंधूंना, तर आदित्य, अमित अन् तेजसला बहीण उर्वशी ठाकरेने ओवाळले

  • तेजस्वी महाआघाडीचा मुख्यमंत्रिपदाचा चेहरा: मुकेश साहनींसह 2 डेप्युटी CM उमेदवार; गहलोत म्हणाले- आता NDAने सांगावे त्यांचा नेता कोण?

  • आम्ही महायुतीत राहूनच निवडणूक लढवणार: कोणी जास्त खुमी दाखवली तर धनुष्यबाण कसा चालतो ते दाखवू; उदय सामंतांचा इशारा

  • पहलगाम हल्ल्यात नाव आले’ म्हणत तोतया ‘एनआयए’ अधिकाऱ्याकडून पुण्यात दीड कोटींची फसवणूक

  • सोलापुरातील अशीही भाऊबीज, रात्री अचानक महापूर आला अन् होत्याचं नव्हतं झालं; पत्र्याच्या शेडमध्येच भावाला ओवाळायची वेळ, भाऊबीजेलाही बहीण भावाच्या डोळ्यात पाणी

  • कंपनी गोखलेंची कमी यांचीच जास्त असल्याचं जाणवतंय; रविंद्र धंगेकरांच्या आरोपांनंतर मंत्री मुरलीधर मोहोळांनी दिलं उत्तर, म्हणाले ‘विशाल गोखले हा माझा मित्र होता आहे आणि राहणार

  • मुंबईत भीषण आगीची घटना, जोगेश्वरीमधील JMS बिझनेस सेंटरचे 4 मजले जळून खाक; 10 व्या मजल्यावरुन ओरडले, कपड्यांना लपेटून घेतले, 17 जणांची सुटका

  • जैन बोर्डिंग प्रकरणात मुरलीधर मोहोळांचा खुलासा: म्हणाले – माझ्यावर आरोप करणारा एकच व्यक्ती, कदाचित त्याला कुणीतरी चावी देत असेल

  • महिला विश्वचषक भारत-न्यूझीलंड सामना पावसामुळे थांबला: भारताने 329 धावा केल्या, 2 षटक बाकी; मंधाना आणि प्रतिकाने शतके ठोकली

  • धंगेकरांनी केलेल्या आरोपांची त्वरित चौकशी व्हावी: भाजप संधीसाधू असल्याने मुंबईत अजित पवार अन् एकनाथ शिंदेंना सोबत घेतले- अंबादास दानवे

  • भारत ऑस्ट्रेलियाकडून वनडे मालिका हरला: दुसऱ्या वनडेत 2 विकेटने पराभव, मॅथ्यू शॉर्टने केल्या 74 धावा, कोहली शून्यावर बाद

  • आफ्रिकेने पाकला 8 गड्यांनी हरवले: कसोटी मालिका 1-1 अशी बरोबरीत; महाराज सामनावीर, मुथुस्वामी मालिकावीर

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

WhatsApp Icon Telegram Icon