दोनचाकी वाहनांवरील जीएसटी दर कपातीनंतर Honda Activa, Hero Splendor, Royal Enfield Classic 350 यांसारख्या लोकप्रिय बाईक्स आणि स्कूटरच्या किमती स्वस्त झाल्या आहेत.
मुंबई : केंद्र सरकारने जीएसटी स्लॅबमध्ये बदल केल्यानंतर बहुतांश वस्तू आता स्वस्त होणार आहेत. त्यामध्ये कार आणि बाईक्सचाही समावेश आहे. दोनचाकी वाहनांवरील (Two-Wheelers) जीएसटी दरात कपात केल्यानंतर देशातील अग्रगण्य कंपन्यांनी आपल्या बाईक्स आणि स्कूटरच्या किमतींमध्ये मोठे बदल केले आहेत. यात रॉयल एनफिल्ड (Royal Enfield), होंडा (Honda) आणि हिरो (Hero) या कंपन्यांच्या लोकप्रिय मॉडेल्स स्वस्त झाले आहेत, तर काही हाय-एंड मॉडेल्स मात्र महागले आहेत. हा बदल येत्या 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहे.
जीएसटी बदलानंतर बाईकवरील जीएसटी 28 वरून 18 टक्क्यांपर्यंत कमी होतील. हे जीएसटी दर 22 सप्टेंबरपासून लागू होणार आहेत.
रॉयल एनफिल्ड (Royal Enfield)
स्वस्त झालेले मॉडेल्स:
हंटर 350 (Hunter 350) : ₹14,867 ने कमी
बुलेट 350 (Bullet 350) : ₹18,057 ने कमी
क्लासिक 350 (Classic 350) : ₹19,222 ने कमी
मिटीओर 350 (Meteor 350) : ₹19,024 ने कमी
गोन क्लासिक 350 (Goan Classic 350) : ₹19,665 ने कमी
महागलेले मॉडेल्स:
इंटरसेप्टर 650 (Interceptor 650) : ₹24,604 ने वाढ
कॉन्टिनेंटल GT 650 (Continental GT 650) : ₹25,645 ने वाढ
सुपर मिटीओर 650 (Super Meteor 650) : ₹29,486 ने वाढ
होंडा (Honda)
कमी झालेल्या किमती:
अॅक्टीवा 110 (Activa 110) : ₹7,874 ने कमी
डिओ 110 (Dio 110) : ₹7,157 ने कमी
संबंधित बातम्या





अॅक्टीवा 125 (Activa 125) : ₹8,259 ने कमी
हॉर्नेट 2.0 (Hornet 2.0) : ₹13,026 ने कमी
CB350 H’ness : ₹18,598 ने कमी
CB350 RS : ₹18,857 ने कमी
CB350 : ₹18,887 ने कमी
युनिकॉर्न (Unicorn) : ₹9,948 ने कमी
हिरो (Hero)
स्वस्त झालेले मॉडेल्स:
एचएफ डिलक्स (HF Deluxe) : ₹5,805 ने कमी
स्प्लेंडर+ (Splendor+) : ₹6,820 ने कमी
ग्लॅमर X (Glamour X) : ₹7,813 ने कमी
एक्सट्रीम 160R 4V (Xtreme 160R 4V) : ₹10,985 ने कमी
एक्सपल्स 210 (Xpulse 210) : ₹14,516 ने कमी
करिझ्मा XMR 210 (Karizma XMR 210) : ₹15,743 ने कमी
जीएसटी कपातीनंतर स्कूटर (Scooter) आणि लो-सीसी बाईक्स (Low-cc Bikes) खरेदी करणाऱ्या ग्राहकांना मोठा फायदा होणार आहे. मात्र हाय-एंड प्रीमियम बाईक्स (High-end Premium Bikes) जसे की रॉयल एनफिल्ड इंटरसेप्टर 650 (Interceptor 650), कॉन्टिनेंटल GT (Continental GT) आणि सुपर मिटीओर (Super Meteor 650) खरेदीसाठी ग्राहकांना अधिक पैसे खर्च करावे लागतील.