आजकाल अनेकांना फॅटी लिव्हरचा त्रास होतो. हा आजार दिवसेंदिवस वाढत असून, चुकीच्या आहारामुळे तो जास्त प्रमाणात होताना दिसत आहे. नॉनवेज, पिझ्झा-बर्गरपेक्षा एक घटक असलेल्या पदार्थांमुळे हा आजार बळावतो आहे. असे पदार्थ आपण आपल्या आयुष्यात खात असतो. असे कोणते पदार्थ आहे ज्यांमध्ये हा धोकादायक घटक आढळतो ज्यामुळे फॅटी लिव्हरसारखा आजार शरीरात उद्भवतो.
फॅटी लिव्हर आजार हा सर्वात सामान्य आजार बनला आहे. अनेकांना यामुळे शरीरात त्रास होत आहे. दरवर्षी जगभरात अंदाजे 20 लाख लोक लिव्हरच्या आजाराने मरतात. फॅटी लिव्हरचा आजार जीवनशैलीच्या चुकीच्या सवयींमुळे आहे, तसेच चुकीच्या आहारामुळे होतो. लिव्हरचा हा आजार दोन प्रकारचा असतो एक म्हणजे अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आणि नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर. यातील नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हर आजाराचे रुग्णही वाढताना दिसत आहेत.
हा घटक लिव्हरसाठी सगळ्यात जास्त धोकादायक
त्यामागचं कारण म्हणजे चुकीचे पदार्थ खाणे. अनेकांना असे वाटते की जास्त नॉनवेज खाल्ल्याने, तेलाचे-तुपाचे पदार्थ खाल्ल्याने किंवा जंक फूड खाल्ल्याने लिव्हरचा त्रास होतो. काही अंशी ते बरोबर देखील आहे. पण त्याहीपेक्षा एक घटक जो लिव्हरसाठी सगळ्यात धोकादायक मानला जातो. तो म्हणजे फ्रुक्टोज कॉर्न सिरप. हा पदार्थ यकृतासाठी सर्वात धोकादायक मानला जातो. हा घटक कोणत्या पदार्थांमध्ये आढळतो हे फार कमी जणांना माहित असेल.
अमेरिकेतील थायरॉईड आणि PCOS आरोग्य तज्ञ डॉ. एड्रियन स्झनाजडर यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये त्यांनी यकृतासाठी कोणते पदार्थ सर्वात धोकादायक मानले जातात हे स्पष्ट केले आहे. जर या पदार्थांपासून दूर राहिले तर यकृताचे आरोग्य राखता येते.
कोणत्या पदार्थांमध्ये आढळतो हा धोकादायक घटक
हा घटक प्रक्रिया केलेले पदार्थ आणि गोड पेयांमध्ये आढळतो. जसे की कुकीज, कँडीज, तृणधान्ये, सॉफ्ट ड्रिंक्स आणि सॉस.” जेव्हा हे पदार्थ खातो तेव्हा फ्रुक्टोज यकृतातील चरबीमध्ये रूपांतरित होतो. ज्यामुळे फॅटी लिव्हर आजाराचा धोका नक्कीच वाढतो. ताजी फळे खा आणि प्रक्रिया केलेले पदार्थ टाळा.
फ्रुक्टोज म्हणजे काय?
संबंधित बातम्या





फ्रुक्टोज हे गोड पेये, प्रक्रिया केलेले स्नॅक्स आणि कँडीज, थंड ड्रिंक्स , सॉस, दही यामध्ये आढळणारा साखरेचा एक प्रकार आहे. जरी फ्रुक्टोज नैसर्गिकरित्या फळे आणि भाज्यांमध्ये देखील आढळत असले तरी औद्योगिक फ्रुक्टोज जसे की सुक्रोज आणि उच्च-फ्रुक्टोज कॉर्न सिरप लिव्हरसाठी हानिकारक आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, सर्व प्रकारच्या पेये आणि प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये औद्योगिक फ्रुक्टोजचा वापर केला जातो. हे नॉन-अल्कोहोलिक फॅटी लिव्हरच्या आजाराचे एक मुख्य कारण आहे.
लिव्हरमध्ये चरबी वाढवते
जेव्हा आपण फ्रुक्टोज खातो तेव्हा ते प्रथम आतड्यांमध्ये प्रवेश करते. तेथे, ते आतड्यांतील अस्तर आणि आतड्यांमधील चांगल्या बॅक्टेरियाच्या संतुलनावर परिणाम करू शकते. यामुळे पोषक तत्वांचे आणि चरबी तयार करणाऱ्या पदार्थांचे शोषण वाढते, जे नंतर थेट यकृतात जाते. आतड्यांतील बॅक्टेरियाद्वारे उत्पादित फ्रुक्टोजचे, एसीटेट आणि ब्युटायरेट यांचे उच्च प्रमाण लिव्हरमध्ये चरबी वाढवते. ज्यामुळे चरबी जमा होते आणि यकृताचे नुकसान होते. जास्त फ्रुक्टोजमुळे शरीरात जळजळ देखील होते.
म्हणून, पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही प्रक्रिया केलेले अन्न किंवा साखरेचे पेय निवडता तेव्हा लक्षात ठेवा की त्यामध्ये उच्च फ्रुक्टोज कॉर्न सिरप तुमच्या लिव्हरसाठी किती धोकादायक असू शकते. तुमचे यकृत निरोगी ठेवण्यासाठी, ताजी फळे आणि भाज्या खा आणि प्रक्रिया केलेले अन्न टाळा.