Maharashtra Medical admission 2025 : एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेतील ऑल इंडिया कोट्याच्या दुसऱ्या फेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आले आहेत. मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, महाविद्यालयांचे पर्याय नोंदवण्याची अंतिम मुदत रविवारी संपली. दुसऱ्या फेरीची यादी उद्या, बुधवारी जाहीर होणार असून, तिसरी फेरी २७ सप्टेंबरपासून सुरू होईल. वाचा सविस्तर …
Maharashtra MBBS admission 2025 : एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेच्या ऑल इंडिया कोट्यासाठीच्या दुसऱ्या फेरीच्या वेळापत्रकात बदल करण्यात आल्याचे मेडिकल कौन्सिलिंग कमिटीमार्फत जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर अद्ययावत वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या वेळापत्रकानुसार रविवारीपर्यंत महाविद्यालयांचे पर्याय नोंदणी पूर्ण झाली असून, उद्या, बुधवारी (दि. १७) दुसऱ्या फेरीसाठीची यादी जाहीर होईल.
नव्याने सुरू झालेल्या वैद्यकीय महाविद्यालयांचा दुसऱ्या फेरीत समावेश करण्यासाठी, तसेच वाढीव जागांचा दुसऱ्या प्रवेश फेरीत समावेश करून घेण्यासाठी केंद्रीय कोट्याची दुसरी फेरी लांबणीवर पडली होती. ही प्रक्रिया पूर्ण करून, दुसऱ्या फेरीत जागा वाढ झाल्यानंतर, उमेदवारांना महाविद्यालयांचे पर्याय दाखल करण्यासाठी १४ सप्टेंबरपर्यंत (रविवार) मुदत देण्यात आली होती. त्यानंतर १५ व १६ सप्टेंबरला जागा वाटप प्रक्रिया केली जाणार आहे.
तिसरी फेरी २७ पासून
दुसऱ्या फेरीसाठी पात्र उमेदवारांची यादी १७ रोजी जाहीर होईल. निवड झालेल्या उमेदवारांना १८ ते २५ दरम्यान संबंधित महाविद्यालयात किंवा संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून प्रवेश घ्यावा लागेल. २७ सप्टेंबरपासून तिसऱ्या फेरीची प्रक्रिया सुरू होईल.
एमबीबीएस प्रवेश प्रक्रियेतील अखिल भारतीय कोट्याच्या दुसऱ्या फेरीच्या वेळापत्रकात बदल झाला आहे. मेडिकल कौन्सिलिंग कमिटीने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार, महाविद्यालयांचे पर्याय नोंदवण्याची अंतिम तारीख रविवारी संपली. दुसऱ्या फेरीची यादी उद्या जाहीर होईल. तिसऱ्या फेरीची प्रक्रिया २७ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांना १८ ते २५ सप्टेंबर दरम्यान महाविद्यालयात हजर राहून प्रवेश घ्यावा लागेल.
सम्बंधित ख़बरें





वैद्यकीय’ची वाट प्रशस्त –
वैद्यकीय शिक्षणासाठी राज्यातील हजारो विद्यार्थी परदेशाची कास धरत असताना आता विद्यार्थ्यांना राज्यातच दर्जेदार वैद्यकीय शिक्षण मिळावे, या दृष्टीने सरकारने पावले उचलली आहेत. आतापर्यंत महाराष्ट्र राज्य आरोग्य विज्ञान विद्यापीठ (MUHS) आणि काही अभिमत (डीम्ड) विद्यापीठ यांच्यापुरताच मर्यादित असलेला वैद्यकीय पदवी देण्याचा अधिकार खासगी विद्यापीठांनाही देऊ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वैद्यकीय शिक्षण आणि उच्च व तंत्रशिक्षण या दोन्ही विभागांना एकत्र प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्यासाठी महाराष्ट्र राज्य खासगी विद्यापीठ कायदा २०२३मध्ये सुधारणा करण्याची तयारी दर्शवली आहे.