Prakash Mahajan MNS Resignation: मनसेला सोडचिठ्ठी देत प्रकाश महाजन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये मला विधानसभेत प्रचारपुरते वापरून घेतले, असा आरोपही प्रकाश महाजन यांनी केला आहे.
Prakash Mahajan MNS Resignation: ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan MNS Resignation) यांनी मनसेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला आहे. कमीतकमी अपेक्षा ठेवून माझ्या वाट्याला उपेक्षा असल्याचं प्रकाश महाजन यांनी म्हटलं आहे. गंगेला बोल लावला, तेव्हा खरंतर मी तेव्हाच थांबायला हवं होत…मला वैयक्तिक अपेक्षा नव्हती, पदाची अपेक्षा नव्हती, फक्त हिंदुत्वाचा विचार जोपासला जावा, ही अपेक्षा होती. पण वाट्याला उपेक्षा आली, अशी नाराजी प्रकाश महाजन यांनी बोलावून दाखवली.
राजीनामा देताना प्रकाश महाजन काय म्हणाले? (What Prakash Mahajan say while resigning?)
मनसेला सोडचिठ्ठी देत प्रकाश महाजन यांनी एक व्हिडीओ प्रसिद्ध केला. या व्हिडीओमध्ये मला विधानसभेत प्रचारपुरते वापरून घेतले, असा आरोपही प्रकाश महाजन यांनी केला आहे. कुठेतरी आपण थांबलो पाहिजे ही भावना येत आहे. व्यक्तिगत माझी अपेक्षा कमी आहे. कोणत्याही पक्षात मी राहिलो, तर मला कोणत्याही पदाची आणि निवडणुकीच्या तिकिटाची अपेक्षा नव्हती. मी हिंदुत्वासाठी काम करत होतो. पण माझ्या वाटेला उपेक्षा आली. मला विधानसभेला फक्त प्रचाराला वापरून घेतले. मी अमित ठाकरेंचा (Amit Thackeray) यांचा थोडा अपराधी आहे. कारण मी त्यांना शब्द दिला होता की मी तुमच्यासोबत काय तुमच्या मुलासोबत ही काम करेल. असंख्य मानसैनिकांनी माझ्यावर प्रचंड प्रेम दिले. त्यांचा मी ऋणी राहील. या मनोरुग्ण परिस्थितीतून बाहेर येण्यासाठी मी थांबत आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले.
…तर राज-उद्धव ठाकरेंना जनता माफ करणार नाही, प्रकाश महाजन काय म्हणाले होते?
24 जून 2025 रोजी प्रकाश महाजन यांनी मनसे आणि शिवसेना ठाकरे गटाच्या युतीबाबत एक विधान केलं होतं. युती झाली नाही तर मराठी माणूस दोघांनाही (राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंना) माफ करणार नाही, असं मत प्रकाश महाजन यांनी व्यक्त केलं होतं. एबीपी माझाशी बोलताना प्रकाश महाजन यांनी ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर मत व्यक्त केलं होतं. तसेच युती न झाल्यास भाजप दोघांनाही संपवेल का?, असा प्रश्न विचारल्यास, असं होऊ शकतं, असंही प्रकाश महाजन म्हणाले होते. मनसे-सेनेची युती न झाल्यास मराठी माणूस दोघांनाही माफ करणार नाही. त्यांची एक चूक मराठी माणसाला 100 वर्षे मागे टाकेल. तसेच याची नोंद इतिहास काळ्या अक्षरात घेतली जाईल आणि शत्रूला तेच हवंय, असं प्रकाश महाजन म्हणाले होते.
सम्बंधित ख़बरें





राणेंना आव्हान दिल्यानंतर प्रकाश महाजनांना मुंबईत बोलावून घेतलं होतं-
प्रकाश महाजन यांनी राज आणि उद्धव ठाकरे यांच्या युतीबाबत केलेलं भाष्य आणि त्यांचा मीडियातील वावर यावरुन त्यांना साईडलाईन केल्याची चर्चा रंगली होती. याबाबत 15 जुलै 2025 रोजी प्रकाश महाजन यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला होते. यावेळी प्रकाश महाजनांनी पक्षात एकटं पडल्याची भावना अप्रत्यक्षरित्या बोलून दाखवली होती. भाजप खासदार नारायण राणे यांच्यासोबत टीका टीपण्णी झाली त्यावेळेस माझ्यावर शाब्दिक हल्ला केला. पण मनसेतील कोणत्याही वरिष्ठ नेत्यांना जाहीर माझी बाजू घेतली नाही. मी नाराज नाही खिन्न आणि दुःखी आहे, असं प्रकाश महाजन म्हणाले होते. प्रकाश महाजनांच्या या नाराजीनंतर मनसेचे नेते अमित ठाकरे यांनी त्यांना मुंबईत बोलावून घेतले होते. यावेळी अमित ठाकरेंनी प्रकाश महाजनांची समजूत देखील काढली होती. मात्र यादरम्यान प्रकाश महाजन शिवतीर्थावर येऊन देखील राज ठाकरे त्यांना भेटले नव्हते.