Australia vs India ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी कांगारूंना मोठा धक्का बसला आहे.
Australia vs India ODI Series : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 19 ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या एकदिवसीय मालिकेआधी कांगारूंना मोठा धक्का बसला आहे. दुखापतींनी त्रस्त असलेल्या ऑस्ट्रेलियन संघातून आता आणखी एक महत्त्वाचा खेळाडू बाहेर पडला आहे. स्टार अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन किरकोळ दुखापतीमुळे संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. त्याची जागा मार्नस लाबुशेनला देण्यात आली आहे. लाबुशेन शनिवारी रात्री संपलेल्या शेफील्ड शिल्ड सामन्यानंतर थेट पर्थमध्ये ऑस्ट्रेलियन संघात सामील होणार आहे. मात्र, ग्रीनच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संतुलनावर मोठा परिणाम होणार असल्याचे मानले जात आहे.
ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली! भारताविरुद्धच्या मालिकेआधी अर्धा संघ बाहेर
भारताविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाचा संघ मोठ्या अडचणीत सापडला आहे. मालिकेच्या सुरुवातीलाच कांगारू संघाला दुखापत आणि खेळडूंच्या गैरहजेरीचा फटका बसत आहे. पॅट कमिन्स आधीच संघाबाहेर आहे. त्यातच अष्टपैलू कॅमेरॉन ग्रीन संपूर्ण मालिकेतून बाहेर पडला आहे. याचबरोबर जोश इंग्लिस पहिल्या दोन सामन्यांसाठी उपलब्ध नसेल, तर अनुभवी फिरकी गोलंदाज अॅडम झाम्पा पहिल्या सामन्यात खेळणार नाही. विकेटकीपर अॅलेक्स केरी देखील पहिल्या सामन्यातून बाहेर आहे.
या प्रमुख खेळाडूंच्या अनुपस्थितीमुळे ऑस्ट्रेलियाच्या संघ व्यवस्थापनाची डोकेदुखी आणखी वाढली आहे. दुसरीकडे, भारतासाठी ही मोठी दिलासादायक बातमी ठरू शकते, कारण प्रतिस्पर्धी संघ कमकुवत झाल्याने मालिकेत आघाडी घेण्याची संधी टीम इंडियासमोर आहे.
संबंधित बातम्या





टीम इंडियाच्या वनडे मालिकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक- (Ind vs Aus Schedule)
- पहिला एकदिवसीय सामना: 19 ऑक्टोबर (ऑप्टस स्टेडियम)
- दुसरा एकदिवसीय सामना: 23 ऑक्टोबर (अॅडलेड ओव्हल)
- तिसरा एकदिवसीय सामना: 25 ऑक्टोबर (एससी ग्राउंड)
टीम इंडियाच्या टी-20 मालिकेच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याचे वेळापत्रक
- पहिला टी-20: 29 ऑक्टोबर (मनुका ओव्हल)
- दुसरा टी-20: 31 ऑक्टोबर (एमसीजी)
- तिसरा टी-20: 2 नोव्हेंबर (बेलेरिव्ह ओव्हल)
- चौथा टी-20: 6 नोव्हेंबर (हेरिटेज बँक स्टेडियम)
- पाचवा टी-20: 8 नोव्हेंबर (गब्बा स्टेडियम)