चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नये; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

WhatsApp
Facebook
Telegram
Twitter

अनेकांना चहासोबत स्नॅक्स, बिस्किट किंवा फरसान खाण्याची सवय असते. पण असे काही पदार्थ असतात जे चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर अजिबात खाऊ नये. अन्यथा पोट बिघडू शकते. कोणते असे पदार्थ आहेत जे चहा प्यायल्यानंतर खाणे टाळावे.

चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर चुकूनही हे 5 पदार्थ खाऊ नये; अन्यथा आरोग्य बिघडू शकते

बरेच लोक दिवसाची सुरुवात चहाने करतात. चहासाठी लोक वेडे असतात. तसेच काहींना फक्त चहासोबत खायलाही आवडतं. अनेकजण फरसाण, बिस्किट किंवा अनेक प्रकारचे स्नॅक्स खातात. किंवा काहींना चहा झाला की लगेच नाश्ता करण्याची किंवा काहीतरी स्नॅक्स खाण्याची सवय असते. पण ही गोष्ट फार कमी जणांना माहित असेल की चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर काही पदार्थांचे सेवन करणे आरोग्य बिघडवू शकते. त्यामुळे काही पदार्थ हे अजिबात चहासोबत किंवा चहा प्यायल्यानंतर खाऊ नयेत. ते कोणते पदार्थ आहेत जाणून घेऊयात.

चहासोबत काय खाऊ नये?

1. लिंबू

काहींना कोरा चहा पिताना त्यात लिंबाचा रस घालतात. पण खरंतर चहामध्ये लिंबू घातल्याने आम्लपित्त आणि अपचन जास्त होऊ शकते. लिंबूमधील आम्ल चहामध्ये मिसळून गॅस आणि छातीत जळजळ होऊ शकते.

2. बेसन उत्पादने

चहासोबत बेसनाचे पदार्थ, जसे की फाफडा, कोणतेही फरसान किंवा स्नॅक्स खाल्ल्याने पोटात जडपणा जाणवू शकतो. बेसन पचायला थोडे जड असते आणि चहासोबत घेतल्यास ते पचनक्रिया मंदावते.

3. थंड गोष्टी

चहा प्यायल्यानंतर लगेचच आईस्क्रीम किंवा दहीसारखे थंड आणि आंबट पदार्थ खाऊ नये. त्याचा पचनक्रियेवर परिणाम होऊ शकतो. चहा गरम असतो त्यानंतर लगेच थंड पदार्थांचे किंवा आंबट पदार्थाचे सेवन केल्यास पोटाचे आरोग्य बिघडू शकते.

4. लोहयुक्त पदार्थ

चहामध्ये टॅनिन असते, जे लोहाचे शोषण कमी करते. म्हणून, पालक किंवा हिरव्या भाज्यांसारखे लोहयुक्त पदार्थ चहासोबत खाऊ नयेत.

5. हळद

चहासोबत हळद खाल्ल्याने अ‍ॅसिडिटी आणि गॅस होऊ शकतो. हळद आणि चहा दोन्हीही उष्ण स्वभावाचे असतात, त्यामुळे त्यांचे एकत्र सेवन केल्याने पोटात जळजळ होऊ शकते.

चहासोबत या गोष्टी खाणे टाळा

चहामध्ये लिंबू घालणे टाळा. बेसनापासून बनवलेल्या वस्तू खाऊ नका. चहा प्यायल्यानंतर लगेच थंड पदार्थांचे सेवन करू नका. हळदीच्या चहासोबत लोहयुक्त पदार्थ खाऊ नका.

जेवण झाल्यावर लगेच चहा पिऊ नका

दरम्यान काहींना जेवण झाल्यावरही चहा पिण्याती तलफ येते. पण असे करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. कारण त्यामुळे खाल्लेल्या अन्नाचे पचन होणार नाही. तसेच अनेकांना जर सतत किंवा दिवसांतून खूपदा चहा घेण्याची सवय असेल तर ती कमी करणे गरजेचे आहे.

मुख्यसंपादक - सुनील मस्के  के बारे में
For Feedback - solapurviralnews@gmail.com

---Advertisement---

LATEST Post

WhatsApp Icon Telegram Icon